देशद्राही कुणाला म्हणायच आणि कशाच्या आधारावर म्हणायच हे लोकांना कधी समजणार काय माहीत…?? जोपर्यंय कायद्याने एखादा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपी हा चोर ठरत नाही, खुनी ठरत नाही, बलात्कारी ठरत नाही आणि देशद्रोही सुद्धा ठरत नाही. JNU प्रकरण मात्र याला अपवाद ठरत चालल आहे.
मुळात देशाविरुद्ध घोषणा देणारे कोण होते..?? विद्द्यापीठातलेच होते कि बाहेरुन आले होते..?? याबाबत अजुनही बर्याच शंका आहेत. देशाविरुद्ध घोषणा देणारे बाजुलाच राहिले मात्र JNU स्टुडंटचा प्रेसिडंट कन्हेयाला या प्रकरणात अश्या पद्धतीने “फ़ोकस” करण्यात आले कि रातोरात तो सर्व भारतीयांसाठी तो देशद्रोह्यांच्या लिस्टमधे सामील झाला. कन्हेयाने गुन्हा केला आहे का तो निर्दोष आहे हे कोर्ट ठरवेलच. पण ज्या पद्धतीने माध्यमांनी आणि सरकारमधील अनेक नेत्यांनी त्याला देशासमोर “प्रेजेंट” केल त्यामुळे, सर्वांनीच त्याला आधीच देशद्रोही घोषीत करुन टाकल आहे. कोर्टाच्या निकालाची वाटही बघितली नाही, तशी कुणाला गरजही वाटली नाही. ऑन दी स्पॉट फ़ैसला करुन टाकला.
खर तर या प्रकरणाचा घटनाक्रम आता पुढे आलेला आहे. काही माध्यमांनी अगदी मुळापासुन माहीती घेवुन बातम्या द्यायला सुरवातही केली आहे. याचे अनेक विडीओ रोज युटुबवर अपडेट होत आहे आणि हळु हळु लोकांना खरी परिस्थीती समजायलाही लागली आहे. पहिल्या दिवशी “देशविरोधी घोषणांचा विडीओ” बघितल्यावर देशप्रेमाच्या आणि भावनेच्या भरात जे मत बनवल गेल ते आता विरोधी किंवा तटस्थ व्ह्यायला लागलय. तरीही अनेक जण वस्तुस्थीती मान्य करत नाहीये तर काहीजण या घटनाक्रमापासुन फ़ार दुर आहेत..म्हणुन हा खटाटोप…
घटनाक्रम बघण्याअगोदर कन्हेयाच या सर्व प्रकरणावर काय म्हणन आहे ते समजुन घेवु म्हणजे नंतर विडीओ बघितल्यावर कन्हेया खर बोलतोय का खोट हे आपल्याला लक्षात येईल.
१) कन्हेयाच्या म्हणण्यानुसार त्याचा आणि उमर खालीदचा काही संबध नाही. अफ़झल गुरुच्या फ़ाशी संदर्भातला कार्यक्रम उमर खालीदने आयोजीत केला होता.
-आता कन्हेया हा All India Students Federation (AISF) चा अध्यक्ष आहे, जी Communist Party of India (CPI) चीच एक विद्यार्थी संघटना म्हणुन नावारुपाला आली आहे. तर उमर खालीद हा Democratic Student’s Union (DSU) होता जो कि एक छोटासा गृप आहे. याशिवाय उमरने अफ़झलच्या कार्यक्रमासंदर्भात जी पत्रके कॉलेजमधे वाटली त्यात कुठेही कन्हेयाच नाव नाहीये. त्यामुळे कन्हेया स्टुडंटचा अध्यक्ष जरुर आहे पण उमर खालीदच्या संघटनेचा नव्हे. इथे कन्हेयाच्या बोलण्यात तथ्य दिसुन येत.
