संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी मी तुलना करत नाही. परंतु त्यावेळी जे वातावरण तयार झाले होते, तेच वातावरण महाविकास आघाडीला तयार करावे लागेल. भाजपा आणि त्यांच्यासोबत सत्तेसाठी लाचारीने गेलेल्यांचा कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात पराभव करायचा आहे, या एकाच मुद्यावर या महाविकास आघाडीने वातावरण तयार केले पाहिजे. देश उद्धवस्त होण्याची वेळ आली. देशातील २५ टक्के संस्था विकल्या गेल्या. ७५ टक्के बाकी आहेत. महागाईचा कडेलोट झालेला आहे. रोजगार देण्याच्या घोषणा खोट्या ठरलेल्या आहेत. जागतिक सन्मान आणि जगात भाषण करत फिरणाऱ्यांनी या देशातील रुपयाची किंमत १४ पैशांवर आणून ठेवली आहे. मणिपूर पेटले. भगिनी अपमानित झाल्या. जणू आपण त्या गावचे नाहीत, इतक्या सहजपणे या गंभीर घटना घेतल्या गेल्या.