-चंद्रकांत वानखडे
नथुराम आज खरोखरच तुझी दया आली आणि तुझ्याबद्दल करुणाही वाटू लागली.
ज्यांच्या विचाराने प्रेरित होवून तु गांधींची हत्या केली(तुमच्या भाषेत वध) ते ही आज गांधींचाच उदोउदो करताहेत.
त्यातील खरा- खोटा भाग सोडून दे पण उदो-करताहेत हे तर तु मान्य करशील?
तुम्ही “मजबूरीका नाम महात्मा गांधी” म्हणत कायम गांधींची टिंगल केली.
पण मला तर तुम्हीच ” मजबूर ” दिसत आहात की तुम्हाला तोंडदेखले का होईना गांधींच नाव घ्यावच लागत.
म्हणजे आता अस म्हणायच का?
“मजबूरी का नाम मोदी”.
“मजबूरी का नाम भाजपा,भागवत,रा.स्व.संघ इत्यादी इत्यादी…”
त्यांच्या “मनकी बात” मध्ये नथुराम तु असशीलही.
पण ” जन की बात ” तर त्यांना गांधींचीच करावी लागते.
अखेर “मजबूरी चे नाव म्हणजे तुम्हीच ना?
नथुरामा! किमान एवढ तर आता मान्य कर.
तुझी दया येते रे नथुरामा.
गांधी द्वेषाने तुझा जन्म तर वाया गेलाच व या द्वेषाने आंधळा होत तु गांधींची हत्या करून फासावर गेला आणि तुझ मरणही वायाच गेल ना रे!
जन्म नाही सार्थकी लागला किमान आपल मरण तरी सार्थकी लागल हे ही समाधान तुझ आजच्या दिवसाने हिरावून घेतल असणार?
कारण तुझेच समविचारी आज गांधींचा उदोउदो करताहेत.
माझ्या गांधींनी मला आपल्या शत्रूंना सुध्दा माफ करायला सांगीतल.ज्या महात्म्याची तू हत्या केली त्याने तर त्या क्षणीच तुला माफ केल असणार.
पण मी नाही करु शकलो.
आज तू कपाळावर हात देवून अगतीकपणे स्वत:च स्वत:ला विचारत असशील,
“याच साठी केला होता अट्टाहास?”
जा! आज मी सुध्दा तुला माफ करतो.
@@(चंद्रकांत वानखडे)
mast Chandubhau