स्वतःशी खरं वागून पहा!

परिचयाचा भंवताल सोडून देण्याचं भय वाटतं तुला
परिचयाच्या या भंवतालात आहे एक पांघरलेला अज्ञान भाव
तुला सुरक्षित वाटणारा आणि समाधानात गुरफटवणारा
तू नाकारून टाकतोस विवेकाचा स्वर
कारण तुला बंदिस्त करणाऱ्या भंवतालाच्या कुंपणाने
आंधळं केलेलं असतं तुला

स्वतःशी खरं वागून पहा
“सत्याला झाकून टाकलंस आणि जमिनीत गाडून टाकलंस,
तर ते वाढीला लागेल जोमाने, आणि गोळा करील अशी विस्फोटक शक्ती
की जेव्हा ते फुटून बाहेर येईल, तेव्हा वाटेत येणाऱ्या साऱ्या भंवतालाच्या उडवील चिंधड्या.”
म्हणालेला एमिल झोला… १८४०मध्ये जन्मलेला आणि १९०२मध्ये मेलेला

मिळवायला हवी तुला शक्ती
स्वतःला सकारात्म सत्याने वेढून घेण्याची.
सशक्त हो.
शक्ती, सत्य आणि विश्वास स्वतःतच मिळवणं
हीच आहे किल्ली बंदिस्त करणारा भंवताल खुला करण्याची

तू असशील मुक्तात्मा
कुणीच नाही ठरवणार तुझ्या अस्तित्वाचे कंगोरे
कुणीच नाही सांगणार तुला- काय विचार करावा, काय कृती… काय उक्ती…
कुणीच नाही करणार तुझं जगणं नियंत्रित
दुसरं कुणीही नाही… फक्त तू स्वतःच.

कवयित्री- डायना-मारी बंबार्दिरी

(मुग्धा कर्णिक यांच्या फेसबुक पेजवरुन साभार)

Leave a Comment