इंटरनेटने ह्या सगळ्या त्रासलेल्या मेंदूना एक सोपा मार्ग दिला जेणेकरून रोजच्या जगण्यातून दोन घटका करमणूक पण होईल, ताण हलका होईल व कुणाला कळणार पण नाही. खोटी ओळख निर्माण करून काहीही केलेलं कुणालाच कळणार नव्हतं मात्र इंटरनेट हेच सगळ्यात मोठं व्यसन ठरलं. Social media, पॉर्न, गेमिंग, ऑनलाइन डेटिंग, ह्या सगळ्यातून मेंदूत आनंदाचं रसायन डोपामाईन निर्माण होत, जे लोक मनाने कमकुवत असतात ते रसायन परत परत मिळवण्यासाठी या आभासी दुनियेत हरवून आनंद शोधत व्यसनी होतात.
वाटणाऱ्याशी दोन हात करायला सज्ज होतं. ह्याला flight/fight अस नाव आहे. शरीर ह्या भय अवस्थेत ताण अनुभवत असतं. Breaking news मनात भीतीची भावना सतत जागृत ठेवतात. तार्किक विचार करायला मेंदूला वेळच मिळत नाही. कारण 24बाय 7 वेगवेगळी माध्यमं व त्यातून येणारी अखंड माहिती मेंदूत ट्रॅफिक जॅम करते. हे सगळं खूप कठीण आहे. पण आपण सगळेच यातून जात आहोत. ह्या सगळ्या गोष्टी माणसातील पशुला जाग करण्याचं काम करतात व तो पशू शांत करणं जवळजवळ अशक्य आहे.
पण बऱ्याच जाणकार नटांच म्हणणं आहे की, कला, दृश्यकला ह्या समाजात जे चालत तेच दाखवतात, त्या मूळ Netflix वैगेरे सारख्या माध्यमांना दोष देणं योग्य आहे का?