अखेर मिसेस डीआयजींना आणण्याची जबाबदारी एका अनुभवी पोलीस निरीक्षकाने स्वीकारली आणि विश्रामगृहावर धाव घेतली . चौकशी केल्यावर आणि बरेच आढेवेढे घेतल्यावर मिसेस डीआयजींनी सांगितले की ,कार्यक्रमाला येण्याची त्यांची खूप इच्छा आहे पण , त्या त्यांच्या बांगड्या (अर्थातच सोन्याच्या ) आणायला विसरल्या आहेत . त्यामुळे तयार होऊनही त्या कार्यक्रमाला आलेल्या नाहीत . पोलीस निरीक्षक अनुभवी आणि जुना-जाणता होता आणि डीआयजी साहेबांची ‘ख्याती’ छानच जाणून होता . म्हणून कार्यक्रमाचा खोळंबा टाळण्यासाठी मिसेस डीआयजींना घेऊन त्याने चंद्रपुरातल्या त्यातल्या त्यात मोठ्या सराफ दुकानात धाव घेतली . मिसेस डीआयजींनी सोन्याच्या चार बांगड्या आणि दुकानात आलोच आहोत तर , दोन पाटल्याही खरेदी केल्या . नंतर पारितोषिक वितरण पार पडले . मात्र , या खरेदीची ( त्यावेळी ही खरेदी साधारण ४२-४३ हजारांची म्हणजे खूपच मोठी होती .) बरीच चर्चा झाली . त्या पोलीस निरीक्षकालाही एवढी रक्क्म एका हप्त्यात देणे शक्य नव्हते . त्याने तीन-चार हप्त्यांत फेडण्याची सवलत दुकानदाराकडून मागून घेतली .
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.