मागच्या आठवड्यात तू हैद्राबादला गेला होतास, तर रोज रात्री शहाण्यासारखा कॉल करत होतास. परत आलास की पुन्हा बिझी. दोन दिवसांपासून मी कोल्हापूरात मैत्रिणीच्या लग्नात आलीये हे तुला माहितीये का? उद्या निघेन. इथं बर्याच दिवसांतून निवांतपणा अनुभवतेय. भला मोठा मित्र-मैत्रणींचा गोतावळा जमलाय. फुल धमाल सुरूय. कित्येक वर्षांपासूनचा आमचा जुना ग्रुपंय. तरी तुला मिस करतेय. खूपखूप मिस करतीये. एकाएकी साक्षात्कार झाला तुझ्यासोबत मी जितकी कंफर्टेबल आहे तितकी कदाचितच कुणासोबत…! काळ-वेळ-भान सगळं विसरून आपण एकमेकांच्या सोबतीत आनंदी असतो. मला तुझ्यासोबत मजा येते कारण तुलाही येत असते.