मी धाकटय़ा बहिणीकडे आराम करायला जावं, तितक्या सहजनेतं तिच्या घरी चार-चार दिवस राहायला जात असते. तेव्हा खास माझ्या आवडीचं जेवण, सिनेमा-नाटकं, मुलीसोबत धमालअसा भरगच्च कार्यप्रम असतो. या चार दिवसात ‘तो’ आमचा ड्रायव्हर असतो फक्त. कधीतरी मग ती या सगळ्याचं उट्टं काढते. ‘दिदी, तुमचं ते घरगुती तेल बनवा ना, माझे केस किती जाताहेत,’ ‘दिदी, मला तुमच्यासारखी पर्स हवी,’ ‘या वाढदिवसाला मला ‘फॅब इंडिया’चा ड्रेस हवाय हां,’ अशा फर्माइशी हक्काने करते. माझ्याच मनात ‘तिच्या’बद्दल राग नाही हे पाहिल्यावर माझ्या सुविद्य लेकीनेही आपल्या पपाच्या दुसऱ्या बायकोशी शहाण्या मुलीसारखं छान जुळवून घेतलंय. दोघी तशा समवयीनच आहेत! माझी लेक माहेराला येते तेव्हा दोन-दोन घरची माहेरवाशीण असते. ‘तिचा’-माझा सलोखा दाखवणाऱया ढीगभर घटना मी सांगू शकते. त्या वाचून कौटुंबिक जिव्हाळ्याचे कढ येतील वाचकांना. पण दोन टोकाचे वेगळे स्वभाव असलेल्या आणि नातं सांगायचं झालंच तर ‘सवती’चं नातं असलेल्या दोन बायकांनी कसं काय बुवा एकमेकींशी पटवून घेतलं, हे वाचणंअधिक रोचक, मनोरंजक (आणि उद्बोधकही) होईल.
हे सगळं अचाट आणि अफाट थोर आहेय….🙏🏻🙏🏻
You are simply great मिथिला ताई 🙏🏻❤️💕
Nice
Nice ,not wonderful. Emotional effects are not important but truly effective
मनाला प्रचंड आवडले… तुटक तुटक वाचलेले आज सविस्तर वाचायला मिळाले.. सगळ्या व्यक्ती अगदी जवळच्या होऊन बसल्या आहेत.. मिथिला सुभाष.. 🌹❤🌹
He vachtana dolyat Pani aal …ashakya ahe Sagal..