Monday , September 24 2018
Home / Tag Archives: featured (page 9)

Tag Archives: featured

विचारधारांवर कडवी निष्ठा असूच नये!

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०१७   मुग्धा कर्णिक   एखादा समाज एखादी विचारधारा अंगिकारतो असे दिसत असले तरीही हे खरे नसते. विचारधारा अंगिकारणे हे व्यक्तीमनाचे, बुद्धीचे काम आहे. बहुसंख्य व्यक्ती ती अंगिकारतात तेव्हा ती विचारधारा समाजाने अंगिकारली अशी छाप पडते. पण समाजातील व्यक्ती भिन्नभिन्न प्रकृतीच्या असतात. खोलवर विचार करून त्यात …

Read More »

गो लाईव्ह : कृती, प्रकृती ते विकृती

    (मीडिया वॉच दिवाळी अंक २०१७)     शेखर पाटील लाईव्ह स्ट्रीमिंगच्या रूपाने आता सर्वसामान्य व्यक्तीच्या हातामध्ये चक्क दूरचित्रवाणी वाहिन्यांप्रमाणे लाईव्ह प्रक्षेपणाची सुविधा आली आहे. आज कुणीही स्टींग ऑपरेशन करू शकतो आणि अगदी बिनदिक्कतपणे जगाला दाखवू शकतो. बातमी दाबली जाऊ शकत नसल्याचा आदर्शवाद हा पत्रकारितेच्या पाठ्यपुस्तकांपुरताच मर्यादीत असल्याचा मध्यंतरी …

Read More »

विचारधारा आणि कार्यकर्ता दोघांनाही एक्सपायरी डेट असते !

मीडिया वॉच दिवाळी अंक २०१७   सुधाकर जाधव ————————————— विचाराचे वय असते आणि त्याचा मृत्यू अपरिहार्य असतो ही मान्यताच समाजात नसल्याने मेलेल्या विचारधाराना कवटाळून बसलेले लोक जगातील कानाकोपऱ्यात दिसतात. धर्म आणि त्यांनी निर्माण केलेल्या समाजरचना आजही आदर्श मानणारा मोठा समूह आहे. तसेच आधुनिक विचाराची परिणामकारकता संपल्याचे दिसून आल्यावरही त्याच विचाराला …

Read More »

यह पलाश के फूलने का समय है!

साभार – मीडिया वॉच दिवाळी अंक २०१७ राही श्रुती गणेश विख्यात अर्थशास्त्रज्ञ ज्यॉं द्रेझ यांनी गेल्यावर्षी झारखंडमधल्या आदिवासींच्या निवासी शाळांसाठी ‘सहपाठी’ नावाचा प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या निमित्तानं राहीला सलग दोन वर्षं मला झारखंडला जाण्याची, तिथल्या दुर्गम भागांत राहण्याची संधी मिळाली. तिथल्या वास्तव्यादरम्यान एरवी ‘आउट ऑफ कव्हरेज’ असलेल्या जगण्यातील केवढ्या …

Read More »

पॉलीअ‍ॅमरी: बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था

(सौजन्य – दैनिक लोकसत्ता) उत्पल व. बा. माणसं स्वभावत: वेगवेगळी असतात. त्यांचं वेगळेपण त्यांच्या इतर व्यक्तींबरोबरच्या संबंधांतही परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांतही हे परावर्तित होतं. स्त्री-पुरुष संबंधांमध्ये लग्नपूर्व-लग्नोत्तर-लग्नबाह्य़ अशा सर्वच पायऱ्यांवर प्रस्थापित नैतिकता आपली भूमिका बजावत असते. आपल्याकडे स्त्री-पुरुष संबंधांची ‘व्यवस्थात्मक सुरुवात’ सहसा एकपत्नी-एकपती पद्धतीने (मोनोगॅमीने) होत असली तरी मनातून ‘मोनोगॅमी’ …

Read More »

हिंदू व वैदिक धर्म वेगळे कसे?

सौजन्य -(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक ) संजय सोनवणी हिंदू व वैदिक धर्म एकच आहे ही आपल्याकडे सर्वसाधारण समजूत आहे. किंबहुना तो समज रुढ व्हावा यासाठी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न  केले जातात . मात्र हे दोन्ही धर्म हे पूर्णतः  भिन्न आहेत. हिंदू हा देशातील पुरातन सिंधू संस्कृतीच्या उगमापासून अस्तित्वात असलेला धर्म आहे. …

Read More »

लिंगा-लिंगातला भाव …..अभाव ?

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०१६ योजना यादव बापूंनी डाळिंबाचा प्रत्येक दाणा वाटीत अलगद सोलला. एक-दोन कुजके दाणे बाजूला काढले. वाटी माझ्यापुढे धरली. तापाच्या झणक्यानं मी दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं. वाटी पुढं करत ते म्हणाले, डाळींब अख्खं खायचं. त्यातला एकही दाणा सोडायचा नाही. डाळिंबाच्या दाण्यातच एक दाणा असा असतो की तो …

Read More »

कळालेल्या पुरुषाचा कोलाज

मीडिया वॉच दिवाळी अंक २०१६ – शर्मिष्ठा भोसले पत्रकारितेचं शिक्षण घेत असताना कुठल्याही कॉलेजवयीन तरुण-तरुणींमध्ये असतो तसा आमच्या वर्गातही जोड्या जुळवण्याचा कार्यक्रम सुरू असायचा. एकदा चार-दोन जण सोबत बसलेले असताना एक मैत्रीण मित्राला म्हणाली, ‘काय रे तुला ‘ती’ आवडते ना?’ यावर त्याचं उत्स्फूर्त उत्तर होतं, ‘ती? तिच्यात काय आवडण्यासारखं आहे? …

Read More »

डीपी के मोहताज रिश्तों की दुनिया..

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०१६ माणिक मुंढे जग केवढं झपाट्यानं बदलतंय? म्हणजे आजोबा नातीला सांगतोय की तुझ्या स्कर्टची लांबी किती आहे यावरून तू तुझं चारित्र्य कुणाला मोजू देऊ नको. नातंही अशी की नव्या नवेली, अमिताभ बच्चनची नात. तिचं नाव सर्च केलं की एका झटक्यात पंधरा सोळा वर्षातले बिकीनीवरचे, शाहरूखच्या पोरा …

Read More »

पुरुष असाही! पुरुष तसाही!

#मीडिया वॉच दिवाळी अंक २०१६ हर्षदा परब स्त्री पुरुष हा भेद फार उशीरा लक्षात आला. शरिर वेगळ असतं हे दिसत होतं पण ते वेगळं का हे विचारायला आणि त्याची उत्तर शोधायला माध्यमं नव्हती. जशी मोठी झाले वाचन झालं तसं हा लिंगभेद विसरुन जगायला शिकलं पाहिजे हा विचार मी स्वतःहून स्विकारला. …

Read More »