हिंदू धर्मातील संचिताचा त्यांनी काठोकाठ अभ्यास केला होता. ते परखड आणि स्पष्टवक्ता होते. ईश्वरावर त्यांची नितांत श्रद्धा होती. धार्मिकतेचा व्यासंग असला, तरी अंधश्रद्धेला त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून किंवा लिखाणातून कुठेही थारा दिला नाही.हृदयाला पाक-साफ ठेवण्यासाठी कुराण किंवा गीता गरजेची आहे, परंतु मेंदू काबूत ठेवण्यासाठी त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. देशभक्ती, सांप्रदायिक एकता, सर्वधर्मसमभावाच्या मिथकांनी त्यांचे साहित्य समृद्ध आहे. गजले प्रमाणे त्यांची ‘दोहा’ या काव्यप्रकार पकड होती. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील आसक्ती त्यांच्या दोह्यातून स्पष्ट होते. आवाजातील कणखरपणा,मार्दव ,स्पष्टोक्ती, रुबाबदार सादरीकरण आणि प्रचंड अभ्यास यांच्या जोरावर त्यांनी हिंदूधर्म, श्रीमद्भगवद्गीता, वेद उपनिषदे,पुराण यांच्यावर केलेली व्याख्याने आजही ऐकणाऱ्यांच्या काना-मनात रुतून बसली आहे. त्यांनी केलेल्या सूत्रसंचालनाने संमेलने मुशायरे बहारदार झाले. जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरच्या साहित्यिकांशी त्यांच्या कितीतरी आठवणी जुळलेल्या आहे. त्यांच्या एक्झिटमुळे साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
परमेश्वर त्यांना सद्गती प्रदान करो, कुटुंबीयांना या दुःखातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य प्रदान करो हीच या प्रसंगी प्रमेश्र्वरास प्रार्थना
स्नेहल, अत्यंत कमी शब्दात पूर्णतः देण्याचा तू प्रयत्न केलास….खूप खूप अभिनंदन… छान लिहितेस…
कलीम सरांच्या तमाम ऊर्जा दायी स्मृतींना विनम्र भावे आदरांजली…….
भावपुर्ण श्रध्दांजली