२) ज्या दिवशी घटना घडली त्या ९ तारखेला उमर खालीदने आयोजीत केलेल्या कार्यक्रमाला १५-२० मिनिट अगोदर परवानगी नाकारली गेली. त्यानंतर त्याचा निषेध म्हणुन अनेक “नाराज” कार्यकर्ते नियोजीत ठिकाणी गोळा झाले आणि त्यानंतर त्यांनी ईतर घोषणांसोबतच, देशविरोधी घोषणाही द्यायला सुरवात केली. ज्यावेळी हा सर्व प्रकार सुरु होता त्यावेळी कन्हेया हॉस्टेलवर होता .असही त्याचा या कार्यक्रमाशी काही संबंध नव्हता. कॅंपसमधे घोषणाबाजी सुरु झाली. अभाविपचे विद्यार्थीही तिथे जमा झाली आणि ही परिस्थीती तणावपुर्ण बनल्यानंतर कन्हेयाला हॉस्टेलवरुन बोलावण्यात आल. ज्यावेळी तो घटनास्थळी आला त्यावेळी जवळपास घोषणा देवुन झाल्या होत्या. या सगळ्या घटनाक्रमाबद्दलच स्पष्टीकरण कन्हेयाने दुसर्या दिवशी विविध वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीमधे दिल आहे. १० तारखेला ईंडिया न्युजवर झालेल्या दिपक चौरासिया सोबतच्या चर्चेमधे त्याने हे सगळे खुलासे केले. ( हे मी माझ्या मनाने लिहित नसुन युटुब वर ती संपुर्ण चर्चा आहे. खात्री करुन घेवु शकता. युटुब वर फ़क्त Deepak Chourasiyaa JNU अस सर्च मारा )
३) ज्यावेळी १० तारखेला कन्हेया ईंडिया न्युजच्या ( दिपक चौरासिया ) कार्यक्रमात त्याची बाजु मांडत होता त्यावेळी त्याने तिथे जाहीर केल होत कि “देशविरोधी घोषणांच” आम्ही कुठेही समर्थन केलेल नाही. उलट त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही उद्या सकाळी एकत्र येणार आहोत. ठरल्याप्रमाणे ११ तारखेला ते सर्वजण सकाळी नियोजीत ठिकाणी जमा झाले आणि कन्हेयाने तिथे केलेल्या भाषणामधे जाहीर करुन टाकल कि “आपण देशविरोधी घोषणांच कधीही समर्थन करणार नाही, करतही नाही”. त्याच भाषणामधे कन्हेयाने “मनुवाद से आझादी” “गरीबी से आझादी” “भुकमारी से आझादी” “बीजेपी से आझादी” “संघ से आझादी”.. यांसारख्या घोषणा केल्या.
४) कन्हेयाने त्याच दिवशी पुन्हा एकदा दिपक चौरासियाच्या चर्चेमधे भाग घेतला. पण यावेळी त्याला फ़ार काही बोलुच दिल नाही.
५) नंतर कन्हेयाचे काश्मीर साठी आझादी मागितल्याचे विडीओ सगळीकडे वायरल झाले. ईंडिया न्युज आणि झी न्युजने सगळीकडे तो विडीओ पसरवला. तश्या पद्धतीच्या बातम्या दिल्या गेल्या आणि त्या दिवशी पोलिसांनी येवुन कन्हेयाला अटक केली.
.
आता या घटनाक्रमावर आणि कन्हेयाच्या भुमिकेवर आपण जे विडीओ वायरल झालेत त्यानुसार एक एक गोष्ट इथे बघु. इथे एक गोष्ट नीट लक्षात ठेवली पाहिजे कि कन्हेयाने त्याची बाजु १० तारखेलाच ईंडिया न्युज वर मांडलेली आहे आणि त्यानंतर एक एक विडीओ समोर येत गेले आहेत. मग जस जसे विडीओ येत गेले, तस तसे कन्हेया त्याची भुमिका मांडत गेला अस घडलेल नाहीये. सो, ही गोष्ट लक्षात घेवुनच विडीओचा घटनाक्रम बघुया.
A) पहिला विडीओ ज्यामधे “काश्मीरची आझादी, अफ़झल गुरु,मकबुल भटच्या नावाने घोषणा दिल्या जात आहे. या विडीओ मधे पुर्ण अंधार आहे आणि “एकाचाही” चेहरा यामधे स्पष्ट दिसत नाहीये.ना कन्हेयाचा ना उमरचा. फ़क्त देशविरोधी घोषणां दिल्याच दिसतय.
