हा वैदिकांकडे वळणारा विचार सांख्यांच्या मूळ व खऱ्या स्वरूपाला लागू होणारा मात्र नाही. मुळात सांख्य जडवादी व वेदविरोधी होते. कपील मुनी हे सांख्यांचे आद्य प्रवर्तक. हा विचार वस्तुमानांची संख्या महत्त्वाची मानतो व त्यांचे वेगळेपण समजून घेणे ही गुणवत्ता महत्त्वाची मानतो. पाच महाभूते, पाच कर्मेद्रिंये, पाच ज्ञानेंद्रिये, मन, ही 16 विकृत तत्त्वे, महद्तत्त्व, अहंकार, शब्दतन्मात्र, रूप, रस व गंध ही आणखी तीन तन्मात्रे, प्रकृती-विकृती या सदरात मोडतात. पुरुष या तत्त्वाचा समावेश यांतल्या कुणातही होत नसून तो स्वतंत्र आहे. त्याचे साऱ्यांपासून (प्रकृतीसह) वेगळपणे ओळखणे हेच सांख्यात ज्ञान मानले जाते. वैदिकांत तोच मोक्ष ठरतो.
राहुल सांकृत्यायन यांनी ‘व्होल्गा ते गंगा’ ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली. तिची सुरुवातच त्यांनी आई या मातृसत्ताक जीवनपद्धतीच्या वर्णनापासून केली आहे. कालांतराने यांतील काही जमाती पितृसत्ताक झाल्या… मात्र काहींनी ही पद्धत अजूनही जपली आहे.