पंचम : स्वयंप्रकाशी सूर

-प्रपुरीका जोशी, नाशिक

संगीत .,. संगीतात जादू काय आहे हे दाखवून देणारे आर. डी. .सगळ्या जगाला ,मनाला भावायला जे कसब लागते ,ते संगीत त्यांनी दिले. स्वरांचे जे साम्राज्य असते, त्यावर त्या गीत वर ,एक विशिष्ट संगीताची साथ लाभली की जी अफलातून धून तैय्यार होते ती आर .डी. च्या गाण्यातून आपल्याला ऐकायला मिळाली…म्हणजे एखादे गाणे तुम्ही ऐका,त्यातले music मधले कॉम्बिनेशन ऐका ,..त्यां सिनेमा ची काय मांगणी आहे..,कोणते music घेतले तर ..ह्या अंतरा मध्ये, ..असे त्यांचे संगीत, ताल,ठेका अजुन लोकांना भावले..!!

“होमिजी मुल्ला” नावाचे पारसी बावा त्यांच्या बरोबर ३०वर्ष काम करत होते ..त्यांच्या कडून इतक्या वेगवेगळ्या पेटर्न मधून आर डी नी music वाजवून घेतले आहे की आपण थक्क होऊन जाऊ… “ओ मेरे दिल के चेन…”ह्या गाण्यात जी सुरुवाती का डग्गी वाजती आहे ऐकाल..”ओ मतावली आखों वाले, अलबेला दील वाले..”ऐकल् त्यात चक्क कंगव्यानी घासून music उत्पन्न केले,..,”भिगी भिगी रातोमे..”ऐकाल ह्या गाण्यात जो ‘ थंडर इफेक्ट’ तैय्यार केला आहे, पाऊस ,वीज कडकडणाऱ्याचा तो दोन पातळ पत्र्याना लयबध्द हलवून येणारा आवाज आहे..,तो
रेकॉर्ड केला,…”होगा तुजसे प्यार कोन,हमको तो हे तूजसे प्यार हे.. कंचन “.तेव्हा त्या दोन ढोलकी मध्ये सेंड पेपर घासायचा आवाज ची जादू दिसेल..”मत कोडी कव्वालि हडा..हे प्यार मे…” ह्या मधली डफली ऐका…पंचम दा नी ह्या सर्व गाण्यांचा संगीत मध्ये जीव ओतला आहे,म्हणून ही गाणी एवढी अमर झाली.हे सोपं नव्हतं च,..ह्या सगळ्या वेगळ्या धून ,अफाट वाद्य मधून पाहिजे तो आवाज ,तो ठेका,ती चाल त्यांनी आपल्याला ऐकवली ..त्यामुळे हे सर्व गाजले,अगदी सिने रसिक नी ही गाणी डोक्यावर घेतली..

काही गाणी अर्थ लावणारी असतात.काही गीत उत्तम असणारी ..,त्यांचा चाली,संगीत त्या सारखे च उत्तम आर.डी. नी त्यात पेरले ..,ताल,आणि चाल त्या साठी संगीत दिग्दर्शक ला एक संस्कार करावा लागतो..तो सूर आपल्याला कुठे घेऊन जातो..त्या सुर ला एक मस्त कॉम्बिनेशन मध्ये ओवले…

आपल्याला ते सहज कळत नाही,पण जेव्हा लता जी , आशा ,किशोरकुमार च्या गाण्या ना ऐका ज्यात आर डी. चे म्युझिक आहे..त्यात आर.डी. चा एक छाप आहे,ते ठेका धरायला लावणारा..त्या संबंध गाण्याला बघावेसे पेक्षा ही ऐकावेसे वाटणारे..एवढे एकरूप होणारे… आर.डी. ओळख सांगणारी ही गाणी..

अशा आणि आर.डी..”पिया तू…. अब तो आजा”,”दम मारो दम”,”चुरा लीया हे तुमने जो दीलको”,”हाय रे हाय तेरा घुंघटा”,”ये लडका हाय अल्लाह केसा हे दिवाना”,”
“कही न जा….,आज कही मत जा”,”खुलं खुल्ला प्यार करेंगे ..” ऐकाल.

