लेखक – मंगेश सपकाळ , मेलबोर्न ऑस्ट्रेलिया
बायकांचं सेक्शुअल-प्लेजर आणि पुरुषांचं सेक्शुअल प्लेजर यात जमीन-आसामनाचा फरक आहे. पुरुषांचं हस्त-मैथुन जेवढं सहज आहे, तेवढंच अवघड बायकांचं हस्त-मैथुन. याचं एकमेव कारण म्हणजे दोघांच्याही लिंगाची रचना. जसं बहुतांश पुरुषांचं हस्तमैथुन जवळजवळ एकसारखंच असतं, लिंग मागे-पुढे करणं वगैरे, पण योनीधारकांचं हस्त-मैथुन प्रत्येक बाईनुसार वेगळं ठरतं. आणि ते अगदीच पुरुषांसारखं सहज-सुलभ नसल्यामुळे ‘सेक्स-टॉईज’चा जन्म झाला. प्रत्येकीला स्ट्रोक कसा हवाय, क्लायटोरीसला व्हायब्रेशन किती हवंय, जी-स्पॉट पर्यंत जाणारं हवंय का, किती लांब, किती जाड … वगैरे बायकांसाठी हजार प्रकारचे सेक्स टॉईज आहेत.
पण आपल्याकडे बहुतांश बायकांमध्ये, शिकलेल्या देखील, सेक्स-टॉईज वापरण्यावरून न्यूनगंड/चुकीचा समज आहे.
१. सेक्स टॉईज सेफ नाहीत
– आपल्या शरीरात कुठलीही गोष्ट घेताना प्रत्येकजण काळजी करतो, ते स्वाभाविक आहे. पण सेक्स टॉईज सेफ नसते तर ते अमेरिका-यूके-ऑस्ट्रेलिया वगैरे सारख्या पाश्चात्य देशांत त्यावर पहिले बंदी आली असती. कारण भारतापेक्षा हे देश सेफ्टीच्या तुलनेत कितीतरी पटीने अग्रेसर आहेत. याचा अर्थ तिकडे होणारं सगळंच चांगलं आणि आपण त्यांची कॉपी करावं असं नाही. एवढंच की, त्यांच्याकडे त्याबाबत तेवढे रिसर्च चालतात, गोष्टी पडताळून पाहिल्या जातात आणि मग त्याला मान्यता मिळते. कुठ्ल्याही (रीतसर शिकलेल्या) डॉक्टरांचा सल्ला घेतलं तरी ते सेक्स-टॉईज अँसेफ म्हणणार नाहीत.
सेक्स टॉईज वापरणं हे पूर्णतः सेफ आहे, (जर तुम्ही त्याची व्यवस्थित निगा राखत असाल)
२. सेक्स-टॉईज हे नैसर्गिक नाहीत
– हा विचार करणं फारच मागासपणाचं लक्षण होईल. उद्या पतंजली वाले काही सेक्स-टॉईज काढणार नाहीत.
नैसर्गिक तर कपडेही नाहीत, निरोध देखील नाहीत, तुम्ही जे दर महिन्याला पॅड लावताय खाली, तेही नैसर्गिक नाही. मग ते सगळं बंद करणार का ? सेक्शुअल उपभोग हा जर तुमचा नैसर्गिक आहे, तर मग बाकी उपभोग कसा मिळवताय, हे महत्त्वाचं उरत नाही. प्रश्न येवढाच असायला हवा, की त्यामुळे आपल्याला वा इतरांना काही हार्म पोहोचत तर नाही ना, मग ते नैसर्गिक-मानवी काहीही असो.
३. सेक्स-टॉईज आणि खरा-खुरा पार्टनर, याची तुलना नाही. ते अतृप्त लोकांसाठी असतील
– हे सगळं वैयक्तिक आलं. जोपर्यंत तुम्हाला हवं ते सुख मिळतंय, तोपर्यंत तुम्हाला इतर गोष्टी लागत नाहीच. पण ते तसं मिळतंय म्हणून आपण उगाचच आराखडे बांधणं अशिक्षितपणाचं लक्षण आहे. सेक्स-टॉईज हे निव्वळ सुखासाठी वापरलं जातंच, पण ते ‘बेडरूमधलं’ मिळणारं सुख वाढवणारं देखील असतं. हा गैरसमज आहे की टॉईज फक्त पार्टनर नसलेली वा अतृप्त लोकंच वापरतात. कित्येक टॉईज हे कपल्ससाठी असतात, दोघं ते वापरतात. आणि ते जास्त आनंद देतं.
