भाऊ…

-प्रा .दिनकर वानखडे , यवतमाळ

…………………..

भाऊ,

एखादा बेलाग बुलंद बुरुजासारखा 

तू एकटा उभा आहेस

सारे आसमंत ढासळलेले असतांना…

तुझे एकमेव अस्तित्वच, अभय आहे आम्हाला

लोक म्हणायचे, खडकांवर पाऊलवाटा नसतात

पण आज तुझ्या चालण्याने 

लहान लहान पाउलवाटांचे

झालेले “ राजमार्ग ” …

निर्मिती तुझीच असते ……

अस्तित्वही नाकारलेल्यांना

सन्मानाने उभे करणेही किमया तुझीच असते

हक्क मागायचा असल्यास

कुणापुढे हात पसरून

लाचार व्हायचे नसते

तर पाचही बोटांची बांधलेली 

संघटनेची मुठ पुरेशी असते

हे ही तूच शिकवलेले असते

बळ तुझ्या एकट्याच्या 

पंखातले…. सुसाट वादळ वाऱ्यात

सर्वांना सुखरूप पैलतीरी

घेऊन जाणारे तेही तुझेच असते ….

पण तरीही “आभार”

हे फक्त शब्दांचेच 

प्रदर्शन असते म्हणून

नाकारणाराही तूच असतो

तुझ्या सारखा धुरंधर

धुरकरी तूच …

अजून तरी आसपास

दुसरा कुणी दिसत नाही…

भाऊ,

तुझ्या लेखणीची पुराणी

तुझ्या शब्दांचे आसूड

आणि “निष्ठुर नियमांचे”

लगाम हातात घेऊन

जेव्हा तू एकटा रणांगणावर

उभा असतोस तेव्हा

मोठमोठ्या मुजोर महाभागांपुढे देखील

शरणागती शिवाय दुसरा उपाय नसतो

पण तरीही तुझी छाती इंचभरही पुढे येत नाही

उलट तुझ्या विजयाच्या मिरवणुकीत

आमचाच गुलाल आम्ही स्

वतःवर उधळून घेत असतो….

तेव्हा तू केव्हाही पुढे निघून गेलेला असतो

पुढच्या तयारीला

कीर्तन संपता…संपता

गुपचूप निघून जाणाऱ्या गाडगेबाबांसारखा…

94229 22685

 

Previous articleनिकिता ठुकराल ते प्रियांका चोप्रा… ते प्रियांका चोप्रा… कहाणी सेम!
Next articleपरमसुंदरी… फुलझडी- ‘मीमी’
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here