ख्रिश्चन धर्मात तर जन्म ही शिक्षा वा पाप… तो घेणाऱ्याचेच केवळ नाही, ते त्यांच्या आद्यपूर्वजांचे म्हणजे आदम आणि इव्ह यांचे आहे. परमेश्वराने या दोघांना जन्माला घातल्यानंतर त्यांनी सफरचंदाचे मोहफळ खाऊ नये अशी आज्ञा त्यांना केली… पण इव्हला तो मोह आवरला नाही. तिने ते फळ खाल्ले व आदमलाही ते खायला दिले… त्यामुळे त्यांची कामवासना जागी होऊन त्यांनी समागम केला.