जास्त आनंद यासाठी की, एकतर सेक्स-टॉईज थकत नाहीत., बायका मल्टी-ऑरगॅजम आहेत आणि दुसरं, ते जेव्हा कोणीतरी इतर आपल्यावर वापरतं तेव्हा, as a Receiver, त्याचा पूर्ण आनंद घेता येतो.
सेक्समध्ये काय महत्त्वाचं असतं ? तर सुख. आणि ते सुख प्रत्येकजण आपापल्या परिने मिळवत असतो. मग कोणी ओरल सेक्सच करेल, कोणी मिशनरीच तर मग कोणाला डोगशॉट. ह्या पोजिशन बदलण्याचं कारण देखील आपल्याला त्या सुखाचा पारा वाढवायचा असतो. म्हणजे जास्तीत जास्त सुख मिळावं म्हणून आपण प्रयत्नशील असतो. सेक्स-टॉईज तेच सुख वाढवण्याचं काम करतात. ज्यांना सेक्स-लाईफ फुलवायची इच्छा असते, त्या प्रत्येक कपलकडे किमान दोन निराळी सेक्स टॉईज तरी असावीत असं मला वाटतं. त्याची मजा फार निराळी आहे.
४. उद्या त्याचं व्यसन लागलं तर ? पार्टनरबरोबर सेक्स नकोस वाटलं तर ?
– तुम्हाला सेक्सचं व्यसन लागतं का ? जर नसेल तर याचंही व्यसन का लागेल ? सेक्स-टॉईज कधीही पार्टनर बदलू शकणार नाहीत. कारण सेक्स-टॉईज तुम्हाला शारिरीक स्पर्श, प्रेम, साथ देत नाहीत. जोपर्यंत तुम्ही समोर जिवंत माणूस उपभोगताय, तोपर्यंत सेक्स-टॉईज माणसांची जागा घेणार नाहीत. आणि जर घेतलीच, तर तुम्हाला त्या त्या पार्टनरपासून सुख मिळत नाही, हे खुल्या मनाने स्वीकारायचं. त्यात चूक काही नाही. स्वतःच्या मनाची खोटी समजूत घालण्यापेक्षा, तार्किक सुखाला नेहमीच प्रॉयोरिटी असायला हवी.
५. सेक्स टॉईज वापरणं हे आपल्या पार्टनरमध्ये दोष दर्शवतं
– टॉईज वापरताय म्हणून तुमच्या पार्टनरमध्ये दोष आहे, किंवा तुम्ही सेक्स ऍडिक्ट आहात, हा चुकीचा विचार आहे. बायकांच्या योनीची रचना ही वेगळी आहे, हे प्रत्येक पुरुषाने तसं बायकांनी समजून घ्यायला हवं. बायकांनी हे अमुक असंच उपभोगावं, म्हणून विचार करणं ही गुलामी झाली. कोणाचंही असो, जर त्या सुख मिळवण्यात कोणाचं नुकसान नसेल, तर त्या सुखाला नेहमीच ‘प्रायोरिटी’ द्यायला हवी.
———————–
सेक्स टॉईज बाळगताना घ्यावयाची काळजी –
१. बायकासांठी पहिल्यांदा सेक्स टॉईज निवडणं हे कमालीचं अवघड आहे. कारण जोपर्यंत ते वापरत नाही, तोपर्यंत आपल्याला सेक्स-टॉईजमध्ये नक्की काय आवडतं हे कळत नाही. मी जेव्हा प्रोस्टेट-मिल्किंग/मसाज साठी टॉईज घेतलं होतं, तेव्हा पहिले दोन्हीहि आवडले नव्हते. तिसऱ्यावर समाधान मिळालं. बायकांच्या सेक्स टॉईज मध्ये बरेच प्रकार येतात. नुसता व्हायब्रेटरच असतो, किंवा नुसता डिल्डो (रबरी शिश्न), तर मागेपुढे जाणारं (Thrusting), तर काही नुसतेच क्लायटोरीसला मसाज करणारे… बरेच प्रकार असतात. त्यातही त्याचा शेप कसा असावा हेही प्रत्येकीच्या योनीच्या रचनेवरून ठरत असतं. कोणाला कर्व डिल्डो, तर कोणाला एकदम सरळ, कोणाला मोठा, कोणाला जाडा… हे सगळं त्या त्या बायकांच्या नर्व्ह एंडिंग्सवरून ठरतं. आपल्याला कुठे-कसं प्लेजर जास्त मिळतं, हे त्या बाईला माहित असेल तर टॉईज निवडणं सोपं पडतं.
