या क्रांतीने राजसत्ता गेली, पण तिची जागा दरम्यान झालेल्या यादवी युद्धाचा बिमोड करणाऱ्या नेपोलियन या सम्राटाने घेतली. धर्मसत्ता मात्र दुबळी ठरली आणि तिने पोपचे वर्चस्व झुगारायला सुरूवात केली. विवेकाच्या मागे जाणारा समाज यथावकाश पुन्हा श्रद्धेच्या मागे गेला. फ्रान्समध्ये पुनः लोकशाही यायला व जनतेचे खरेखुरे राज्य यायला शेकडो वर्षे जावी लागली. आज तेथे जनतेची सत्ता आहे आणि धर्मसत्ता जनतेवर फारसे निर्बंध घालण्याएवढी समर्थ राहिली नाही.
धर्मसत्तेवरील नियंत्रणे मजबूत होत नाही याची त्या देशाला व त्याच्या सरकारला जाणीव होण्याचा क्षण इंग्लडच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी त्याला भेट दिली तेव्हा आला. त्यांनी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली तेव्हा त्यांच्यासोबत लक्षावधी रशियनही चर्चमध्ये आले. श्रद्धेने विचारांवर केलेली ती मात होती. रशिया मागोमाग 1949 मध्ये चीनमध्येही क्रांती झाली. तीही राजसत्ता, धनसत्ता व धर्मसत्ता याविरूद्ध झाली. तिथली राजसत्ता गेली. पण नंतर आलेली हुकुमशाही कमालीची पाशवी होती.
आणि आता धर्माचे नाव सांगत राष्ट्रीय म्हणविणारे पक्ष प्रबळ होताना देशाने पाहिले. सरकारचा पक्षच मंदिर बांधण्यावर व तथाकथित रामसेतू टिकविण्यावर जोर देऊ लागला. परिणामी सामान्य माणसातही धर्मांधता कमी व्हायची, ती वाढताना दिसू लागली आहे. पुनः राजकारणात मंदिर, मशिद, जात, पात अन् वेगळेपण उसळू पाहात आहे.