अत्यंत लोकप्रिय शायर आणि गीतकार क़तील शिफाई यांची ही गझल. ते पाकिस्तानी शायर असले तरी भारतातही त्यांची लोकप्रियता होती. जगजीत सिंग यांनी त्यांच्या गझलांवर ‘माईलस्टोन’ नावाचा एक अख्खा अल्बम काढलाय. हा अख्खा अल्बमच खूप मेलोडियस झालाय. एक से बढ़कर एक अशा गझला आहेत त्यात. प्रेम आणि दु:ख यावर क़तील यांनी खूप लिहिलं. आपल्या व्यक्तिगत जीवनातही ते वारंवार प्रेमात पडायचे. कधी पूर्तता तर कधी अपूर्णता. अपूर्णतेतून शायरी आली असावी. प्रसिद्ध गायिका इक़बाल बानो यांच्यासोबतच्या त्यांच्या प्रेमाची चर्चा तर एकेकाळी खूपच रंगली होती. गोष्ट लग्नापर्यंत गोष्ट येऊन ठेपली होती. क़तील हे सोप्या भाषेत, आम आदमीला समजेल अशा भाषेत लिहिणारे शायर आहेत. सुरेख विरोधाभास त्यांच्या शायरीत सहज उतरतो.
वसुंधरा काशिकर माझी विद्यार्थीनी. राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत महाविद्यालयाला प्रथम स्थान पटकावून मोठंस शिल्ड आणणारी विदुषी.
किया है प्यार जिसे….हा लेख वाचला. वेगवेगळी संदर्भ दिल्याने अतिशय मार्मिकपणे मांडणी केली.लघुकथा , गझल ,शायरी , प्रचंड वाचनामुळे अलगदपणे मांडलेली मते…यामुळे लेखनीची सौदर्यता सहजपणे दिपता येते. वसुंधरा तुझं अभिनंदन….