अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.
Most realistic
फारच जळजळीत वास्तव लिहिल आहे. हे सगळ अंगावर येत. आपण यापासून तोंड लपवल तरी आपल मन आपल्याला खातच राहील, अशा अनुभवांना तुम्ही मोकळी वाट करून दिली आहे. माणूस म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे ही भावना हे लिखाण वाचून वाढीस लागते. शुभेच्छा आणि अभिनंदन.