मग कोची येथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला . तेथील हॉटेलचे ऑनलाईन बुकिंग केले . कोचीला पोहोचण्यास रात्रीचे १२ वाजले . रात्र असल्याने रस्ता सामसूम होता . GPS असूनही हॉटेल लवकर सापडेना . हॉटेलला लावलेला कॉलही उचलला जात नव्हता . मग मात्र तेथील मुक्कामाचा विचार बदलून अलेप्पीला जायचे असे ठरले. पाऊस चालू झाला होता . पहाटे ३ वाजता मुक्कामी पोहोचलो .हॉटेल मालक चक्क मराठी बोलणारा होता. त्याने महाराष्ट्रात २० वर्षे काढली होती . त्यामुळे बोलण्यात वेळ गेला . एका प्रसिद्ध हॉटेलबुकिंग अँप चलावणाऱ्यांनी इथल्या हॉटेल वाल्यांचे खूप पैसे थकवलेत व त्यामुळेच ऑनलाईन बुकीग इथले हॉटेल वाले घेत नाहीत असे त्याच्या बोलण्यातून समजले . झोपायला चार वाजले . दोन तास झोप घेवून सहाला सर्वजण उठले , कारण आम्हाला बॅकवॉटरची ट्रीप करायची होती .