‘डोंग’ ही तेथील करन्सी आहे. आपला १ रुपया म्हणजे ३२७ व्हिएतनामी डोंग होतो. जर डॉलर डोंग मध्ये बदलून घेतले , तर आपण लक्षाधीश झाल्याचे वाटू लागते. गंमत म्हणजे येथे लहानसे बिल ही 10,000 VND असते. दैनंदिन आर्थिक व्यवहारात व्हिएतनामी डोंग वापरतात . त्यामुळे आपण डॉलरचे डोंगमध्ये रूपांतर करून घेतलेले सोयीचे पडते . Money Exchange Center मधून व्हिएतनामी करन्सी घ्यावी. कारण एक तर विमानतळावर महाग पडते आणि स्थानिक दुकानात फसवले जाण्याची शक्यता असते .इतर परदेशी पर्यटनस्थळांपेक्षा व्हिएतनाम मध्ये वास्तव्य करणे स्वस्त आहे . भरपूर हॉटेल्स असल्याने आपल्याला निवडीला वाव मिळतो.
व्हिएतनामचा प्रवास लग्न समारंभाच्या उपस्थितीने सुरु झाला .त्यानंतर प्रेक्षणीय स्थळांच्या दिशेने आम्ही पावले वळवली .Hanoi , Ho Chi Minh , Ha long Bay , Sa Pa , Hue , Golden Bridge . यापैकी काही ठिकाणांना आम्ही भेट दिली. Ha Long Bay- युनेस्को प्रमाणित , जागतिक वारसास्थळ असलेल्या जगातील नवीन सात आश्चर्यापैकी एक असे हे ठिकाण आहे . . व्हिएतनामची राजधानी ‘ हनोई ‘ पासून येथे जायला साधारणपणे तीन तास लागतात . टॅक्सी किंवा बसने Ha long bay च्या किनाऱ्यापर्यंत जाऊन नंतर तेथून पुढे क्रुझने जावे लागते . क्रूझचे 2 दिवस – 1 रात्र असे पॅकेजिंग घेणे योग्य ठरते . आपल्या इच्छेनुसार 3 स्टार, 5 स्टार क्रूझ उपलब्ध असतात.
गुहेतील नजारा आपल्याला झालेले श्रम विसरायला लावतो . निरनिराळ्या रंगांच्या प्रकाशझोतांनी संपूर्ण गुहा उजळलेली दिसते . आतमध्ये डोंगरातील झिरपलेल्या पाण्यातील क्षार थिजून तयार झालेल्या निरनिराळ्या आकृती बघायला मिळतात . गुहेच्या भिंतींवर लाईम स्टोन ची झीज (errosion ) होऊन वेगवेगळी चित्रे उमटलेली दिसतात .निसर्गाच्या या कलाकृतीपुढे नतमस्तक व्हावे वाटते .