बरे झाले, शेषराव बरळ‍ले.

– डॉ. कुमार सप्तर्षी

असे म्हणतात की, सत्ताबदलाची चाहूल साहित्यिकांच्या लिखाणातून येते. रशियन क्रांतीची चाहूल टॉलस्टॉय,more चेकॉव्ह वगैरेंच्या लेखनातून लागली होती. तंत्रज्ञानाचा आधार घेऊन हुकूमशाही येण्याची शक्यता, मग ते कम्युनिस्ट असो वा धर्माध असोत, जॉर्ज ऑरवेलच्या कादंब:यांमधून व्यक्त झालेली दिसते. सध्याचे केंद्र सरकार कोणत्या विचारधारेचे आहे व ते कोणत्या दिशेने प्रवास करीत हुकूमशाहीचा टप्पा गाठेल याची चाहूल अंदमान येथे झालेल्या तथाकथित विश्व साहित्य संमेलन आणि त्याचे अध्यक्ष शेषराव मोरे यांच्या वाणीला फुटलेल्या धुमा:यातून लागते. तसे पाहिले तर नांदेडवासी शेषराव मोरे यांना कुणी विचारवंत मानत नाहीत. तरीही हुकूमशाहीचा सूर्य उगवणार आहे, हे कोंबडय़ाप्रमाणो ते आरवले. वास्तविक साहित्यिक संवदेनशील असल्याचे म्हटले जाते. पण काही विचारवंत विकाऊ, तर काही भाट असतात. पूर्वी राजे, बादशाह, संस्थानिकांनी पदरी बाळगलेल्या भाटांचे काम रोज राजाची खोटी स्तुती करून त्याला उपयोगी पडेल असे बोलत राहणो हेच असे. निर्थक, विसंगत, पोकळ शब्दभांडार हेच भाटांचे भांडवल असायचे. हे समजून घेतले की, शेषराव मोरे यांचे भाषण उलगडू लागते.

शेषराव मोरे हे ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागले. मी स्वत: नरहर कुरुंदकरांबरोबर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुद्दाम नांदेडला जात असे. तेव्हापासून प्रा. शेषरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय आहे. ढोबळमानाने समाजवादी मंडळी कुरुंदकरांना आपल्या विचारसरणीचे मानत. तथापि, दलित व मुस्लीम या जनसमूहांबद्दल कुरुंदकरांच्या बुद्धीचा भाग प्रतिगामी होता.

निजामाच्या राजवटीत मजलीस इत्तेहदूल मुसलमीन ही कट्टर धार्मिक संघटना व त्यांची परधर्मीयांवर हल्ले करणारी रझाकार नामक अतिरेकी संघटना यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे मराठवाडय़ातील पुरोगामी म्हणविणारया विचारवंतांमध्ये मुस्लीम समाजाबद्दल, इस्लामबद्दल, आंबेडकरांबद्दल व दलितांबद्दल सुप्त राग होता. हा दोष कुरुंदकरांमध्ये देखील सुप्तावस्थेत होता. नामांतर आंदोलनात सवर्ण मंडळींनी दलितांवर हल्ले व अत्याचार केले. त्या हिंसाचाराचा निषेध करून समाजात विवेकाची व सामंजस्याची पुनस्र्थापना करण्यासाठी थोर समाजवादी नेते एसेम जोशी यांचा दौरा झाला.

नांदेड येथे व्यासपीठावरून भर सभेत कुरुंदकरांनी एसेम अण्णांच्या भूमिकेला विरोध केला होता. त्यांची दलितविरोधी भूमिका ऐकून एसेम हतबल झाले होते. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. दलितांना गावकुसाबाहेर ठेवण्याचा प्रघात मराठवाडय़ात उघड स्वरूपात होता. रात्री लूटमार करण्यासाठी गावातील श्रीमंतांची घरे दाखवण्यासाठी रझाकार प्रथम दलितांना भेटत. रझाकारांच्या दहशतीमुळे गावकुसाबाहेर राहणारी दलित मंडळी गावातील श्रीमंतांच्या वाडय़ार्पयतचा रस्ता दाखवित. म्हणून मराठवाडय़ात मुस्लिमांइतकाच दलितद्वेष ठासून भरलेला आहे.

