मोहसीन शेख
गेल्या काही दिवसात रविषकुमारला जीवे मारण्याच्या _धमक्या सातत्याने मिळत आहेत. काल परवा त्याच्या गाडीचा पाठलाग ठरत काही गुंडांनी त्याला शिवीगाळ देखील केली.इतकंच नाही तर त्याचा मोबाईल नंबर या लोकांनी व्हायरल करून देशभरातून वेगवेगळ्या लोकेशनवरून त्याला धमकीचे कॉल केले.परिवाराला संपवायची,बायको,मुलीवर बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्या. शिवाय रोजच्या रोज त्याला सोशल मीडियावर भाजपाच्या गुंडाकडून धमकवायचे, ट्रोल करायचे प्रकार तर सातत्याने सुरूच आहेत,असतात.
तरीपण हा माणूस आपल्या पत्रकारितेच्या व्रतावर ठाम आहे.अगदी न चुकता तो प्रशासनाला,आणि शेठला वेगवेगळे प्रश्न विचारून अक्षरशः हैराण करून सोडतो आहे. Republic, Z news, abp news, किंवा आज तक च्या पत्रकारांसारखं सरकारच्या दावणीला बांधला न जात लोकांच्या रोजच्या आयुष्यातले प्रश्न prime time मध्ये मांडायची हिम्मत दाखवत आहे.
अर्णब,सुधीर चौधरी अंजना कश्यप सारख्या इतर बाजारू पत्रकाराप्रमाणे हा माणूस विकला गेलेला नाहीये. या बाजारू माणसांनी पत्रकारितेचा धंदा मांडलेला असतांना, रविषकुमार एकटा असा राष्ट्रीय स्तरावरचा पत्रकार आहे जो शेठला डोळ्यात डोळे घालून अवघड जागेचे दुखणे असलेले प्रश्न विचारत आहे.
आणि म्हणूनच शेठ आणि भाजपच्या डोळ्यात हा बिनीचा शिलेदार खुपतो आहे. अस काय वेगळं आहे रविषकुमार मध्ये..? की ज्याला हे मोदीसरकार इतकं घाबरत आहे.त्याला जीवे मारायची धमकी देत आहे..?
खालील गोष्टी बघा,तुमच्या लक्षात येऊन जाईल,की का शेठ आणि त्यांच्या बगलबच्यांची या निर्भीड आणि निरपक्ष पत्रकारापुढे फाटत आहे..!
लोकसभा इलेक्शनच्या वेळी जेंव्हा इतर सगळे चॅनेल्स शेठचे तळवे चाटण्यात व्यस्त होते तेंव्हा हा माणूस वाराणसी लोकसभेतील दुर्लक्षित अश्या कटारी नावाच्या गावात पोहचतो.आणि तिथल्या लोकांना बोलते करतो. तर त्यावेळी “नमामी गंगे” म्हणत शेठच्या नादात वेडे झालेल्या बनारसी लोकांची काळी बाजू देशासमोर येते.ती असते,फक्त “दलित आहेत म्हणून कटारी गावातील लोकांना गंगेच्या पाण्यात उतरण्यास बंदी आहे”,ही.लोकसभा सारख्या महत्वाच्या आणि पैसे मिळवून देणाऱ्या इलेक्शन चालू असताना हा एकटाच पत्रकार असतो जो त्या धामधुमीत पण दलितांवर टाकण्यात आलेला सामाजिक बहिष्कार आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दाखवत असतो.
रोहित वेमुलाच्या केसमध्ये जेंव्हा इतर चॅनेल्स रोहितलाच गुन्हेगार सिद्ध करायच्या मागे लागले होते तेंव्हा रविषकुमारच्या Prime time ने रोहित ची बाजू पहिल्यांदा देशासमोर मांडली. आणि वातावरण अचानक पालटलं.सोशल मीडियावरून पेटलेल्या वादळाला रविषच्या एका शो मूळे बळ तर मिळालंच पण योग्य दिशा देखील मिळाली.
नुसत्या गोमांस असल्याच्या संशयावरून जेंव्हा अखलाखला काही हिंदुत्ववाद्यांनी मारलं तेंव्हा, इतर पत्रकाराप्रमाणे Ac मध्ये न बसता ग्राउंड रिपोर्टिंग करत दादरी मध्ये जाऊन फॅक्ट मांडणारा पत्रकार हा रविषकुमारच होता.त्या Prime Time मध्ये त्याच एक वाक्य मनाला खूप चटका लावून गेलं होतं की, “काय हे तुम्हाला मंजूर आहे की, आपल्याच समाजाचा एक भाग दुसऱ्या समाजातील एका व्यक्तीला फक्त यासाठी घराबाहेर काढून मारेल की त्याचा धर्म वेगळा आहे,त्याची खायची प्यायची पद्धत वेगळी आहे..?”
