मिशन एआय: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चित्तथरारक विश्‍वात

-शेखर पाटील

लिहून ठेवा येणार काळ आपल्यासाठी अतिशय चित्तथरारक असेल. कारण एआयचा (आर्टिफिशियल इंटिलेजियन्स) वापर आता विलक्षण गतीने वाढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चॅट जीपीटीबाबत विलक्षण चर्वण सुरू असतांनाच आता याचीच पुढील अद्ययावत आवृत्ती म्हणजेच ‘जीपीटी-४’ अधिकृतपणे लॉंच करण्यात आली आहे. यासोबत गुगलने आपल्या जी-मेल आणि डॉक्समध्ये एआयने युक्त असणारी सुविधा दिलेली आहे. तर लिंक्ड-इनवरही याच प्रकारचे टुल दाखल झाले आहे. तंत्रज्ञानात एकाच वेळेस इतक्या मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने, जे कुणी बुध्दीमत्तेवर आधारित नोकरी वा व्यवसाय करतात, त्या सर्वांना याबाबतची माहिती जाणून घेणे अगत्याचे ठरते. याचमुळे साध्या-सोप्या मराठीत ही माहिती आपल्यासाठी सादर करत आहे.

‘आर्टिफिशियल इंटिलेजियन्स’ अर्थात कृत्रिम बुध्दीमत्ता मानवी सृजनशीलता आणि रचनात्मकतेला फार लवकरच आव्हान देऊ शकणार नाही, असे आजवर अनेकांना वाटत होते. मलादेखील किमान २०२५ नंतर ही स्थिती येईल असे वाटायचे. मात्र चॅट जीपीटीनंतर एआयच्या क्षेत्रात घडलेल्या घडामोडी पाहता हा अंदाज पूर्णपणे कोसळून पडल्याचे दिसून आले आहे. आपण समजतो त्यापेक्षा प्रचंड गतीने भविष्योन्मुखी तंत्रज्ञानाने आपल्याला वेढले आहे. सुदैवाने मला ‘चॅट जीपीटी’ हे बीटा व्हर्जनमध्ये वापरण्यास मिळाले असले तरी याचे खरे महत्व हे टुल सर्वांना उपलब्ध झाल्यानंतरच समजले. आज चॅट जीपीटी हे जगभरात ट्रेंडींगला असून याबाबत सर्वांना मोठी उत्सुकता असतांनाच याचीच पुढची आवृत्ती ‘जीपीटी-४’ या माध्यमातून लॉंच करण्यात आली.

जीपीटी-४ ही चॅट-जीपीटीचीच नवीन आवृत्ती असून याचा इंटरफेस हा देखील त्याच्या सारखाच आहे. अर्थात, यात काही नवीन बाबींचा समावेश करण्यात आलाय. यात प्रामुख्याने जीपीटी-४ ही आवृत्ती इमेज प्रोसेसींग देखील करू शकते. साध्या शब्दांमध्ये सांगावयाचे तर आपण आधी फक्त शब्दांनी कमांड देऊ शकत होतो, तर आता प्रतिमा आणि आकृती यांनी देखील आज्ञावली देता येणार आहे. एका अर्थाने कृत्रिम बुध्दीमत्ता आता पाहू देखील शकणार आहे. यासोबत चॅट-जीपीटीमध्ये असणारी तीन हजार शब्दांची मर्यादा देखील तब्बल आठ पटीने म्हणजे २५ हजार शब्दांपर्यंत वाढविण्यात आली आहे. यातून लांबलचक विस्तृत कॉंटेंटची निर्मिती शक्य होणार आहे.

Video : Introducing GPT-4

Link : https://www.youtube.com/watch?v=–khbXchTeE

माझी चॅट-जीपीटी सोबत सलगी सुरू होत असतांनाच आता जीपीटी-४ चे आगमन झाले आहे. यात देखील बीटाचा ऍक्सेस मिळाल्याने याचा वापर देखील सुरू झाला आहे. दोन्ही आवृत्त्यांची तुलना केली असता जीपीटी-४ हे अर्थातच गतीमान आणि अधिक अचूक आहे. विशेष करून यात आधीपेक्षा जास्त सृजनशीलता आणि रचनात्मकता आढळून येते. अर्थात, नवीन आवृत्तीत देखील मिस -इन्फॉर्मेशनचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. यासोबत, अनेक घटकांबाबत एआयची क्षमता ही संभ्रमावस्थेत असल्याचेही दिसून येते. येत्या काही दिवसांमध्ये या त्रुटीवर नक्की मात केली जाईल हे निश्चित . पण, त्रुटी असून देखील हे तंत्रज्ञान इतके प्रगत आहे की, कुणीही अक्षरश: थक्क झाल्याशिवाय राहत नाही.

