बालपणी गाडगेबाबा मला त्यांच्या मुलीच्या रूपाने भेटायचे. आलोकाबाई शाळा-गोरक्षणाच्या प्रांगणातल्या खोलीत आपल्या कुटुंबासमवेत राहायच्या. बाबांची ही कन्या बहुदा दर शुक्रवारी आमच्या घरी माधुकरी मागायला यायची. परसदारी वाढलेले अन्न जवळच्या कापडावर घेऊन झाडाखाली बसून खायची. नळाचे पाणी पिऊन निघून जायची. माझ्या बालसुलभ मनाला प्रश्न पडायचा. आपण गाडगे बाबांच्या शाळेत शिकतो आणि त्यांच्या मुलीला भीक वाढतो? आई म्हणायची, मोठा झाला की, कळेल तुला!
बाबासाहेब आंबेडकर या शृंखलेची सशक्त कडी होते. हे पत्रातून व बाबांच्या कीर्तनातून लक्षात येते. महाराष्ट्र निर्मितीमागील हा ‘प्रबोधन काळ’ सुवर्णदशक होते, हे इतिहास वाचण्यातून जाणवते.