रझाकारांनी अत्याचार केले ही गोष्ट खरीच होती. तथापि, हा इस्लामच्या धर्मग्रंथाच्या शिकवणुकीचा भाग नव्हता. याबद्दल मी स्वत: कुरुंदकरांशी खूप वेळा वाद घातलेला आहे. पण ते भूतकाळातील आठवणी विसरायला तयार नव्हते. तेवढा भाग सोडला तर कुरुंदकर पुरोगामी विचारांचे होते.

प्रा. शेषराव मोरे हे खऱ्या अर्थाने कधीच पुरोगामी नव्हते. पण नांदेडमध्ये कुरुंदकरांचे नाव मोठे होते. त्यामुळे मोरे यांनी त्यांचे कुंकू लावले होते. ते स्वत:ला कुरुंदकरांचे शिष्य म्हणवत. ज्याचे नाव चलतीत आहे त्याच्या नावाने कपाळी कुंकू लावायचे आणि सवाष्ण म्हणून मिरवायचे हा मोरे यांचा खास स्वभाव! संशोधक हा त्यांचा पिंड नव्हे. पण बाजारात विकल्या जाणा:या विचारसरणीचे ग्रंथ लिहिणो हा त्यांचा छंद आहे.

सत्यनिष्ठा बाळगायची नाही, ही भूमिका असते. जगातील ज्यू लेखकांनी सातत्याने इस्लाम व ख्रिश्चन या धर्माबद्दल संभ्रम निर्माण करणारे विपुल ग्रंथलेखन केले आहे. ते वाचून मोरे अनमान धपक्याने निष्कर्ष काढतात. त्यांना प्रत्यक्ष पुराव्याची कधी गरज भासली नाही. शेषराव मोरे यांनी ‘गांधीजींना देशाची फाळणी हवी होती’ असा निष्कर्ष आधी काढला. त्याला विक्रीमूल्य होते. आपल्या निष्कर्षाच्या समर्थनार्थ त्यांनी ७०० पानांचा ग्रंथ लिहिला. हिंदुत्ववाद्यांचे मार्केट असल्याने प्रकाशकाने तत्परतेने तो प्रकाशित केला. चांगली कमाई झाली. मी त्या ग्रंथातील प्रत्येक शब्द न शब्द वाचलेला आहे. कुठेही गांधींना फाळणी हवी होती असा निष्कर्ष काढता येत नाही. सर्व काही मोघम व अनुमान पद्धतीचे प्रतिपादन आहे. शिवाय भाषाशैली अत्यंत कंटाळवाणी आहे.

हिंदुत्व ही सत्ताप्राप्तीसाठी केलेली एक चतुर खेळी आहे. त्यात खूप विसंगती आहे. हिंदुत्ववादी मंडळींना मोरेंसारखा विचारवंताचा बुरखा पांघरलेला ब्राह्मणेतर हवाच होता. मग मोरे यांनी कुरुंदकरांचे कुंकू पुसले आणि नवा घरोबा केला. पुढील वर्षी महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी सत्ता त्यांना ‘महाराष्ट्रभूषण’ हा पुरस्कार प्रदान करून उपकाराची परतफेड करेल.

अंदमानचे साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादीच संमेलन होते. हिंदुत्ववाद्यांचा हुकमाचा एक्का म्हणून मिरवण्यासाठी अध्यक्षपदावरून शेषराव बरळले. जो हिंदूंबद्दल टीका करतो त्याला ‘पुरोगामी दहशतवादी’ म्हणावे, असे त्यांनी सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी उपहास केला. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांची हत्त्या हिंदुत्ववाद्यांनी केली नाही, असे ते म्हणाले. जणू मोरे हे तपास यंत्रणोचे प्रमुख होते. कोणत्या कारणाने या हत्त्या झाल्या, हे मोरे यांनी प्रसिद्ध करावे.

सावरकरांवरील कलंक हिंदुत्ववादी साबणाने धुवून टाकावा, असा त्यांचा आग्रह आहे. गांधींच्या हत्त्येनंतर सावरकरांना आरोपी म्हणून अटक झाली होती. त्या कटात ते क्र. 8 चे आरोपी होते. पण ते हुशार होते. ते कधीही पुरावा मागे ठेवत नसत. दिल्लीच्या लाल किल्ल्यातील तुरुंगात ते नथुराम गोडसे व अन्य आरोपींना ओळखही दाखवत नसत. म्हणून सरदार पटेलांनी पं. नेहरूंना पत्र लिहून त्यांचे नाव खटल्यातून वगळले. त्यापूर्वी त्यांनी सौदा केला. सावरकरांना सोडण्याच्या मोबदल्यात त्यांनी राजकारण सोडून द्यायचे, असा सौदा झाला. गांधी हत्त्येच्या आरोपातून वगळल्यानंतर शेवटर्पयत सावरकर राजकारणाबद्दल एक शब्दही बोलले नाहीत. उलट हिंदू महासभेचे अध्यक्ष असलेल्या भोपटकर वकिलांना त्यांनी तंबी दिली की, गांधी हत्त्या या विषयात माङयाबद्दल एक शब्दही बोलू नका, मी निदरेष आहे वगैरे गोष्टी बोलू नका.

