स्मार्टफोनपासून दूर राहणेच फायदेशीर

सौजन्य – दैनिक दिव्य मराठी
अॅपलने आठ वर्षापूर्वी पहिला आयफोन बाजारात आणला होता. मात्र, आठ वर्षानंतर हजारो कंपन्या स्मार्टफोन तयार करतील याची कोणास कल्पनाही नव्हती. स्मार्टफोनमुळे आपल्या आयुष्यातील बहुमोल वेळ आपल्यापासून हिरावून घेतला जातो आहे, स्मार्टफोनने आपल्या खासगी आयुष्यातही आक्रमण केले आहे, हा चिंतेचा विषय ठरला आहे. युजरचा दिवसातील ३ तासांचा कालावधी स्मार्टफोन बघण्यात जातो आहे. यात फोनवर बोलण्याचाही काळ येतो. उशीजवळ स्मार्टफोन घेऊन झोपण्याची सवय जडली असल्याचे लोकांनी मान्य केले आहे.

टेक्सासमधील ऑस्टिन शहरात राहणारी सुसॅन बटलर (२७) तंत्रज्ञान सल्लागार आहेत.smart phone अन्य लोकांसारखे तीसुद्धा वारंवार आपला स्मार्टफोन चेक करत असते. ही सवय सोडण्यासाठी तिने रिंगटोन विकणाऱ्या “रिंगली’ कंपनीकडून १.२ लाखात एक रिंगटोन खरेदी केली आहे. ही रिंगटोन फिल्टरचे कार्य करते. आता ती जी-मेल आणि फेसबुकच्या नोटिफिकेशनची रिंगटोन सायलेंट करते. मेसेज टोन लाइट अप किंवा व्हायब्रेट करते. यामुळे आता मी निश्चिंत स्मार्टफोनपासून दूर राहू शकते. म्हणजे एका टेक्नॉलॉजीपासून दूर राहण्यासाठी यातीलच एक तज्ज्ञ दुसऱ्या तंत्राचे साह्य घेते आहे.

इमार्केटर यांच्या मते, सध्या निम्म्याहून अधिक लोकांकडे स्मार्टफोन्स आहेत. यातील बहुतांश युजर्स दिवसातील किमान ३ तास स्मार्टफोनवरील स्क्रीन चेक करण्यात घालवतात.

स्मार्टफोनच्या वापरावर नुकताच “बँक आॅफ अमेरिका’ एक सर्वेक्षण केले असून जवळपास एक तृतीयांश लोकांनी झोपतानाही स्मार्टफोन जवळ ठेवत असल्याचे मान्य केले आहे. लोकांच्या अंगात स्मार्टफोनची सवय जडल्याने हजारो नव्या कंपन्यांना स्मार्टफोन तयार करण्याची संधी उपलब्ध करून दिली. हायटेक ज्वेलरी तयार करणाऱ्या कोवर्ट या ब्रिटिश कंपनीचे संस्थापक कॅट उन्सवर्थ यांनी सांगितले, तंत्रज्ञानाच्या जाळ्यात आपण सापडलेलो अाहोत.

सरकारी नियमांतर्गत कंपन्या आपल्या उत्पादनास चांगले ठरवून प्रचार करू शकत नाही. मात्र शास्त्रज्ञांनी सांगितले की, लठ्ठपणामुळे आजार होण्याची शक्यता नसते. त्यामुळे आपण नियंत्रणाबाहेर गेलेलो आहोत. आपल्या जीवनावर याचा कोणता परिणाम होतो आहे, हे समजून घेण्यास तयार नाही. यामुळेच कोवर्टसारख्या उत्पादने तयार करणाऱ्या कंपनीच्या व्यवसायावर वियरेबल तंत्राचा परिणाम झाला आहे. अॅपलचा आयवॉच तयार करण्याचा उद्देश, लोकांना स्मार्टफोन वारंवार बघण्याची वेळ येऊ नये असाच होता. गेल्या महिन्यात गुगल आणि लिवाईस यांनी अनेक प्रकारे वापर व्हावा अशा प्रकारचे हायटेक कपडे तयार करण्याची घोषणा केली आहे. उदाहरणार्थ, जॅकेटची बाही दुमडल्यानंतर फोनची रिंगटोन बंद करता येते. लिवाईसमध्ये ग्लोबल प्रॉडक्ट इनोव्हेशन सेक्शनचे हेड पॉल डिल्लिंगर यांनी सांगितले, आपले आवडते ड्रेस डिजिटल वर्ल्डशी जोडण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची ही संधी आहे. सध्या याची गरजही आहे. डिनर टेबलवर लोक एकमेकाकडे पाहत जेवतील. आता केवळ स्मार्टफोनकडेच पाहत जेवतो आहोत. एखाद्या गंभीर विषयावर चर्चा करतानाही रिंगटोनमुळे व्यत्यय निर्माण होतो. यामुळे विनाकारण रसभंग होतो.

