-राकेश साळुंखे
तिरुअनंतपूरम ही केरळची राजधानी . आधुनिक इमारती आणि मोठमोठे मॅाल्स असलेले हे शहर पद्मनाभस्वामी मंदिराच्या बंद खोल्यांमध्ये सापडलेल्या संपत्तीमुळे जास्त प्रसिद्धीस आले आहे. त्रावनकोर संस्थानची ही राजधानी होती. त्रिवेंद्रम असेही पूर्वी म्हटले जात होते. तिरुअनंतपूरम म्हणजे अनंताचे शहर होय . स्कंदपूरणात याचा उल्लेख ‘अनंतपुरी ‘असा आलाय . ‘अय’ राजवंश हा या शहरावर राज्य करणारा सुरवातीचा वंश .इसवी सनपूर्वी १००० च्या दरम्यान सलोमान राजाची जहाजे येथील पूवर (poovar) बंदरात आली होती. त्या काळातही येथील बंदरातून मसाल्याचा व्यापार चालत होता . विज्जींजम ही ‘अय’ राजवटीची राजधानी होती.

सुंदर
खूप छान माहिती दिली
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?