त्याच दिवशी अजुन एक विडीओ समोर आला ज्यामधे उमर खालीदचा चेहरा अगदी स्पष्टपणे दिसतोय. मक्बुल भट आणि अफ़झल गुरुच्या नावाने घोषणा दिल्या जात आहेत.उमर खालीदच्या समोरच या घोषणा सुरु आहेत.कन्हेयाने जस सांगितल होत त्या प्रमाणे तो यावेळी होस्टेलवर होता आणि त्याला बोलावुन घेण्यात आल हे खाली दिलेल्या विडीओ मधे स्पष्ट होत आहे..
या विडीओ मधे कन्हेया कुठेच नाहीये. फ़क्त उमर खालीद आहे. अजु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि जर विडीओ मधे उमर खालीद इतक्या स्पष्टपणे येवु शकतो तर मग कन्हेया तिथे हजर असेल तर तो १०१ % विडीओ मधे यायलाच पाहिजे होता. कारण उमर पेक्षा तो सर्व बाजुंनी मोठा आहे..एक विद्यार्थ्यंचा अध्यक्ष आहे..इतर सर्व त्याचे वीडीओ आणि भाषण बघितली तर तो “सेंटर ऑफ़ दी अट्रॅक्शन” आहे हे दिसुन येत. ज्या अर्थी तो या विडीओ मधे घोषणांच्या वेळी दिसत नाहीये याचाच अर्थ त्यावेळी तो तिथे हजर नव्हता हे बर्यापैकी स्पष्ट होत..
आता दुसरी आणि “सर्वात” मह्त्वाची गोष्ट म्हणजे या विडीओ मधे ४ मिनिट-८ सेकंदाचा पार्ट “काळजीपुर्वक” बघा. जवळपास साडेचार मिनिटाचा हा विडीओ आहे आणि कन्हेया त्या ठिकाणी ४ मिनिटानंतर आलेला आढळतो. त्यातही त्याचा चेहरा दिसत नाही पण एका विद्यार्थ्याने त्याच नाव घेतलेल स्पष्टपणे दिसत आहे. ज्यावेळी ४ मिनिट होतात त्यावेळची काही वाक्ये नीट ऐका..
१) कन्हेया बोलतो : आप कौन हो भैया..? २) आय डी कार्ड है..?? ३) एक विद्यार्थी: अरे कन्हेया, उससे भी आय-डी कार्ड पुछले… ४) JNU से कौन है..???
आणि इथे ४ थ्या वाक्यानंतर तुम्हाला कन्हेया दिसायला लागतो…तो म्हणजे घोषणा देणारे आणि विरुद्ध गटाच्या मध्यभागी..सर्वांना शांत करताना..एक मध्यस्ती म्हणुन.
“या विडियो मधे अजुन एक सर्वात मोठी गम्मत आहे ज्यावर अजुन पर्यंत कुणीही बोलत नाहीये. बीजेपीचे नेते, अभाविप, त्यांचे भक्त आज एक प्रश्न राहुन राहुन विचारत आहेत कि ” जरी कन्हेयाने “या रात्री” स्वत: घोषणा दिल्या नसतील तरी किमान त्याने घोषणा देणार्यांना अडवल का नाही..??? ज्यावेळी घोषणा दिल्या जात होत्या त्यावेळी तो तिथे हजरच नव्हता आणि सगळ झाल्यावर तो तिथे पोचला होता हे विडीओ बघुन लक्षात येतच..त्यामुळे त्यांने कुणालाही विरोध करण्याचा वा अडवण्याचा प्रश्नच उभा राहत नाही..पण ही सर्व भक्त मंडळी, त्यांचे नेते, अभाविप यांनी हाच प्रश्न “दिल्ली पोलिसांना” का नाही विचारला याच उत्तर कुणी देईल का..?? खाली दिलेल्या विडीओ मधे ४० व्या सेकंदापासुन बघा, तिथे तुम्हाला “दिल्ली पोलिस” घटनास्थळी हजर झालेले दिसत आहेत..त्यानंतर २ मिनिट ४० सेकंदाच्या इथला भाग बघा..तिथे तुम्हाला अफ़झल, काश्मीर, मकबुल यांच्या आझादीच्या घोषणा बघायला मिळतील..ज्यावेळी अफ़झल आणि मकबुलच नाव घेवुन काश्मीरची आझादी मागितली जात होती त्यावेळी “दिल्ली पोलिस” तिथेच हजर होती..त्यांनी घोषणा थांबवल्या नाहीत..त्यांनी विरोधही केला नाही, त्यांची देशभक्ती सुद्धा जागी झाली नाही आणि अजुनही “दिल्ली पोलिसांना” याबाबत हा प्रश्न कुणी विचारलाही नाही. जो कन्हेयाला विचारला जातोय..अवघड आहे.