सावरकरांचा इतिहास पुसून टाकण्याची एवढी घाई कशासाठी? मोदी सरकार आज आहे तर उद्या नाही असे त्यांना वाटते. म्हणून त्यांची घाई आहे. घाई करून सावरकरांना राष्ट्रपिता जाहीर करण्याचा हा कट आहे. या पद्धतीने नथुराम गोडसेंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात येईल!

पुरोगाम्यांना ‘दहशतवादी’ हे विशेषण लावण्यापूर्वी त्यांनी कुणा प्रतिगाम्याची हत्त्या केली, याचा पुरावा मोरे यांनी द्यायला हवा होता. याउलट, प्रतिगाम्यांनी पुरोगाम्यांच्या ज्या हत्त्या केल्या, त्याची नामावली मोठी आहे.

काही असो, शेषराव मोरे यांना साहित्यिक वा विचारवंत वा सत्यउपासक म्हणता येणार नाही. परंतु संभ्रम निर्माण करण्यासाठी ते अशी विधाने करतात. हिंदुत्ववादाची सारी रचना संभ्रमाच्या पायावर उभी आहे. हिंदुत्ववादी हा एक संप्रदाय आहे. त्यांच्यावर टीका केली की समस्त हिंदूंवर टीका होते, हे विधान पटणारे नाही. हिंदूची खरी व्याख्या करायची असेल तर ‘जो पूर्वकर्मविपाक सिद्धांत मानतो, जन्मावरून सत्ता, संपत्ती यांचे वाटप ज्याला मान्य आहे, जो जातिव्यवस्था मानतो आणि ज्याला अस्पृश्यता मान्य आहे, तो हिंदू’ असे म्हणावे लागेल.

हिंदू धर्म व हिंदुत्व यांचा अन्योन्य संबंध काही नाही. जो हिंसेवर निष्ठा ठेवतो आणि जो हिंदू समाजाच्या उपरोक्त व्याख्येत बसतो त्याला हिंदुत्ववादी म्हणतात. शेषराव मोरे डॉ. नरेंद्र दाभोलकरांना सावरकरांचे वारस मानतात. या वैचारिक गफलती निर्माण करून संभ्रम माजवण्याचा त्यांचा डाव आहे, हे सिद्ध होते. सावरकरांना विज्ञानवादी म्हणवणो हा भ्रम समाजवादी मंडळींतदेखील आहे.

सावरकर सामथ्र्याचे पूजक होते. शक्तिपात होऊ नये म्हणून ते दलितांबद्दल कळवळा दाखवत. चित्पावन ब्राह्मण ही जात ब्राह्मण व क्षात्रतेजाचा संकर असल्याने ती टिकली पाहिजे, असे ते मानत. तसे पुरावे आहेत. शेषराव मोरे कितीही घासले तरी राज्यघटनेला पर्याय म्हणून सावरकरवाद जागा घेऊ शकत नाही. शेषराव मोरे यांना पुरोगामी वा प्रतिगामी यापैकी एक विशेषण न लावता त्यांना ‘संभ्रमपुरुष’ असे विधान आपण देऊ या. त्यामुळे ते हिंदुत्ववाद्यांना अधिक प्रिय होतील व सन २०१६ मधील महाराष्ट्रभूषण पुरस्कारास अधिक पात्र ठरतील.

(लेखक ‘युक्रांद’चे संस्थापक, ‘सत्याग्रही’ मासिकाचे संपादक b.आणि गांधीवादी विचारवंत आहेत.)

[email protected]
#sheshraomore

Previous articleपरिवर्तनाच्या दुष्काळातला अंकुर-अमर हबीब
Next articleगोळवलकरांना नाकारण्याची हिंमत संघात आहे?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.