महत्त्वाचं म्हणजे, पारंपरिक प्रतीकं वापरल्यानं सामान्य माणसाशी नातं जोडणं गांधीजींना आणखी सोपं गेलं. संवाद हा फक्त शब्दांनी होत नसतो, हे त्यांना नीटपणे समजले होते. ‘कम्युनिकेशन सायन्स’ आता सांगते की शब्दावाटे होणाऱ्या संवादापेक्षा शब्दाशिवाय होणारा संवाद अधिक प्रभावी असतो. हे ‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’ गांधीजींना त्यांच्या आतल्या आवाजाने सांगितले होते. गांधीजींचे व्यक्तिमत्त्व आणि कृती हा एक संवादच तर होता.
श्री संजय आवटे सर यांचा लेख अप्रतिम आहे.महात्मा गांधी अद्यापही जिवंत आहेत आणि राहतील असा विश्वास ठासून बिंबाविण्याची क्षमता असलेला लेख मनात खोलवर रुजला..
गांधी हा अमर चं, तो एवढा सहज कळणार नाही,किमान नथुराम ला तरी