आता झी न्युजने जे विडीओ “कट” करुन पसरवले, ज्यामधे कन्हेया फ़क्त तिथे घोळक्यांमधे मध्यस्ती करताना दिसतोय. ( ४थ्या वाक्यानंतर लोकांना शांत करत असताना ) पण मिडीयाने जाणीवपुर्वक अस पसरवल कि घोषणा देताना कन्ह्येया तिथे हजर होता.
याउलट तुम्ही खाली दिलेला “कट” न केलेला “पुर्ण” विडीओ बघितला तर लगेच लक्षात येत कि कन्ह्येयाने दिपक चौरासियाच्या कार्यक्रमात जे सांगितल होत त्याला हा विडीओ नक्कीच आधार आहे.
त्याने सांगितल्याप्रमाणे तो घोषणा द्यायच्या वेळी तिथे नव्हता त्याला हॉस्टेल वरुन बोलावल..विडीओ मधे पण तेच दिसत आहेत कि ज्यावेळी घोषणा सुरु आहेत त्यावेळी फ़क्त उमर खालीद दिसत आहे.
कन्हेयाच्या म्हणण्यानुसात तो नंतर तिथे आला हेही विडीओ मधील ४ मिनिटांनतरचा भाग बघितल्यावर लगेच लक्षात येत. आणि जसा तो घटनास्थळी आला तस त्याने लगेच विद्यार्थ्यांचे आय डी कार्ड चेक करायला सुरवात केली. कोण कॉलेजमधलीच पोर आहेत अन कोण बाहेरची हे तपासायला सुरवात केला. सो “राडा” झाल्यानंतर एका अध्यक्षाला बोलावुन घेतल्यावर त्याला गेल्या गेल्या जे करायला हव होत, ते त्याने करायला सुरवात केली. वातावरण शांत करायचा प्रयत्न केला..पण मिडीयाने मात्र फ़क्त शेवटच्या १० सेकंदाचा विडीओ पसरवला आणि कन्हेयाला तिथे घोषणा देताना हजर करुन टाकल..संपुर्ण विडीओ असताना झी न्युजने सुरवातीला असे “कट’ केलेले विडीओ पसरवायला सुरवात केली..आणि लोकांच्या भावनांशी खेळायला सुरवात केली. टीआरपी साठी इतक्या खालच्या दर्जाला जावुन तमाम भारतीयांना “मिसगाईड” करण हा माझ्या मते सर्वात मोठा देशद्रोह मानायला पाहिजे. ( पुर्ण विडीओ इथे बघा https://www.youtube.com/watch?v=33WVA-8YJUA )
B) पहिल्या रात्रीचे हे घोषणांचे विडीओ झी न्युजने अश्या चुकिच्या पद्धतीने पसरवल्यांनंतर लोकांमधे असंतोष निर्माण झाला. सगळीकडुन टिका होवु लागली. अन यामधे उमर सोबतच, कन्हेयालाही दोषी गृहीत धरल जावु लागल. आणि म्हणुन त्या दिवशी विविध वाहीनींवर त्या दोघांना चर्चेसाठी बोलावण्यात आल. जिथे त्यांनी आपापली बाजु मांडली. त्या दिवशी कन्हेयाने सांगितल्या प्रमाणे कन्हेया त्याच्याच दुसर्या दिवशी पुन्हा एक भाषण केल. त्यामधे त्याने “देशविरोधी घोषणांचा” निषेध केला आणि इतर मुद्यांवर (बीजेपी, स्मृती ईरानी, रोहीत, मनुवाद, संघ वैगेरे) आपली बाजु मांडली. तिथे भाषण देत असताना उमर सुद्धा त्याच्या बाजुला उभा होता कारण मिडीयाच्या सांगण्यावरुन संपुर्ण देशाने त्या दोघांना देशद्रोही घोषीत करुन टाकल होत. सो ते दोघे जरी वेगवेगळ्या विचारसरणीचे असले, वेगवेगळ्या गृपमधले असले तरी रातोरात त्यांच्यावर एक आरोप लागला होता तो म्हणजे देशद्रोहाचा..