तर काय असतं हे EUA? आपण थोडक्यात बघूया. जसं वर सांगितलं त्या प्रमाणे व्हॅक्सिन अप्रूव्हल प्रोसेस ही वेळखाऊ आणि मोठी असते. अर्थात ती तशी असणं सेफ्टी कन्सर्न्ससाठी गरजेचं असतंच पण पँडेमिक सारख्या निकडीच्या प्रसंगामध्ये तातडीने उपाय शोधणं गरजेचं असतं आणि तो उपाय करताना कमींतकमी अपाय कसा होईल हे बघणं सुद्धा महत्वाचं असतं जे EUA द्वारे शक्य होतं. प्रत्येक देशाचे EUA साठीचे काही नियम असतात, जसं की US FDA ने कोरोना व्हॅक्सिन बाबत सांगितलं आहे फेज तीन मधला डेटा जेव्हा दाखवेल की लस ५० टक्क्यांच्या वर आजार रोखण्यात परिणामकारकता दाखवेल आणि कमीत कमी ३००० व्हॉलेंटीअर्सवर चाचण्या घेण्यात येईल तेव्हाच ते व्हॅक्सिन EUA चा अर्ज करण्यास पात्र असेल.