सनी लिऑनला जवळून प्रत्यक्ष पाहण्याचा योग काही वर्षांपूर्वी आला होता. आपल्या नवीन चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी चित्रपटाचे अभिनेते आणि अभिनेत्री `सकाळ टाइम्स’ इंग्रजी दैनिकाच्या कार्यालयात येत असत. अशा मुलाखती देणे हा त्या चित्रपट कलावंतांनी चित्रपट निर्मात्यांशी केलेला कराराचा भागच असतो, हे चित्रपट कलाकार अशा मुलाखतीला सामोरे जाण्यास नकार देऊ शकत नाही, हे नंतर लक्षात आले.
The 76th Cannes Film Festival 2023 साठी नामांकन कमावलेल्या अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केलेल्या `केनेडी’ चित्रपटातील एक कलाकार म्हणून सनी लिऑन या समारंभात सहभागी झाली होती.