आणि हा दोघांवरही “कॉमन” आरोप होता. सो, साहजिकच कन्हेया, त्याची आणि JNU ची बाजु मांडण्यासाठी ज्यावेळी भाषण करणार होता त्यावेळी “कॉमन” आरोप असल्याच्या कारणाने उमर तिथे हजर असण रास्त होत. आता तुम्ही खालील विडीओमधील कन्हेयाच भाषण पुर्ण ऐकल तर त्यात कुठही देशविरोधी वक्तव्य दिसुन येत नाही. त्याने दिलेल्या घोषणाही अगदी स्पष्ट आहेत. त्या म्हणजे “मनुवाद से आझादी, गरीबी-भुकमारी से आझादी, संघ से आझादी, बीजेपीसे आझादी..वैगेरे”
झी न्युजने इथे सुद्धा परत एक मोठा घाणेरडा खेळ खेळला. त्यांनी कन्हेयाच हे संपुर्ण भाषण प्रसारीत न करता “कट” करुन एक नवीन विडीओ बनवला आणि तिथे फ़क्त “आझादी” बोलणारी वक्तव्य घेतली. वर त्यांनी असही जाहीर केल की कन्हेया काश्मीर साठी आझादी मागत आहे आणि उमर त्याच्या सोबत उभा आहे..
झाल, तो विडीओ प्रसारीत झाल्यावर देशातील जनता अजुन खवळली. आता त्यांनी कन्हेया वरील देशद्रोहाचा शिक्का, अगदी पक्का करुन टाकला. कुठलीही शहानिशा करायच्या भानगडीत लोक पडत नव्हते..तशी त्यांना गरजही वाटली नाही. यामधे लोकांनाही फ़ार दोष देवुन चालणार नाही कारण मिडीयाने लोकांच्या भावनांचा पुरेपुर वापर केला होता.
अजुने ऐक मह्त्वाची अन टेक्निकल गोष्ट. जर झी न्युज फ़क्त आझादीवाला “कट” केलेला विडीओ प्रसारीत करायचा असेल तर याचा अर्थ त्यांच्याकडे कन्ह्येयाच संपुर्ण भाषण केलेला विडीओ होता. संपुर्ण विडीओ असल्या शिवाय ते “कट” करुच शकत नाही. अस असताना, खरी बाजु माहीत असताना, झी न्युज- ईंडिया न्युज हे जाणीवपुर्क हा खेळ खेळत राहीली. पुर्ण विडीओ प्रसारीत करण्यापेक्षा पुम्हा एकदा कट केलेला छोटा विडीओ प्रसारीत केला गेला. या दिवशी सुद्धा त्यांना देशाचा आणि सर्व भारतीयांचा भावनेंचा व्यापार करावासा वाटला. टीआरपी जास्त मह्त्वाची वाटली.
हा तो फ़ेक विडीओ, कट केलेला विडीओ आहे जो सगळीकडे पसरला. सगळीकडे त्याची चर्चा झाली. ज्यामधे फ़क्त “आझादी” “आझादी” हा शब्द आहे. आणि काही मोजक्या सेकंदाचा हा विडीओ आहे. या “फ़ेक” विडीओ मधे कन्हेयाच्या आजु बाजुला जे विद्यार्थी उभे आहेत त्या सगळ्यांच्या पोजीशन्स आणि कपडे नीट बघुन ठेवा. नंतर एका मुद्द्यामधे या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. आत्ता फ़क्त “फ़ेक” बघुन ठेवा
( https://www.youtube.com/watch?v=UATxijA9rn4 )
.
