Monday , September 24 2018
Home / Avinash Dudhe (page 12)

Avinash Dudhe

अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या मीडिया वॉच अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

अशोक थोरात :चैतन्याच्या चार गोष्टी

+++ हे आहेत अमरावतीचे अशोक थोरात. वाटत नाही हा चेहरा कुठंतरी पाहिलाय कधी?न झाकणा-या माणसाची ही मुखवटा नसलेली मुद्रा.असो.मस्त मनसोक्त कवी.जगण्यातली जिंदादिली जिवापाड जपणारा माणूस.माणसाची कविता त्याचं निखळ,निरंतर व्यंग हाताशी ठेवून लिहिणारा सर्जक.व्यंगाचीच निघाली गोष्ट.तर हा बहाद्दर नाही झाकत स्वतःचं व्यंग वरपांगी शब्दांनी.हा गडी होता बारूकसा.तेव्हा अंगावरून गेलं वारं.आणि हातापायांनी …

Read More »

रविषकुमार: विकाऊ पत्रकारांच्या गर्दीतील आशेचा किरण

मोहसीन शेख गेल्या काही दिवसात रविषकुमारला जीवे मारण्याच्या _धमक्या सातत्याने मिळत आहेत. काल परवा त्याच्या गाडीचा पाठलाग ठरत काही गुंडांनी त्याला शिवीगाळ देखील केली.इतकंच नाही तर त्याचा मोबाईल नंबर या लोकांनी व्हायरल करून देशभरातून वेगवेगळ्या लोकेशनवरून त्याला धमकीचे कॉल केले.परिवाराला संपवायची,बायको,मुलीवर बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्या. शिवाय रोजच्या रोज त्याला सोशल …

Read More »

पुस्तकी ज्ञान आणि वास्तविकता

साप्ताहिक साधना च्या सौजन्याने प्रशांत नेमा असं नव्हतं की मी मोठा होत असताना अस्पृश्यता मला माहित नव्हती, मला असं वाटत होतं की ती पूर्वी असायची. आम्हाला हे माहीत होतं की तन्मयच्या पूर्वजांसाठी काही सार्वजनिक ठिकाणं प्रतिबंधित होती. काही ठिकाणी ते अस्पृश्यच फक्त नव्हते, लोक त्यांना बघणं देखील पसंत करत नव्हते. …

Read More »

अकबर बादशहाची चित्रवेल्हाळ पुस्तके

  अरुण खोपकर नुकताच जागतिक  ग्रंथ दिन साजरा झाला. या _दिनानिमित्त एका निरक्षर बादशहाला कुर्निसात   ग्रंथ म्हटल्यावर बहुधा डोळ्यासमोर छापील पुस्तकच येते. पण ग्रंथपरंपरा ही छपाई सर्वत्र पसरण्याआधीच्या काळातही जाते. कातड्यावर लिहीलेले, पॅपिरसवर लिहीलेले, तालपत्रांवर लिहीलेले असे ग्रंथांचे कितीतरी प्रकार आहेत.   चीनी संस्कृतीत कागदाचा शोध लागला. सातव्या शतकात …

Read More »

‘लोकमत’ आणि आसाराम भक्तांच्या धमक्या

  अविनाश दुधे परवा बलात्काराच्या आरोपाखाली आसारामबापूला जन्मठेप झाली . त्याला झालेल्या शिक्षेमुळे देशातील लाखो लोक आनंदित झालेत त्यापैकी मी एक आहे. आसारामचा आणि माझा थेट संबंध येण्याचं काही कारण नाही . मात्र २२ वर्षाच्या पत्रकारितेतेत वेगवेगळ्या निमित्ताने चारदा मी आसारामबाबत लिखाण केलं . आणि प्रत्येक वेळी भयानक अनुभवांना मला …

Read More »

आसारामसारख्या भोंदूच्या स्त्रिया शिकार का होतात?

  अविनाश दुधे बलात्कारी आसारामला  परमेश्‍वर मानणार्‍या लाखो भाबड्या भक्तांसाठी त्याला झालेली जन्मठेप  प्रचंड धक्कादायक आहे. पाच वर्षापूर्वी त्याला झालेली अटकही भक्तांना अशीच धक्का देवून गेली होती .अलौकिक शक्तीचा दावा करणार्‍या आपल्या बापूची कुठलीही शक्ती त्यांना मदत करूशकत नाही, हे पचविणं भक्तांना चांगलंच जड जात असेल. सत्संग आणि प्रवचनांमध्ये ‘निर्भय …

Read More »

अखेर आसाराम बलात्कारीच!

अविनाश दुधे अखेर आसाराम बलात्कारीच! पाच वर्षापूवी आसारामबापूला बलात्कारच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर मी दैनिक ‘पुण्यनगरी’त हा लेख लिहिला होता . त्यावेळी बापूच्या देशविदेशातील भक्तांनी जवळपास दहा दिवस प्रचंड शिवीगाळ , जीवे मारण्याच्या धमक्या देवून मला जगणे मुश्कील केले होते . बापूवरील आरोप खोटे आहेत . न्यायालयाने त्यांना कुठे दोषी ठरविले …

Read More »

काळाबरोबर झेपावणारे हिंस्र पशू

मुग्धा कर्णिक चांगल्या- विशेषतः गुणी, प्रतिभावंत माणसांना समाज धड जगू देत नाही या थीमवर लिहिलेली ही कविता आहे. त्याने गेतलेली काही नावं तुमच्या ओळखीची नसतील कदाचित. पण तिथे आपल्या भंवतालातील माणसांची नाव घालू शकतो. अशक्य असतं माणूस होणं तसं… अवघड तर नक्कीच. ——————————— काळाबरोबर झेपावणारे हिंस्र पशू व्हॅन गॉहला रंगांच्या …

Read More »

योगी आदित्यनाथच्या अन्यायाचा बळी

मुग्धा कर्णिक   आदित्यनाथ बिश्तच्या दुष्टपणाचा, अन्यायाचा एक बळी. एक सत्कर्मी कसा तुरुंगात सडवला जातो आहे…                                                                                           आपण वाचतो नि विसरतो… माणसे भोगत रहातात. डॉ. काफील यांनी तुरुंगातून लिहिलेले पत्र… पाच दिवसांपूर्वीच तळतळून हे पत्र लिहिले आहे. मराठीत अनुवादले आहे. वाचू दे सर्वांना या द्वेषभक्तांचे हलकट प्रताप. डॉ. काफील खान, उत्तर …

Read More »

कॉर्पोरेट लॉबी छोटे हॉस्पिटल गिळतेय

– डॉ सचिन लांडगे हॉटेल टाकण्यासाठी तुम्ही आचारी असण्याची गरज नाही, तसंच हॉस्पिटल टाकण्यासाठी पण तुम्ही डॉक्टर असण्याची गरज नसते.. ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नसते.. पण मोठया मोठया उद्योगपतींना हे चांगलंच माहिती होतं.. मग त्यांनी टोलेजंग कॉर्पोरेट हॉस्पिटल्स टाकली आणि त्याचा “मनी मेकिंग बिझनेस” बनवायला सुरुवात केली.. तिकडे जाणारा …

Read More »