महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आर . आर . उर्फ आबा पाटील यांची आज दहावी पुण्यतिथी. दरवर्षी त्यांचा जन्मदिवस व पुण्यतिथीला या लोकप्रिय नेत्याची अनेक रूपं डोळ्यासमोर येतात. पत्रकार परिषदा आणि अनौपचारिक गप्पांमध्ये आबांसोबत खूपदा मनमोकळ बोलता आलं. मात्र त्यांची विशेष स्मरणात राहणारी आठवण आहे ती त्यांच्यासोबतच्या हेलिकॉप्टर प्रवासाची. २००९ मध्ये निवडणूक प्रचारासाठी ते आले असता त्यांच्यासोबत प्रवास करताना हेलिकॉप्टर दोन तास हवेत भरकटलं होतं. त्या अविस्मरणीय प्रवासाची ही आठवण