हा ओरीजनल विडीओ. हे संपुर्ण भाषण,
( https://www.youtube.com/watch?v=21qExVVuhhk )
ओरीजनल विडीओ, वेगवेगळ्या अॅंगलने
( https://www.youtube.com/watch?v=SadQ3U9j_X0 )
.
C) हळु हळु एक एक विडीओ समोर येउ लागला आणि या प्रकरणातील फ़ोलपणा अनेकांच्या लक्षात आला. झी न्युज आणि इंडिया न्युज यांनी, हे विडीओ कश्या पद्धतीने पसरवले आणि त्याचा वापर टीआरपी साठी कसा करुन घेतला हे सुद्धा क्लिअर झाल. आणि मग INDIA TODAY, NDTV, ABP, AAJ TAK सारख्या वाहिन्यांनी या सर्व बाबींवर प्रकाश टाकायला सुरवात केली. झी न्युज -ईंडिया न्युज ने विडीओ कसे ऐडीट केली, डबींग कस केल, देशद्रोही घोषणा देणार्या विडीओ मधील वाक्ये उचलुन, कन्हेयाच्या भाषणाच्या विडीओ मधे कशी टाकली गेली, मिक्सिंग कस झाल…हे सर्व बाहेर यायला लागल. अगदी टेक्निकल बाबींवर प्रकाश टाकुन India Today ने हे सप्रमाण सिद्ध केल कि विडिओ मधे “छेडछाड” केली गेली आहे.
कन्हेया, हा उमर सोबत उभा राहुन काश्मीरच्या आझादीच्या घोषणा देणारा जो विडीओ आपण बघतोय..त्या विडीओ मधे “पहिल्या रात्री ज्या काश्मीरच्या आझादीच्या घोषणा दिल्या गेल्या त्या विडीओ मधील आवाज उचलुन, तो आवाच कन्हेयाच्या भाषणामधे मिक्स करण्यात आला..आणि जिथे कन्हेया “मनुवाद, बीजेपी, संघ, गरीबी-भुकमारी” ची आझादी मागत होता तिथे आपल्याला “काश्मीरची आझादी” ऐकायला मिळु लागली..कन्हेयाने उमर सोबत उभ राहुन कुठेही कुठेही काश्मीरची आझादी मागितली नाही हे वर दिलेल्या विडीओ मधे अगदी स्पष्ट झालेल आहे. झी न्युज -ईडिया न्युजने मिक्सिंग करुन मोजुन १० सेकंदाचा जो विडीयो पसरवला. लोकांनी त्यालाच खर मानल पण त्याच संपुर्ण भाषण ऐकुण शहानिशा करण्याची तसदी एकानेही घेतली नाही..
मी INDIA TODAY, NDTV, ABP, AAJ TAK यांचे एक नागरिक म्हणुन आभारच मानतो कि त्यांनी झी न्युज आणि ईंडिया न्युजची “काळी” बाजु लोकांसमोर आणली. या सगळ्या प्रकाराला कंटाळुन झी न्युजच्या प्रोडुसरने तातडीने राजीनामा दिला शिवाय त्याने झी न्युजने विडीओ मधे मिक्सिंग केल्याच मान्यही केल.
हा तो विडीओ, ज्यामधे INDIA TODAY सर्व बाजु “टेक्निकली” मांडल्या आणि सिद्ध केल कि कन्हेयाच्या भाषणाच कस मिक्सिंग केल गेल.
