आमच्या विषयी

‘मीडिया वॉच’ हा माझा अफाट वाचकप्रिय स्तंभ . १२ वर्ष ‘लोकमत’ त्यानंतर जवळपास ५ वर्ष ‘पुण्यनगरी’ या दैनिकांमध्ये जिल्हा वार्ताहरापासून संपादक पदापर्यंत काम करताना मी याचं नावाने साप्ताहिक स्तंभ लिहायचो . या स्तंभाने मला अफाट प्रसिद्धी मिळाली. प्रत्येक रविवारी विदर्भात , राज्यात अतिशय आवडीने वाचक हा स्तंभ वाचायचेत . प्रत्येक रविवारी दिवसभर फोन खणखणत असायचा . त्या दिवशी शेकडो नवीन माणसं आयुष्यात यायचीत. ही सारी माणसं ‘मीडिया वॉच’वाले अविनाश दुधे असे मला ओळखतात. अगदी परदेशात सुद्धा या कॉलमने मला चाहते दिले आहेत. या स्तंभात प्रकाशित झालेल्या निवडक लेखांचे ‘मीडिया वॉच’ याच नावाने २०१० मध्ये माझं पुस्तकंही प्रकाशित झालं आहे . या स्तंभाची लोकप्रियता लक्षात घेवून लोकमतचा राजीनामा दिल्यानंतर याचं ‘मीडिया वॉच’ नावाने मी मासिक सुरु केलं .Registrar of Newspapers for India गेल्या यांच्याकडे त्याच नावाने नोंदणीही केली आहे . पाच वर्षापासून याच नावाने अतिशय वाचनीय आणि तेवढाच देखणा दिवाळी अंक प्रकाशित होतो आहे . महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे . पहिल्या तीन दिवाळी अंकात मीडिया वॉचचा समावेश आहे . Online विक्रीत हा नंबर एकाचा दिवाळी अंक आहे . एखाद्या दिवाळी अंकाच्या तीन आवृत्त्या निघण्याचा प्रकार महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘मीडिया वॉच’ बाबत घडला . दोन वर्षापूर्वी बदलत्या डिजिटल युगात ‘मीडिया वॉच’ चे Web portal तयार करण्याचा निर्णय घेतला; तेव्हाही Portal चे टायटल स्वाभाविकच ‘मीडिया वॉच’च असणार होते . या पोर्टललाही वाचकांचा जबरदस्त प्रतिसाद आहे .