-अजित अनुशशी
सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात झेंडा
त्याला सलाम,
शिंग टोचायच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
Whatsappला सलाम,
फेसबुकला सलाम,
ते विकत घेणार्याला सलाम,
विकत घेण्याचा इशारा करणार्याला सलाम,
सलाम, भक्तो
सबको सलाम.
देशभक्तांना सलाम,
त्यांच्या मोठ्ठया मोठ्ठया रजिस्टरांना सलाम,
त्यांच्या भव्यदिव्य मंदिरांना सलाम,
विद्यापीठावर केलेल्या ‘देशप्रेमी’ हल्ल्याना सलाम…
त्यांनी जे काही केलं, करतायत किंवा करू शकतील त्या सगळ्या सगळ्यांना घाईघाईने, ताबडतोब, विनाअट सलाम…!!
आलेल्या प्रत्येक forwardला सलाम,
नेहरूंविषयी गरळ ओकणाऱ्या पोस्टला सलाम,
आयाबहिणीविषयी अश्लील लिहिणाऱ्या ट्रोल्सला सलाम,
पंतप्रधान फॉलो करतात त्यांच्या धाकाला सलाम,
विद्यापीठांच्या बदनामीचे कंत्राट घेणाऱ्या Anchorला सलाम,
त्याचं ऐकून झालेल्या गुंडांच्या हल्ल्याला सलाम,
सनातनला सलाम,
भिडेगुर्जीला सलाम,
झुंडशाहीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम,
गृप्सवर तुटून पडणाऱ्या अर्धवट विद्वानांना सलाम,
त्यांना सत्तर पैशे देणाऱ्या योध्ध्यांना सलाम,
योध्ध्यांची पाठ थोपटणारया
तडीपारान्नाही सलाम,
सलाम,प्यारे भाईयों और भैनों,
सबको सलाम.
ज्याच्या हातात प्राईम टाईम
त्याला सलाम,
खोट्या बातम्या, रेकोर्डिंग
बिनधास्त दाखवून विष पेरतो त्याला सलाम,
पाकिस्तानहून शिव्या खायला मागवलेल्या जनरलला सलाम
त्यांना पैशे फेकणाऱ्या
मालकांना सलाम,
ज्याच्या समोर टीव्ही कॅमेरा
त्याला सलाम,
त्यातून लोकांना बोलू न देता बोलतो
त्याला सलाम,
लाखोंच्या झुंडीला सलाम,
मित्रो म्हणणाऱ्या
जुमलेबाजांना सलाम,
मित्रो और भक्तो, सबको सलाम.
नाक्यावरच्या गोरक्षकाला सलाम,
फुटून गेलेल्या नेत्यांना सलाम,
त्यांच्या थांबलेल्या इडी चौकशीला सलाम,
क्लीनचीटला सलाम,
त्यांनी मोकाट सोडलेल्या मंत्र्यांना सलाम,
नोटबंदीला सलाम,
जीएसटीलाबी सलाम,
सीबीआयचा ट्रक चालविणार्यांना सलाम,
त्याखाली सोयीने सापडलेल्या,
विरोधी नेत्यांनाबी सलाम,
ज्याने नोटा बदलल्या, त्याला सलाम,
रांगा लावून मानसं मेल्यावर राष्ट्रभक्ती आठवनार्याना सलाम,
त्यात कमिशनवर नोटा बदलून देणार्यांना सलाम,
त्यातून निवडणुका लढणार्यांना सलाम,
काला धन संपवून टाकण्याची घोषणा करणार्यांना सलाम,
१५ लाखांनी सर्वांची पाकीट भरणार्यांना सलाम,
नागरिकांना बांधलेल्या जीपला सलाम,
‘फुटीरतावाद्या’सोबत सत्तेत बसणार्यांना सलाम,
बेलगाम खोटारडी भाषणं करू शकणाऱ्या सर्वांना सलाम,
सलाम, प्यारे मित्रो, सबको सलाम.
माझ्या मेक इन इंडिया, stand up इंडिया, न्यू इंडियावाल्या सरकारला सलाम,
या महान सरकारच्या महान प्रधानसेवकाला सलाम.
सर्व जुमलेबाज घोषणांना सलाम,
खाप पंचायतींना सलाम,
त्या पंचायतीतून मुली पोटात मारून टाकणार्यांना सलाम,
गणपतीच्या DNA विज्ञानाला सलाम,
चित्रपट बंद पाड्नार्याना सलाम,
त्यांतून निवडणुका जिंकणार्यांना सलाम,
बदललेल्या नोटांना सलाम,
त्यातून आलेल्या निवडणूक फंडाला सलाम,
कपाळावरच्या अदृष्य शेंदुराला सलाम,
दंगली पेटवून मिळालेल्या मतांना सलाम,
सोयीच्या वेळी सापडणार्या दहशतवाद्यांना सलाम,
त्यांना ताबडतोब एन्काउन्तर करणाऱ्या पोलिसांना सलाम,
दलितांना दगडाने चेचून मारणार्यांना सलाम,
त्या नंतरही सत्तेत राहणार्या सर्व षंढांना सलाम,
सलाम, भाइयों और भैनों, सबको सलाम.
काश्मिरात सलोख्याने राहायला हवं म्हटले
तर देशद्रोही म्हणून ठोकतील,
बाईपेक्षा गाईला जपणाऱ्याचा देश म्हटलं म्हटले
तर सिक्युलर म्हणून झोडतील,
आपल्याच नागरिकांना पेपर्स मागू नका म्हटलं
तर नोकरीवरून काढतील,
मनुविषयी, बुरसटलेल्या रूढीविषयी वाईट बोललं
तर मॉर्निंगवॉकला गाठून मारतील,
शोषण करणार्यांना उघड्यावर पाडलं
तर घरात घुसून गोळ्या झाडतील,
म्हणून आधी माझ्या libtaard, prestitute, सिक्युलरपणाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या माझ्या
मेक इन इंडिया, stand up इंडिया, न्यू इंडियावाल्या सरकारला सलाम,
या महान सरकारच्या महान प्रधानसेवकाला सलाम.
सलाम प्यारे भक्तो और मित्रो, सबको सलाम,
अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिन माफ करना भाइयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
शिंग टोचायच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम,
सलाम, सबको सलाम,
मित्रो और भक्तो,सबको सलाम.
(मंगेश पाडगावकर परवानगी देतीलच, या खात्रीनीशी..).