केकची डिलिव्हरी आली. डिलिव्हरी बॉयने विचारत विचारत जिथे केक द्यायचाय ते घर गाठल. संध्याकाळचे साडे पाच वाजले होते. केकची डिलिव्हरी देण्यासाठी दरवाजाची बेल दाबून बिचारा दरवाजा उघडण्याची वाट बघत होता. एका हातात केकची पिशवी दुसऱ्या हातात नाव, पत्ता असलेलं चिठोरं. बेल वाजताच दरवाजा उघडला. तो नाव कन्फर्म करत होता. तिने हातातलला सॅनिटायजेशनचा स्प्रे फवारतच केक हातात असलेल्या पिशवीवर मारायला सुरुवात केली. आधी फवारा पडला तो त्याच्या पिशवी पकडलेल्या हातावर. ‘त्याला सॅनिटायजरची अॅलर्जी असली तरी आपलं काय जातयं, शेवटी तो एक डिलिव्हरी बॉय आहे. काही हजार कमवणारा. त्याला काय कळणारय की आपल्या सॅनिटायजरने अॅलर्जी झालीय.ए शी आमच महागडं सॅनिटायझर आहे. चांगल्या दुकानातून घेतलेलं ‘ या टेचात ती समोर आलोल्या झुरळावर जसं अंतर ठेवून औषध फवारावं तसा सॅनिटायजरचा स्प्रे फवारत होती. चारही बाजूला स्प्रे फवारुन झाला तेव्हा, तिने चिमटीत झुरळ पकडावं तशी पिशवी त्याच्याकडून घेतली. त्याच्या काळाजाचे ठोके चुकत होते. चुकून पिशवी पडली आणि केक पडला तर भुर्दंड बसायचा म्हणून त्याने त्या पिशवी सोडणाऱ्या बोटांमध्ये प्राण एकवटले होते.
उफ्फ… झाली बाबा केकची डिलिव्हरी. दूषित वागणुकीतून झाली बुवा त्याची एकदाची सुटका. माझ्या मेंदूत जाणीव झाली. बरं त्याला ती पिशवी खाली ठेवायला सांगून त्यावर सॅनिटायजर फवारणं आयडियल होतं ना. म्हणजे मग पिशवी सॅनिटाईज झाली असती. पण पिशविच्या तळाला चिकटून कोरोनाचा विषाणू आला तर ही भिती त्या कोरोनाचा बागूलबुआ करणारीला होती.
मला या सॅनिटाजरचे स्प्रे वापरणाऱ्यांना एक प्रश्न विचारायचाय. तुम्ही लोक ते पार्सलच्या आत असलेल्या खाण्याच्या पदार्थांवर का नाही सॅनिटाजर फवारत ? चला गेला बाजार ज्या बॉक्समध्ये, रॅपरमध्ये ते पदार्थ असतात त्यावर पण सॅनिटाजरचे स्प्रे मारत चला की. तोंडात मारतात तसला एक स्प्रे तयार पदार्थांसाठी असायला हवाच. तो कच्च्चा भाज्यांवर वगैरे मारायचा स्प्रे ठिकय. पण, पदार्थांवर स्प्रे वगैरे मारुन खात असाल तर विज्ञानात तुमच्या आजाराला काय नाव आहे नाही माहित मला. पण नक्की काहीतरी आजार मागे लागणार बघा. तर जर तुम्ही रॅपर, बॉक्स पॅकेटच्या आत सॅनिटायजरचा स्प्रे मारत नाही तर काय कोरोना अन्नपदार्था असलेल्या आवरणातून येत नाही असा समज आहे का ? किंवा त्याकडे दुर्लक्ष करताय. एवढं जपता तर बाहेरचं खाताच कशाला. हे म्हणजे पूर्वीचे लोक म्हणायचे ना ‘अर्धं सोवळं’ … तसलंच काहीतरी.
जसं इथे वाचताना कन्फ्युजन झालंय. अगदी तसंच सॅनिटाईज फवारणी करुन कोरोनी पळवता येतो असा गैरसमज बाळगणाऱ्यांचा कृतीत गोंधळ झालाय असं मला वाटतं. म्हणजे मनमर्जी सॅनिटायजेशन वगैरे…
आपल्याला माणूसकी ‘धुवून ‘ ‘टाकायची’ नाही हे लक्षात ठेवा. तेव्हा जमलं तर मेंदू आणि हृदयाचं सॅनिटायजेशन करा. सॅनिटाजेशनमध्ये थोडी माणूसकी अॅड करा.
डिलिव्हरी बॉयचं स्वत:चं कुटूंब आणि जीवन आहे. ही माणसं जीव धोक्यात घालून आपल्यापर्यंत येतात ते केवळ पैसे आणि नोकरी टिकवण्याकरताच. पण, माणूस म्हणून कष्टाने कमवतात भीक नाही मागत किंवा चोरी-लबाडी नाही करत. सर्व्हिस प्रोव्हाडयर आहेत. त्यांच्या कामाची प्रतिष्ठा आहे आणि ती राखणं आपलं कर्तव्य आहे. त्यांना चांगली वागणूक द्या. ते पण कोरोना असलेल्या जगात वावरताहेत तुमच्याचसारखे. पण, हात आणि शरिराच्या सॅनिटाजेशनबरोबर मन आणि मेंदू पाक ठेवून ते त्यांचं काम करतात. तेव्हा तुमची मनं आणि कृती थोडी सॅनिटाइज असू द्या.
(लेखिका एशियन एज ला Principal correspondent आहेत.) 9619196793