-उत्पल व्ही. बी.
गांधीजी : चेहरा भकास दिसतोय. ऑल ओके?
मी : काल रात्री उशीरा झोपलो. आणि झोपही नीट लागलीच नाही.
गांधीजी : काम करत होतास? की फेसबुक? कुणी वैचारिक एनकाऊंटर केलं की काय तुझं?
मी : तुम्ही हल्ली आधीपेक्षा जास्त टोचून बोलताय. हॅव यू नोटिस्ड इट?
गांधीजी : अलीकडे आधीपेक्षा जास्त आहारी गेला आहेस फेसबुकच्या. हॅव यू नोटिस्ड इट?
मी : हं…
गांधीजी : बरं, आता काय झालं ते सांग.
मी : तसं तुमचं निरीक्षण बरोबर आहे.
गांधीजी : देअर इट इज. फेसबुकनेच झोपेची माती केली ना?
मी : इन अ वे, हो.
गांधीजी : कुणाशी चर्चा चालली होती? कुणी हिंदुत्ववादी?
मी : येस! आणि एकदम घनघोर हिंदुत्ववादी…गोडसेवादी खरं तर. पण तुम्ही कसं ओळखलंत?
गांधीजी : वा! हे न ओळखायला तुला काय मी आज ओळखतोय?
मी : हां… ते आहेच.
गांधीजी : बरं तू कॉफी घेणार का?
मी : घेऊया की. पण काय हो…
गांधीजी : काय?
मी : तुम्ही मला चर्चेचा तपशील नाही विचारलात.
गांधीजी : कमाल करतोस.
मी : काय?
गांधीजी : अरे कॉफी कशी करायची ते मला माहीत आहे. त्यासाठी या तपशीलाची काय आवश्यकता?
मी : कळलं मला.
गांधीजी : काय कळलं?
मी : हाऊ नॉट टू स्पॉइल कॉफी. अँड स्लीप…
गांधीजी : देअर यू आर!