‘भय इथले संपत नाही’ ही कविता तशीच आहे. अनेकांना ‘आवडते’ पण ‘कळत’ नाही. त्यात शब्दांची चमत्कृती नाही पण उपमांची भरपूर आहे. मला ती जशी ‘कळली’ आहे, तशी मी लिहिते. कुठलीही चांगली कविता ही प्रत्येक वाचकासमोर वेगळे विभ्रम घेऊन येत असते. प्रत्येकजण त्यातून वेगळे अर्थ काढत असतो. तो कवीच्या अर्थाशी जुळेल किंवा जुळावा असा काहीही नियम चांगल्या कवितेला लावता येत नाही. त्यात वाचकाची बुद्धी, त्याची आकलनशक्ती, त्याची संवेदनशीलता आणि त्याची त्या-त्या वेळची मनोवस्था, याचा खूप मोठा सहभाग असतो. मला लागलेला अर्थ जेव्हा मी ग्रेसना सांगितला होता तेव्हा ते फक्त हसले होते. पण त्यानंतर एका विद्वानांच्या बैठकीत त्यांनी मला तो अर्थ सांगण्याचा आग्रह केला होता.
‘भय इथले संपत नाही’ चा प्रवास करतांना आपण एका खोल,गूढ अश्या गुहेकडे निळसर तिरीप पकडण्यासाठी झेपावतो आहोत असे वाटत राहाते.
आपण हा प्रवास सुसाह्य केला.
सुंदर
किती लाजवाब लिहिलं आहे हे !
ही सर्व रूपकं आणि हे शब्दांचे साज नकळत अनावृत्त होत जातात नि उरतो फक्त निसंग प्रेमभाव ! कदाचित असंच काहीसं ग्रेसियस असणार आहे.
माझ्या जाणीवा समृद्ध केल्याबद्दल मिथिलाताईस धन्यवाद…
अप्रतिम लिहीले. प्रत्येक वेळेस वाचताना तितकंच आवडून वाचते.