(साभार: कर्तव्य साधना)
28 सप्टेंबर 1929 रोजी जन्मलेल्या लता मंगेशकर यांचा दोन दिवसांपूर्वी 92 वा जन्मदिवस साजरा झाला . सन 1942 मध्ये अवघ्या 13 व्या वर्षी त्यांच्या गायन कारकिर्दीची सुरुवात झाली. जवळपास सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 980 हून अधिक हिंदी चित्रपटांसाठी गाणी गायली. त्यासोबतच वीसहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमधूनही त्यांनी गायन केले. 2001 मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ या भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले. त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून संत मीरेच्या पदांना त्यांनी जो स्वरसाज चढवला त्याचा आस्वाद घेणारा हा लेख…
………………………………………

मीरेच्या मूळ पदांत सर्व रसांचा भरभरून वापर झालेला आहे परंतु दीदींनी ही पदे गात असताना जोपासला आहे तो शांतरस! परंतु या शांतरसाचेही विश्लेषण केले तर स्वरांचे असे काही विराट रूप दिसू लागते की, सामान्य गायकासाठी ही पदे गात असताना तोच शांतरस त्यांच्यासाठी रौद्ररस होऊन जावा! उदाहरणच घ्यायचे झाले तर
हृदयनाथजी यांनी काही वर्षांपूर्वी दूरदर्शन सह्याद्रीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलेले होते की, दीदीशिवाय स्वर्गातील जर प्रत्यक्ष सरस्वती समोर आली तर तिलाच मी ही मीरेची गाणी देऊ शकतो. अर्थात पंडितजींचे हे बोल बंधूप्रीतीचे नसून एका खऱ्या संगीतकाराचे बोल आहेत, ही बाब कुठलाही संगीत समीक्षक अमान्य करू शकणार नाही. मीरेची
संत मीरेने तिच्या पदांत साहित्यिक अलंकारांचा वापर केलेलाच नव्हता असे नव्हते. अतिशयोक्ती, रूपक, विप्सा, उत्प्रेक्षा अशा कितीतरी अलंकारांचा तिथे भरभरून वापर झालेला आढळतो. परंतु मीरेच्या भक्तीची तृष्णा, तिच्या विरहाची तीव्रता इतकी प्रखर होती की, त्या अतिशयोक्तीदेखील फिक्या वाटू लागतात. तीच गत इतर अलंकारांचीही होते. त्यामुळे अंततः अलंकारांचा वापर होऊनही ती पदे अनलंकृत ठरतात. नेमकी हीच गोष्ट दीदींच्या गायनाबाबत होते. गाताना दीदींची भावविभोरता इतकी उंच पातळीला पोहोचते की, गायनाच्या इतर सगळ्या कलाकुसरी त्या संगीतसागरात छोट्याछोट्या लहरी होऊन मिसळू लागतात आणि आपल्यापुढे उभा राहतो तो स्वरसागर! मीरेच्या भक्तिसंगीताने भरलेला अथांग स्वरसागर!