सुगम संगीत ला हे सुगम का म्हणतात.., आश्चर्य वाटते…पण हे गाणे अतिशय अवघड आहे ..त्याची चाल,गायक,का त्याचे music जेव्हा एकरूप होते तेव्हा ते गाणं अगदी त्यांचा कडव्या सगट आपल्याला मनात घर करते..आशा जी आणि आर डी. चे असे किती सुंदर गाणी..त्रिवेणी संगमात तुम्ही नाहुन निघता अगदी..
चाल सुंदर जाली की त्या सुरांचा अर्थ असा झीरपत जातो…आर. डी. नी ही नस बरोबर पकडली होती.ते अधीर होऊन जायचे..एखादे music त्यांना सुचले की,त्यांचा गाण्यातून तो जोश, धूमधडाका,शरारत,हास्य सर्व अगदी अनुभवले आपण.

लताजी बरोबर आर डी चे music … milestone ठरणारी गाणी ऐकायला मिळाली..इतकी जाणवली ती…
संगीता चे तुम्ही पंडित असायला च पाहिजे असे काही नसलं तरी तुम्ही उत्तम ठेका,ताल, , उत्तोत्तम music कसे देऊ शकता हे आर डी च्या संगीत प्रवास मधून कळते..हे त्याना असे कसे ,व का सुचले हे सांगता येत नाही ..,एवढा रिधम त्यांचा रदयात मुरला होता.. music मधून वेगवेगळे वाद्य वापरून
इतक्या वेगवेगळ्या कन्सेप्ट त्यांनी आणल्या ..

पंचम दा चे गाणे सुरू होते,तेव्हाच त्यांना दाद द्यायला सुरुवात झालेली असते मनात जणु….अगदी लांब पहिल्या music piece ऐकुन च…लता जी, बरोबर आर.डी चे म्युझिक म्हणजे एक एक मास्टरपीस होते…
लता जी बरोबर ची आर डी ची गाजलेली गाणी..

“आपकी अाखो मे कुछ मेहेके हुं ए से ख्वाब हे…”बाहो मे चले आओ”,”नाम गुम जायेगा”..”भीगी भिगी रातो मे”..”तुम आ गये हो..नुर आ गया हे””,”तेरे बिना जिया जाये ना”..”आजा पिया तोहे प्यार दू”..”इस मोड से जाते हे..”,”आज कल पाव जमी पर नही पडते मेरे”..”तूने ओ रंगीले कैसा जादू किया”.”मे चली मे चली”..” ….अश्या गाण्या मधून ते 1942.a.love story पर्यंत…”कुछ ना कहो..कुछ भी ना कहो” पर्यंत ही जादू ऐकायला मिळाली. गाण बघता क्षणी त्यांना कोणते music, ठेका ह्याला घ्यायला पाहिजे हे दिसायला लागायचे आर डी ना जणू…,.!!

सात मात्रा मध्ये कोणता स्वर उचलावा,कोणत्या शब्दा साठी ह्या विचारानं पेक्षाही कधी तरी पंचम च्या कोपरखळ्या च भावणारी ,आवडणारी उडत्या चाली ची गाणी ही खूप गाजली..इतके नव नवीन प्रयोग त्यांनी स्वतः ही गाउन दाखवले सिनेमा मध्ये
त्याला मग तसे शब्द पेरले आणि ते गाणं फेमस झाले…

“पिया तू अब तो आजा…”मधले….आ..हा.. हा,री.रा ..र…र.. मोनिका ….ओ माय ……”.काय तुफान गाणं..आज ही तेवढेच लोकप्रिय..,त्यात हेलन जेवढी आवडली तेवढेच हे म्युझिक ही…
तर
शोले मधले “हुं…..मेहेबुबा..मेहेबूबा…गुलशन मे गुल खुलते हे…”..”

आशा जी आणि आर डी चे भन्नाट कॉम्बिनेशन मध्ये “दम मरो दम”..”चुरा लिया हे तूमने जो दील को”..,”हाय रे हाय तेरा घुंघटा”..”ये लडका हाय अल्लाह के हे दीवाना”..” अशी किती तरी गाणी..फक्त आर.डी.ची च आठवण करून देणारे music ..

