ममता आणि डाव्यांतील वैर साताजन्माचं आहे . म्हणजे डावे ममता यांना राष्ट्रीय नेतृत्व करण्यासाठी पाठिंबा देणार नाहीत आणि ममता तो घेणारही नाहीत हे उघड आहे . डावे आता केवळ केरळपुरते मर्यादित आहेत . शिवाय अणू कराराच्या वेळी घेतलेल्या भूमिकेमुळे डाव्यांच्या विश्वासाहर्तेचा बाजार तसाही उठलेला आहेच . एकुणातच डाव्यांची अवस्था सध्या देशाच्या राजकारणात उरलो केवळ नावापुरता अशी झालेली आहे म्हणजे असल्या-नसल्या डाव्या सदस्यांच्या पाठिंब्याचा मुद्दा आधीच निकाली निघतो .