■ पुस्तकंपुस्तकं सांगतात गोष्टवाहून गेलेल्या दिवसांची, युगायुगांचीविश्वाची, माणसाची, आजची, कालचीउद्याची, एका-एका क्षणाची.झाड हिरव्या पानांनी सळसळावं अशा सुखाचीनिष्पर्ण फांदीच्या एकाकीपणासारख्या दु:खाचीवार्यावर डुलणाऱ्या रंगीत फुलांचीयुद्धात आई बाप मेलेल्या मुलाचीजिंकलेल्या रणाची हरलेल्या मनाची,प्रेमाचीद्वेषाची, श्वासाचीही पुस्तकं सांगतात गोष्टी.मग एकणार ना गोष्टी पुस्तकांनी सांगितलेल्या ?पुस्तकं काही सांगू इच्छिताततुमच्या सावलीत रांगू इच्छितातपुस्तकात पक्ष्याची चोच बोलतेपुस्तकात हिरवंगार रान हलते,पुस्तकात असतो झऱ्याच्या पाण्याचा अवखळपणापुस्तकात दिसतात पऱ्या बागडतांनापुस्तकात असतो क्षेपणास्त्रांचा विध्वंसकाळ्या कृत्यात बुडालेला महाभारतातला कंसपुस्तकातील शब्दांना करुणेची झाक आहेसर्वे संतु निरामय विज्ञानाची हाक आहेपुस्तकं म्हणजे वसुधैवकुटुंबकम्आयुष्य पथावरचा नया कदममग येणार ना तुम्ही ह्या रस्त्यावर चालण्यासाठी?छे हो ! वाट मुळीच अवघड नाही,रस्त्यावरुन चालताना आपण दुकानावरच्या पाट्या वाचतोतेव्हढ्या सहज पुस्तकं वाचायची बस !अहो वाचायला तर लागा म्हणजे पोहचायला लागालहव्या त्या ठिकाणी.पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या सावलीत रांगू इच्छितात….□□○ सफदर हाशमी | भावानुवाद : Dasoo Vaidya
Namdev Koli ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 29, 2019
○ सफदर हाशमी | भावानुवाद : दासू वैद्य
पुस्तकं सांगतात गोष्ट
वाहून गेलेल्या दिवसांची, युगायुगांची
विश्वाची, माणसाची, आजची, कालची
उद्याची, एका-एका क्षणाची.
झाड हिरव्या पानांनी सळसळावं अशा सुखाची
निष्पर्ण फांदीच्या एकाकीपणासारख्या दु:खाची
वार्यावर डुलणाऱ्या रंगीत फुलांची
युद्धात आई बाप मेलेल्या मुलाची
जिंकलेल्या रणाची हरलेल्या मनाची,प्रेमाची
द्वेषाची, श्वासाचीही पुस्तकं सांगतात गोष्टी.
मग ऐकणार ना गोष्टी पुस्तकांनी सांगितलेल्या ?
पुस्तकं काही सांगू इच्छितात
तुमच्या सावलीत रांगू इच्छितात
पुस्तकात पक्ष्याची चोच बोलते
पुस्तकात हिरवंगार रान हलते,
पुस्तकात असतो झऱ्याच्या पाण्याचा अवखळपणा
पुस्तकात दिसतात पऱ्या बागडतांना
पुस्तकात असतो क्षेपणास्त्रांचा विध्वंस
काळ्या कृत्यात बुडालेला महाभारतातला कंस
पुस्तकातील शब्दांना करुणेची झाक आहे
सर्वे संतु निरामय विज्ञानाची हाक आहे
पुस्तकं म्हणजे वसुधैवकुटुंबकम्
आयुष्य पथावरचा नया कदम
मग येणार ना तुम्ही ह्या रस्त्यावर चालण्यासाठी?
छे हो ! वाट मुळीच अवघड नाही,
रस्त्यावरुन चालताना आपण दुकानावरच्या पाट्या वाचतो
तेव्हढ्या सहज पुस्तकं वाचायची बस !
अहो वाचायला तर लागा म्हणजे पोहचायला लागाल
हव्या त्या ठिकाणी.
पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या सावलीत रांगू इच्छितात….
□□