तरी पहिल्यांदा कोणी वापरणारं असेल तर, त्यांनी सरळ ‘ऑलराऊंडर’, म्हणजे ज्यात क्लायटॉरीसला मसाज मिळणारं, प्लस मागे-पुढे जाणारं, प्लस व्हायब्रेट होणारं.. असं घ्यावं. ‘रॅबिट’ टाईप.
२. कुठल्या मटेरिअल्सचं वापरावं हा नेहमी महत्त्वाचा प्रश्न असतो. प्लास्टिक, सिलिकॉन, रबर, मेटल… वगैरे बरेच प्रकार मिळतात. यात मला सिलिकॉन आणि मेटल जास्त सेफ वाटतात. पण मेटल फारच महाग असल्यामुळे, सिलीकॉनला जास्त प्रिफरंन्स असतो. यात Porous मटेरिअल्सचं काही वापरू नये, कारण ते व्यवस्थित स्वच्छ होत नाही. तंत्रामध्ये योनी-एग प्रकार असतो. तो येवढ्यासाठीच मला घातक वाटतो. कारण तो योनी-स्टोन Porous असतो. म्हणून jelly-rubber मटेरिअल्सचे टॉईज शक्यतो टाळावेतच. अगदी तेच आवडले तर मग स्वच्छतेसाठी जास्त काळजी घ्यावी.
३. कुठलंही स्वस्तातलं, चायनीज मॉडेल वगैरे चुकूनही घेऊ नये. चांगल्या ब्रॅन्डचंच घ्यायला हवं. ३००० ते ५००० रुपयांत खूप चांगल्या ब्रँडची विश्वासू टॉईज मिळतात. त्यात ‘We Vibe’, ‘Jimmy Jane’, ‘Fun Factory’, ‘California-exotica’ हे चांगले ब्रॅण्ड्स आहेत.
४. सेक्स-टॉईज साठी चांगले Water Based Lubes वापरणं गरजेचं आहे.
५. सर्वात मोठी जवाबदारी म्हणजे स्वछता. ज्याला स्वच्छतेचा फारच बाऊ असेल, त्याने टॉईज निरोध लावून वापरावं. पण काहीही झालं तरी सगळा कार्यक्रम उरकल्यावर ते स्वच्छ ‘Antibacterial Cleaner’ ने साफ करावं, गरम-कोमट पाण्याने धुवून काढावं… आणि स्वच्छ करूनच वापरावं. जसं आपण एकाचं निरोध दुसऱ्याला वापरत नाही, तसं एकाचं टॉय दुसऱ्याने वापरू नये. चांगले Antibacterial Cleaner येतात, ते टॉईज बरोबर घ्यावेत.
भारतात सेक्स टॉईज विकणं हा गुन्हा आहे, तरी बऱ्याच ठिकाणी सेक्स टॉईज मिळतात. जसं मुंबईच्या Crawford market वगैरे भागात ते मिळतात असं ऐकलंय, नक्की माहिती नाही. चांगली गोष्ट अशी की, ‘सेक्स टॉईज बाळगणं’ हा गुन्हा नाही, जोपर्यंत ते तुम्ही प्रायव्हेटमध्ये वापरताय. अशीही आजकाल बाहेरगावी प्रत्येकाची छोटी-मोठी टूर होत असते. किंवा मग सोशल साइट्समुळे बरेच बाहेरगावी असणारे मित्र आपल्या लिस्टीत असतात. त्यांना काही हरकत नसेल तर त्यांच्याकडून मागवले तरी चालतंय. आणि ते बाहेरगावी तसं फसवा-फसवी किंवा घातक वगैरे प्रकार विकणं क्वचितच कुठेतरी असेल.
—————————
भारतासारख्या देशात, जिथले कायदे आणि सरकारच वैयक्तिक गोष्टींत आडकाठी करतं, तिथल्या संस्कृती, संस्कार हे मागास असणार यात नवल नाही. जिथे बायकांना ‘मास्टर्बेशन’, ‘सेक्स’ हा शब्द उच्चरायलाही दहावेळा विचार करावा लागतो, तिथे सेक्स-टॉईज वगैरे फारच मोठी फँटसी झाली. पण प्रत्येक व्यक्तीला शारीरिक-सेक्शुअल सुख मिळवण्याचा, फुलवण्याचा, बाळगण्याचा अधिकार आहे. ते सुख कसं असावं, किती-कुठे मिळवावं, हा अधिकार सर्वस्वी आपलाच असायला हवा. त्यात आपल्या व्यतिरिक्त इतर कोणाचीही लुडबुड आपण सहन करता कामा नये.