जेएनयु च प्रकरण घडत आणि अर्णब,सुधीर सारखी कुत्री कन्हैय्या कुमार,उमर खालिद ला देशद्रोही ठरविण्यात बिझी असतात तेंव्हा तो रविषकुमारच असतो जो,”ये अंधेरा ही आज की टीव्ही की तस्वीर है”म्हणत आपल्याच बिरादरीच्या पत्रकार लोकांची लक्तरे वेशीवर टांगत असतो. टीव्हीवर केलेला तो 45 मिनिटांचा अंधार रविषकुमारच्या आयुष्यातील सगळ्यात पॉप्युलर पण तितक्याच परिणामकारक Prime Time चा माईलस्टोन बनतो. मीडियाची काळी बाजू तो त्या 45 मिनिटाच्या कालावधीत इतक्या स्ट्रॉंगपणे मांडतो की, सद्सद्विवेकबुद्धी जागृत असलेल्या प्रत्येक नागरिकाला तो अंतर्मुख करून जातो.
नोटबंदीत जेंव्हा आजतक ची श्वेता सिंग ही पत्रकार शेठच गुणगान गात “दोन हजारच्या नोटेत चिप आहे,” अस बिनदिक्कतपणे खोटे बोलत असते तेंव्हा,”या दोन हजारच्या नोटवर उर्जित पटेलच्या सह्या कस काय..? (त्यावेळी Rbi चे गव्हर्नर श्री.रघुराम राजन होते) हा रोखठोक प्रश्न विचारणारा रविषकुमारच असतो.
आदल्या दिवशी abvp च्या विद्यार्थ्यांनी मारहाण केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून दिल्लीमधून गायब होणाऱ्या नजीबच्या आईची व्यथा मांडत एक आख्खा Prime Time नजीबवर स्टोरी करणारा पत्रकार हा देखील रविषच असतो.
रविषकुमारच्या वाढत्या लोकप्रियतेला आळा घालण्यासाठी शेठने मग एक वेगळीच चाल खेळली.पठाणकोट हल्ल्याची बातमी हिं संवेदनशील होती आणि ती Ndtv ने लीक केली अश्या आशयाचे आरोप करत 1 दिवसाचा बॅन Ndtv वर घातला.वास्तविक हा बॅन ndtv वर नव्हता,तर रविषकुमार कसा देशद्रोही आहे, हे सांगण्यासाठी होता. पण एडिटर्स गिल्ड च्या प्रखर विरोधानंतर आणि देशातील संवेदनशील जनतेने केलेल्या विरोधानंतर हा बॅन वापस घेण्यात आला.पण त्याच दिवशी झालेल्या Prime time मध्ये, “बागो मे बहार है” अस विचारत रविषने सरकारला अक्षरश नाग केलं.
आत्ता लेटेस्ट मधली उदाहरण म्हटलात तर, जेंव्हा अवघा मीडिया देशभक्ती,वंदेमातरम, सारख्या unproductive विषयावर बोलत असतो तेंव्हा हाच रविषकुमार 20-22 एपिसोडचा Prime Time फक्त देशभरातल्या युवकांच्या नोकरीच्या प्रश्नावर करत असतो. आणि देशभरातील युवकांची आणि त्यांना उपलब्ध असणाऱ्या रोजगाराची दयनीय स्थिती दाखवत प्रशासन आणि सरकारची काळी बाजू जनतेसमोर मांडत असतो.
जेंव्हा साध्वी प्राची,योगी आदित्यनाथ सारखे लोक लोकांना मिसगाईड करणारे विधान करत देशात धार्मिक ध्रुवीकरण करत समाजसमोरील मुख्य प्रश्नावरून लोकांचं लक्ष विचलित करत असतात तेंव्हा, अविचल राहून देशभरातील युनिव्हर्ससिटींची दयनीय स्थिती देशासमोर आणून एकूणच शिक्षणव्यवस्थेतील सरकारच्या अनास्थेबद्दल जाब विचारत 34 एपिसोडस फक्त शिक्षण आणि युनिव्हर्सिटीबाबत बोलणार माणूस हा रविषकुमारच असतो..!
हे निवडकच दाखले आहेत.असे अनेक देता येतील अजून.अश्या माणसाला शेठ आणि त्याचे बगलबच्चे घाबरणार तर आहेतच.कारन हा रविषकुमार ना विकला जातोय ना इतर पत्रकारप्रमाणे चाटुगिरी करतोय. वरून रोजच्या रोज लोकांच्या आयुष्याशी निगडित प्रश्न विचारून शेठला भंडावून सोडतोय.
आणि या रविषकुमार ची इतकी भीती आहे शेठच्या मनात की,10 मिनिटांचा इंटरव्ह्यू देखील तो रविषकुमार ला द्यायला तयार होत नाही…!!
रविशची काळजी वाटते.तो एक चांगला पत्रकार आहेच पण त्याहून महत्वाचं म्हणजे तो एक चांगला माणूस आहे…आणि संवेदनाशील पत्रकार आहे..!