कुणी कितीही नाकारले तरी आजचे आपले जीवन हे तंत्रज्ञान केंद्रीत आहे. टेक्नॉलॉजीनुसार आपल्या आयुष्यात बदल घडत आहेत. आता कृत्रिम बुध्दीमत्ता म्हणजे एआयच्या आगमनामुळे या बदलांची गती विलक्षण पध्दतीत वाढलेली आहे. खरं तर, चॅट जीपीटी हेच काही एकमेव वा पहिले एआय टुल नाही. तर, याच्या किमान एक दशकापेक्षा जास्त काळापासून आपण कळत-नकळत वापर करतोय. याचा सर्वात लोकप्रिय वापर हा अर्थातच, सिरी, अलेक्झा, गुगल असिस्टंट आदी व्हॉईस कमांडवर आधारित व्हर्च्युअल असिस्टंटच्या माध्यमातून आपण अनेक वर्षांपासून करत आहोत. तर चॅटबॉटची सेवा देखील गेल्या काही वर्षांपासून विविध माध्यमातून वापरली जात आहेच. तथापि, चॅट जीपीटी आणि याची अद्ययावत आवृत्ती असलेल्या जीपीटी-४ मॉडेलची बातच न्यारी होय ! याचे एक महत्वाचे कारण म्हणजे याचा युजर इंटरफेस हा अतिशय सोपा असून यात मानवी बुध्दीमत्तेप्रमाणेच सर्जनशील कार्य करता येते. यामुळे अगदी साध्या कारकुनी कामापासून ते उच्च संगणकीय कोडींगचे काम अगदी सहजगत्या करणे शक्य झाले आहे. याच्या मदतीने अक्षरश: शेकडो कामांना स्वयंचलीत पध्दतीत करता येणार असल्याची बाब कोणाला नाकारता येणार नाही.

आपल्या दैनंदिन वापरात एआयचा वापर मोठ्या गतीने वाढणार असल्याची चुणूक आता दिसून येत आहे. एकीकडे ओपनएआय कंपनीने जीपीटी-४ लॉंच केले असतांनाच गुगलने जीमेल आणि डॉक्समध्ये एआयची सुविधा दिली आहे. यामुळे कुणीही कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून विविध डॉक्युमेंट आणि ई-मेल्स लिहू शकणार आहेत. समजा मला कुणा व्यक्तीला व्यावसायिक वा वैयक्तीक ई-मेल पाठवायचा असेल तर फक्त मी विषय सिलेक्ट केला अथवा त्या आशयाची कमांड दिल्यास माझ्यासमोर काही सेकंदात ई-मेलचा फॉर्मेट साकार होईल.

लिंक्डइन या प्रोफेशनल नेटवर्कने आपल्या युजर्ससाठी आता एआय टुल दिले आहे. या संकेतस्थळावर असणार्या अजस्त्र डेटाबेसचा वापर करून कंपनीने या टुलला विकसित केले असून याच्या मदतीने कुणीही आपले प्रोफेशनल प्रोफाईल अथवा अन्य लिखाण करू शकणार आहे. कॅनव्हा या अतिशय लोकप्रिय ग्राफीक डिझाईन संकेतस्थळाने देखील ‘टेक्स्ट टू इमेज’ या सुविधेसह ‘ऑटेमॅटीक रायटिंग’चे टुल प्रदान केले आहे. ‘शटरस्टॉक’ या ख्यातनाम संकेतस्थळानेही आता एआयच्या मदतीने इमेज निर्मित करण्याची सुविधा प्रदान केली आहे. तर याच्यासारखे अनेक टुल्स आता जबरदस्त पध्दतीत विकसित झालेली आहेत.

चॅट जीपीटी आणि जीपीटी-४आणि तत्सम एआय टुल्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधील ऑटोमेशनला विलक्षण गती मिळून अनेकांच्या रोजगारावर गदा येणार आहे. यात सृजनशील मानल्या जाणार्या पत्रकारितेसह अगदी कला, साहित्य आदी क्षेत्रांमध्येही आमूलाग्र बदल होतील हे निश्चीत. या बदलांची दिशा नेमकी कशी असेल हेच आजच सांगता येणार नसले तरी यासाठीची मानसिक तयारी आतापासूनच करून ठेवणे उत्तम. तर दुसरीकडे यातून अनेकांना करियरच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत. मी स्वत: गेल्या अनेक महिन्यांपासून डझनवारी एआय टुल्सचा वापर करत आहे. आता जाणीवपूर्वक याचा वापर अजून वाढवणर आहे. या सर्वांबाबत आपल्याला नियमीतपणे अपडेट देत राहिल. आता एआय एके एआय ! कृत्रीम बुध्दीमत्तेच्या चित्तथरारक युगात मी प्रवेश केला आहे. आपणही करावा ही अपेक्षा. . .आणि यासाठी शुभेच्छा ! करत आहे. आता जाणीवपूर्वक याचा वापर अजून वाढवणर आहे. या सर्वांबाबत आपल्याला नियमीतपणे अपडेट देत राहिल. आता एआय एके एआय ! कृत्रीम बुध्दीमत्तेच्या चित्तथरारक युगात मी प्रवेश केला आहे. आपणही करावा ही अपेक्षा. . .आणि यासाठी शुभेच्छा !नियमितपणे अपडेट .आणि यासाठी शुभेच्छा !

(लेखक नामवंत पत्रकार व ब्लॉगर आहेत)

9226217770

[email protected]

Previous articleतू आणि ती…
Next articleसरसंघचालकांचा अखंड भारत एक राहणार कसा ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here