( https://www.youtube.com/watch?v=Wc5DUoO-7e4&app=desktop )
आणि ही ती बातमी ज्यामधे झी न्युजने मिक्सिंग केल्याची कबुली, त्यांच्याच प्रोड्युसरने दिली.
http://www.thenewsminute.com/article/are-we-mouthpiece-bjp-or-rss-zee-news-producer-quits-over-jnu-coverage-39316
D) आता INDIA TODAY ने झी न्युज आणि ईंडिया न्युजची काळी बाजु समोर आणल्यावर गप्प बसेल तो दिपक चौरासिया कुठला..??? त्यांनी INDIA TODAY चा दाव्याला खोट ठरवल आणि स्वत:ला खर सिद्ध करण्याचा एका अपयशी प्रयत्न केला. त्यांनी यावेळी त्यांनी असा दावा केला कि त्यांनी दिलेला विडीओ खरा आहे आणि याचा आधार म्हणुन तो काश्मीरच्या आझादीवाला उमरसोबतचा छोटा विडीओ दिला. पण तो फ़ेक आहे हे India Today ने सप्रमान सिद्ध केल आहे त्यावर ते कसे चुकिच आहे..?? हे मात्र ईंडिया न्युजवाले सांगत नाहीत. बर कन्हेयाच जवळ पास ३० मिनिटाच भाषण आहे आणि ईंडिया न्युज वाले त्यातल फ़क्त १० सेकंदाचीच (मिक्सिंग) केलेली क्लिप परत परत दाखवत आहे आणि लोकांना यावर विश्वासही ठेवायला सांगतायेत. पण मग लोकांनी फ़क्त १० सेकंदाच्या क्लिपवर का विश्वास ठेवावा आणि संपुर्ण विडीओ वर का नको..?? हे मात्र ईंडिया न्युज वाले सांगत नाहीत. आता देशातील कुठलाही नागरीक हा संपुर्ण विडीओ वर विश्वास ठेवेल का एका १० सेकंदाच्या क्लिपवर..???
बर कन्हेयाने आधी काश्मीरच्या आझादी साठी घोषणा दिल्या आणि नंतर त्याने “मनुवाद, गरीबी-भुकमारी” च्या आझादी घोषणा दिल्या…
अस जर असेल तर मग
दोन्ही विडीयो मधे कन्हेया व ईतर मंडळींचे हाव भाव एकसारखे कसे..??
कन्हेयाच्या बाजुला उभा असलेला उमर, मागे उभी असलेली मुलगी, डाव्या बाजुला उभा असलेला मुलगा, आजुबाजुला असणारी सगळी मंडळी, त्यांचा उभ्या राहण्याचा जागा, त्यांनी घातलेले कपडे, कन्हेयाच्या भाषणाला दिलेला रिस्पोन्स…भाषणाच लोकेशन हे सगळ एकसारख कस असु शकत…??? कस शक्य आहे हे.
हे त्याच वेळी शक्य होत ज्यावेळी एका विडीओ मधे, दुसर्या विडीओ मधील आवाज मिक्स केला जातो..जेणेकरुन सर्व गोष्टी एकसारख्याच राहतात आणि आवाज (घोषणा) फ़क्त वेगळा असतो…
ईंडिया न्युज च्या या दाव्यामधे काहीही सापडत नाही..शिवाय त्यांच्या फ़क्त १० सेकंदाच्या क्लिपवर का विश्वास ठेवायचा..?? हे सुद्धा ते सांगत नाही. संपुर्ण भाषण केलेला विडीओ बघितला तर त्यांचा दावा किती चुकिचा आहे हे लगेच लक्षात येत.
हा ईंडिया वाल्यांचा दावा केलेला विडीओ
हा ओरीजनल विडीओ. हे संपुर्ण भाषण,
( https://www.youtube.com/watch?v=21qExVVuhhk )
वेगवेगळ्या अॅंगलने
( https://www.youtube.com/watch?v=SadQ3U9j_X0 )
.
.
हे सगळ बघुन एकच लक्षात येत कि झी न्युज आणि ईंडिया न्युज ने अश्या पद्धतीने लोकांच्या भावनेशी खेळ केला आहे. टीआरपी साठी यांनी किती खालची पातळी गाठली हे बघुन प्रचंड चीड यायला लागली आहे. लोकशाही चौथा स्तंभ म्हणुन आपण जो दर्जा त्यांना दिलेला आहे त्या दर्जाला शोभल अस काम त्यांच्याकडुन आज होताना दिसत नाहीये. देशाच्या प्रती, समाजाच्या प्रती असणार्या जाणीवांना ह्यांनी कधीच तिरांजली दिली आहे.आज त्यांच्या टीआरपीच्या खेळात संपुर्ण देशाच वातावरण ढवळुन निघाल आहे. समाजा-समाजामधे, धर्मा-धर्मामधे द्वेषाला मोठ्या प्रमाणावर खतपाणी घातल गेलय..याची फ़ळे येणार्या काळात आपल्यालाच भोगावी लागतील.