सेक्शुअल सुख न मिळणं वा मिळवता येणं, हे कोणासाठीही मला अन्याय वाटतो. चांगल्या आरोग्यासाठी देखील सेक्शुअल गरजा भागवता येणं फार गरजेचं आहे. स्पेशली बायकांमध्ये, सेक्शुअल सुख न मिळाल्याने बरेच स्ट्रेस, Anxiety, निद्रानाश चे प्रॉब्लेम्स उद्भवू लागतात. फोकस होत नाही, लक्ष लागत नाही, असे बरेच प्रकार-आजार बळावू शकतात.
Anorgasmia, यात बायकांना साधा एक ऑरगॅजम मिळवताना नाकी-नौ येतात. तिथे त्यांना एक पुरुष कधीही पुरत नाही. सोप्या भाषेत यात बायकांचा कोटा जड असतो . जिथे पुरुष संपतो, तिथे त्यांचा सेक्स सुरूही झालेला नसतो. मग अशा ठिकाणी सेक्स-टॉईज ही देणगी होते.
रेगुलर सेक्स करणाऱ्या / हस्तमैथुन करणाऱ्या बायकांची योनी देखील हेल्थी असते. कारण तिकडच्या मसल्सना वरचेवर रक्त-प्रवाह मिळत राहतो आणि थोडक्यात ती जिवंत राहते. आता ज्या बायकांना सेक्सची इच्छाच होत नाही, त्यांचा प्रश्न वेगळा, अर्थात तेही कशामुळे होतंय, यावर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. सेक्सची इच्छा मरणं, वा सेक्स करावासा न वाटणं, हे देखील नैसर्गिक नाहीच. तेही आजारांत येऊ शकतं. पण तरी अशा स्त्रियांनी वरचेवर योनीमसाज तरी कमीतकमी घ्यायला हवी / स्वतःला द्यायला हवी.
“If you don’t USE it, you LOSE it ”, यावर माझा विश्वास आहे. मग तो मेंदू असो की मग शरीराचे कुठले पार्टस.
सेक्स हे नेहमी बूस्टरसारखं काम करतं.
——————–
जर लाफ्टर हे मेडिसिन असेल, तर सेक्स हे लाफ्टर आहे. त्याला मी हॉर्मोनल लाफ्टर मानतो.
सेक्शुअल सुख हा प्रत्येकाचा अधिकार आहेच, पण प्रत्येक शरीराची ती गरज देखील आहे.
जसं व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स, कॅल्शिएम हे निरोगी-सुदृढ शरीरासाठी सगळं डाएटमध्ये योग्य प्रमाणात असावं,
जसं प्रेम, आपुलकी, आदर, स्वाभिमान हे निरोगी मानसिक विकासासाठी असावं,
तेव्हढंच, सेक्स-सेक्शुअल सुख मिळणं, हे शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी गरजेचं आहे.
मग ते सुख कोणाकडून मिळतंय, कसं मिळतंय हे महत्त्वाचं असू नये.
आपल्या अहंकारिक सुखासाठी, आपल्या हट्टाच्या पझेसिव्हनेसपायी कुणाचं सुख नाकारणं हे माणुसकीचं लक्षण नाही.
आपल्या पार्टनरला सुख मिळायला हवं, तो त्या पार्टनरच्या अधिकारआहे… आणि ते सुख मिळण्यासाठी धडपड करणं, त्याची जाणीव असणं, त्याला प्रेम म्हणायला हवं. बांधून ठेवण्याला प्रेम म्हणत नाही, ती ठार गुलामी झाली.
आयुष्य सुंदर आहे, आणि सेक्सदेखील….
जोपर्यंत ते निखळ सुख आहे, तोपर्यंत ते कोणाबरोबर-कशाबरोबर-कितीजणांबरोबर, हे मॅटरलेस आहे/असायला हवं.
येवढं बोलून मी माझं भाषण संपवतो.
जय योनी, जय क्लायटॉरीस ….. !
– मंगेश सपकाळ
(लेखक उपहास , वक्रोक्ती व विनोदी पद्धतीने अनेक विषयांचा परखड वेध घेतात )