आयला आजचा दिवसच काय घेऊन बसलात राव हे आमचं आख्खं आयुष्यच बच्चनने बनवलेय… उसी के नाम हैं ये जिंदगी !
लेकानं कळत्या वयाच्या थोडं आधीपासून बोट पकडलंय ते आजतागायत सोडलेलं नाही..
काल परवाच भेटलांय असंच अजूनही त्याच्याकडे बघितले की वाटतं…
या अनेक वर्षात काय दिलं नाही या माणसानं असं विचार करुन करुन डोक्याचा भुगा केला ना तरी काहीही सापडत नाही !
जेवढं लिहू तेवढं कमीच आहे या माणसाबद्दल !
एक गोष्ट मान्य करायला काहीच हरकत नाही जाहीरपणे की बाबा रे, तू आम्हांला आयुष्याचा आनंद भरभरून देतोयस ! भरपूर रंगतदार बनवतोयस आमचं जगणं !
अजूनही तुझ्या आवाजात…
‘पीटर…’ अशी हांक कानावर आली की शहारा येतोय त्या आवाजाचा, त्यात गच्च भरलेल्या आत्मविश्वासाचा !
घुसमटल्या आवाजात, ‘चाँदनी…’ असं ऐकायला आलं की समोर येतोयस तू आणि, ‘ये रात हैं या तुम्हारी जुल्फें खुली हुई हैं…
‘जिंदगी तो बेवफा हैं…’ त्या कुठल्यातरी रस्त्यावरच्या वळणावर मोटर सायकलवर तू दिसतोस !
फोर्टमधल्या कमानीतून फिरताना ७८६ बिल्ला सापडतो आणि समोर तू दिसतोस, ‘डावरसाब मेरे पीछे सिर्फ मेरी तकदी़र होगी…’ हे सांगणारा !
बंगलोरजवळच्या रामनगर जवळून जाताना तिथल्या भल्यामोठ्या दगडावर डाव्या हातातली बंदूक रोखलेला तू दिसतोस, ‘ गब्बर, अपने आदमियों को कहदे की बंदूके फेंक दे वरना भून के रख दूँगा…’ खणखणीत आवाजातून तू भेटतोयस रे !
‘वीरु, तेरे बच्चों को कहानी सुनाना तो बाकी रह गया यार… लेकिन तू जरु़र सुनाना ये अपनी दोस्ती की कहानी…’
संजीवकुमार, दिलीपकुमार यांच्यासमोर तेवढ्याच ताकदीने,समर्थपणे उभा राहीलास तू… त्रिशूल आणि शक्ति !
‘नो मीन्स नो…’ किती खणखणीत पटवून दिलेयस तू !
‘मुझे जो सही लगता हैं, वोही मैं करता हूँ, चाहे वो भगवान के खिलाफ हैं, समाज के खिलाफ हैं, पुलिस, कानून… या फिर पूरे सिस्टम के खिलाफ क्यूँ ना हो…’
सरकार आहेस तू, सरकार !
१९७८ मधेच तू जाहीर केलं होतंस…
‘डॉन को पकडना मुश्किल ही नही, नामुमकिन हैं…’
खरंच रे भावड्या… तुस्सी यारा ग्रेट हो !
एक सांगू का, रेखा नंतर झीनतही मस्त दिसली रे तुझ्या सोबत… खुलत होती झीनत तुझ्या सोबत स्क्रीनवर… आठवतंय का रे… डॉनमधे ‘एक कन्या कुँवारी, हमरे दिल में उतर गयी हाय…’ म्हाणतोस तेव्हा लाजलेली झीनत आणि नंतर तिने तुझ्यासोबत तसंच व्हेनिसमधल्या वॉटरवे मधले ते नावेतले गाणे… अं हं… ऐसे नही गाके सुनाओ ना…’ येस्स बच्चन, यू आर राईट… ‘दो लब्जों की दिल की कहानी…’ खर सांगतो रे कसले तुम्ही दोघंही चेरी ब्लॉसमसारखे टवटवीत दिसला आहात… खूळ लागतंय आजही ते गाणं बघितलं की !
आम्ही आपलं गंगे वरच्या बोटीत बसून बायकोला सोबत घेऊन (स्वतःच्या) तो प्रकारही केला..
आणि खरं सांगतो रे..
ते तुलाच् जमतं..
बच्चन… यू आर ग्रेट यार !
अनेक जणांना तू इन्स्पायर केले आहेस… अगणित जणांसाठी तू जीवाभावाचा मैतर बनून राहिलायस…
तू म्हणतोस तसं, ‘टॉपला पोहोचणं तसं फार अवघड नसतंय पण तिथे सतत राहणं, ती पोझिशन सस्टेन करणं हेच अवघड असतं !’