घोषणा देणारे बाजुला राहिले आणि कन्हेयाचा वापर फ़क्त स्वत:च्या टीआरपी साठी अश्या पद्धतीने करुन घेताना त्यांनी एकदाही या गोष्टींचा विचार केला नाही कि या सगळ्याचा परिणाम भविष्यात काय होवु शकतो..??
आज ज्या सर्वसामान्य माणसाने कन्हेयाला देशद्रोही घोषीत केल आहे त्यामधे त्याची काही चुक नाही. त्याचा “दृष्यम” झालाय.. विषयच ईतका संवेदनशील होता कि मिडीयाने दाखवलेल्या गोष्टींवरच तो एका पाठोपाठ एक असा विश्वास टाकत गेला. एकदाही त्याच्या मनाला हा विचार शिवला नाही कि यामधे मिडीयाची अशी एक काळी बाजु सुद्धा असु शकते..
प्रसारमाध्यंना लोकांपेक्षा , टीआरपी जास्त महत्वाची वाटु शकते याचा विचारच आपण केला नाही. भावनांना हात घातला कि भारतीत समाज विचार करन सोडुन देतो हे “त्यांना” चांगलच ठावुक आहे.
हे सगळ यासाठी लिहिल आहे कारण हा देशाचा रिमोट कंट्रोल आता मिडीयाच्या हातामधे आहे. या देशातील सर्वात मोठे न्यायाधीश आता रोज रात्री चर्चेला बसतात आणि ऑन दी स्पॉट निकालही देतात.
कन्हेया निर्दोष आहे यासाठी हा लेख प्रपंच नाहीये..कोर्टात काय होत आहे हे माहीत नाही..अजुन कुठले पुरावे समोर येतील माहीत नाही. त्यामुळे कन्हेयाला “आत्ताच” निर्दोष म्हणुन मान्यता देण मला योग्य वाटत नाही..पण त्याला देशद्रोही म्हणाव हे सुद्धा मला मान्य नाही.
कन्हेया दोषी आहे कि निर्दोष हे कोर्ट ठरवेल आणि कोर्ट जो निकाल देईल तो मला मान्यही असेल. पण जोपर्यंत कोर्ट त्याचा निकाल देत नाही तो पर्यंत त्याला देशद्रोही म्हणाव अस माझ्याकडे काहीही कारण नाही. झी न्युज सारख्या लोकांनी अर्धवट, कट केलेल्या क्लिपींगच्या आधारावर तर नक्कीच नाही.
अभाविपचा सुद्धा एक विडीओ मार्केटला आला आहे ज्यामधे “पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारे दुसरे कुणी नसुन अभाविपचे कार्यकर्ते आहेत. घोषणा देताना त्यांचे चेहरे अगदी स्पष्ट दिसत आहेत..मग हाच न्याय त्यांनाही लावणार आहात का.?? अभाविप ला पण देशद्रोही म्हणणार का..?? आम्ही तरी नाही बोलणार..कायदा, पोलिस बघुन घेतील काय ते..सत्यता तपासतली ते..उतावळेपणा आम्ही तरी नाही करणार..
आज जे लोक कन्हेयाला देशद्रोही बोलत आहेत त्यासाठी, त्यांच्याकडे कसलाही आधार नाहीये.
कोर्ट जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत तरी कन्हेया देशद्रोही नाहीये हे म्हणायला मला किमान वाव तरी आहे. संविधानावर विश्वास ठेवुन वाट बघण्यातच शहाणपणा आहे……..!!!!
( हा विडिओ सर्व माध्यमांच्या प्रतीनीधींनी आवर्जुन बघावा आणि आत्मचिंतन जरुर करावे.) https://www.youtube.com/watch?v=shZf-NrSbu0&feature=share