म्हैसाळकर घराणं मुळचे मिरजेतले . नंतर ते अमरावतीला आले . मनोहर म्हैसाळकर नोकरीच्या निमित्तानं नागपूरला आले . ते नाटकवाले . नाटक आणि गाण्यातली त्यांची आणि माधवी म्हैसाळकरांची जाणकारी थक्क करणारी होती . माधवी वहिनी तर गाण्याची परंपरा असलेल्या घरातून आलेल्या , बडबड्या आणि अतिशय लाघवी . म्हैसाळकरांसोबत शेकडो लोक टिकून राहिले त्याचं श्रेय माधवी वहिनीच्या लाघवीपणा आणि अगत्याला आहे . खिलवणं आणि पिलवणं हे दांपत्य अगत्यानं करत असे .