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (सनफ्रान्सिस्को)मध्ये कार्यरत असलेले न्यूरोलॉजिस्ट आणि न्यूरोसायन्सचे प्रा. अॅडम गजाले यांनी सांगितले, तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या लोकांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु नात्यात, ऑफिसमध्ये किंवा ड्रायव्हिंग करताना मेसेजिंग करताना संरक्षणाच्या दृष्टीने त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागते आहे. स्मार्टफोनवर अाधारित अॅपवर जगात लोकांना जे पाहिजे, ते इंटरनेटवर शोधत असतात. यासाठी मोबाइलवर इंटरनेटचा वापर वाढला आहे. कंपन्या युजरची अावड जाणून घेण्यासाठी गुगल सर्च इंजिनच्या माध्यमातून त्यांचा इतिहास, प्राधान्यक्रम आणि आवड जाणून घेतात. यात युजरना नोटिफिकेशनचीही सुविधा दिली जात आहे. त्यामुळे युजर फोनपासून दूर जाऊ शकत नाही. कारण एक तर लाइट ब्लिंक होते किंवा तो व्हायब्रेट होत असतो. गुगलचे प्रॉडक्ट सिनिअर व्हाइस प्रेसिडेंट सुंदर पिछाइ यांनी सांगितले, आमचे काही प्रॉडक्ट युजरचा समतोल साधणारे आहेत. डिजिटल मदतीसाठी त्याचे लोकेशन विचारले जाते. युजरला काय हवे असते ते जाणून घेण्यासाठी आमचे तंत्र खूप उपयुक्त ठरते.
वेगळी पद्धत वापरात आणणारे युजर
> ऑफटाइम लिमिट कस्टमर्स अॅप युजरना स्मार्टफोनचा किती वापर केला याची माहिती देते. लॉग इक्विविटी चार्टमुळे कोणाचा किती वेळ कोणत्या गोष्टीवर खर्च झाला याची माहिती मिळते.
> मोमेंट अॅप फोन वापरण्याचा काळ शेअर करण्यासाठी चालना देतो. यामुळे फोन युजचा वेळ वाढण्याऐवजी कमीही होऊ शकतो.
> न्यूयाॅर्कमध्ये एका डिझायनरने क्रेडिट कार्ड आकारचा फोन तयार केला असून त्यात कॉल घेण्याची आणि करण्याची सुविधा आहे. फोनचा कमीतकमी वापर व्हावा, अशी यात सोय करण्यात आली आहे.
> न्यूयॉर्क अॅड एजन्सीचे आर्ट डायरेक्टर वॅन गोल्ड यांनी स्मार्टफोनचे प्लास्टिक मॉडेल नो फोन तयार केले असून ज्यांना फोनचा कमीतकमी वापर करावयाचा आहे त्यांच्यासाठी हा उपयुक्त ठरतो. फोन घरी विसरल्यानंतर जे अस्वस्थ होतात, त्यांच्यासाठी हा फोन सिक्युरिटी ब्लँकेट आहे.
सौजन्य – दैनिक दिव्य मराठी
© The New York Times

Previous articleसरस्वतीपुत्राचा सन्मान
Next articleहा तर अप्रिय लेखनाचा बहुमान
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.