संगीता चे तुम्ही पंडित असायला च पाहिजे असे काही नसलं तरी तुम्ही उत्तम ठेका,ताल, , उत्तमोत्तम music कसे देऊ शकता हे आर डी च्य संगीत प्रवास मधून कळते..हे त्याला असे कसे ,व का सुचले हे सांगता येत नाही एवढा रिधम त्यांचा रदयात मुरला होता.. music cha
इतक्या वेगवेगळ्या कन्सेप्ट त्यांनी आणल्या ..

दाद मिळवण्यार्या चे आयुष्य हे दाद घेण्याकडे नेहेमी वाहत राहते.. ऐकणाऱ्यानी आरडी च्या music वर खूप प्रेम केले खूप दाद त्यांनी कित्येक गाण्यांवर मिळवली..

संगीताच्या सुरां वर प्रेम जडले की काय मिळवले,का कोण आले,किती आले ह्याचा शी काही संबंध च राहत नाही,..अश्या स्वरूपात. कला वर प्रेम करणारे,कितीतरी मोठा ठेवा ठेऊन जातात आपल्यासाठी ह्याची महत्ती भारतातील प्रत्येक व्यक्ती ला,संगीतावर,ह्या गाण्यांवर मनापासून प्रेम करणाऱ्या सिनेरसिक ला आज पटते आहे.!!..जस जशी दाद वाढली.., तस तसे,संगीतात कॉम्बिनेशन करण्याकडे कल वाढला..आर डी चा.
किशोरकुमार आणि आर डी ,ही अशी च एक जोडी,
किशोर कुमार आणि आर डी हे भन्नाट कॉम्बिनेशन नी. दिलेली गाणी
.”ओ मेरे दिल के चेन..चेन आये मेरे दिल को दुवा किजिये”
“ये जो मोहोबत हे…,”,”प्यार दिवाना होता हे.., मसताना होता हे”. ,”एक अजनबी हसीना से यू मुलाकात”..,”
“बचना ए हसिनो”. ह्याचे music ऐकाल…”.,””आपकी आखोमे कुछ ..”..”रिमझिम गिरे सावन..”,,”तुम आ गये हो..नूर आ गया हे””,”चांद चुराके ला या हुं..”ओ हंसीनी मेरी हंसीनी.. कहा उड चली ” ..ह्या गाण्याचे music ऐकाल…”फिर वही रात हे..”
कितीतरी प्रसिध्द जालेली ही गाणी तेही एडवर्टाइज न करता.. “गुलाबी अाखे जो तेरी देखे..,शराबी ये दिल”..अजुन ही प्रत्येक ऑर्केस्ट्रा मध्ये म्हंटले जाते “ये जवानी हे दिवानी..” ह्यातला अंतरा..सुरुवात ऐकाल..,त्यांचा मनात दोन वेग वेगळ्या धारा वाहत असाव्या जोश,धुंद,धमाल अधीर,बेताब झालेले काही अशी गाणी मधून ते आपल्याला सतत भेटले.

“जावेद अख्तर,गुलझार ह्यांच्या बरोबर आठवण राहावी अश्या फिल्म संगीत होते ..ईजाजत व १९४२ अ लव स्टोरी..ह्या फिल्म मधली गाणी ..तिसरी मंजिल..आणि आंधी मधली गाणी आपण कितीही वेळा केव्हाही ऐकायला तैय्यार असतो कारण त्या इतक्या मनाच्या जवळ कानामध्ये पोहोचवणारे ते सात सुरातल्या पंचम चे स्वर होते..आर डी चे होते..,…!!

राहुल देव बर्मन उर्फ आर.डी. त्यांच्यात ऊर्जा होती ती,वाहत होती,धो धो..तो एक वाहणारा झरा होता ..संगीत चा…रियाझ काय सहज मुरलेला होता स्वभाव मध्ये.. ट्यून हातात बोटात होती जणू..

केहेते हे

ये जो आसानी हे,वो आसान हे,पर बडी मुश्किल
से आती हे आसानी भी..!!
बस जिगर चाहिए.

ही सहजता त्यांच्यात होती..!! .

R . D. BURMAN || Old Rare Interview

Previous articleमनीष सिसोदिया प्रणित (शिक्षणाचे) दिल्ली मॉडेल
Next articleउद्धव ठाकरेंचा अनिष्ट पायंडा !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here