काश्मिरमधील कथुआ येथे असिफा नावाच्या ८ वर्षीय मुलीवर मंदिरात पोलीस अधिकारी , मंदिराचा पुजारी आणि अनेकजण एकापाठोपाठ पाशवी बलात्कार करण्याची घटना उघडकीस आल्यानंतर देशभर संतापाची लाट निर्माण झालीय . मराठी लेखक , कवी , कार्यकर्ते , पत्रकार यांनी या घटनेबाबत अतिशय तीव्र शब्दात फेसबुकवरआपला संताप व्यक्त केलाय. फेसबुकवर उमटलेल्या काही निवडक प्रतिक्रिया
……………………………………………………………………………………………………….
एका आठ वर्षाच्या मुलीवर सतत आठ दिवस बलात्कार होतो..
एका मंदिरात..
आणि देव बघत राहतात…
तिच्यावर बलात्कार करणारे आपापल्या मित्रांना पण मजा मारायला बोलावून घेतात..
येणारेही त्या बाळावर बलात्कार करतात..
आणि देव बघत राहतात..
तिचा ताबा द्यायला पोलिसांना पाचारण केलं जातं..
पोलीस अधिकारी म्हणतो, मी आधी तिचा उपभोग घेणार..
तो ते करतो..
आणि देव बघत राहतात..
अखेर त्या निष्पाप पोरीची हत्त्या होते..
तेव्हाही देव बघत राहतात..
अशा मादरचोद, भडव्या आणि भोसडीच्या देवांच्या आयची गांड..!!
जगातल्या सगळ्यात घाणेरड्या धर्मात मी जन्मले
त्याची शरम वाटते मला..
हे after thought: मी देवांना शिव्या दिल्या हे ज्यांना/जिला आवडले नाही त्यांनी बेलाशक ग्रुप सोडून जावे.. अशी माणसं इथून निघून गेली तर मला वाईट वाटणार नाहीये.. मी अतिशय धार्मिक हिंदू आहे हे तुम्हाला माहीत आहे.. म्हणूनच त्याच हक्काने त्या देवाला मी जाब विचारू शकते..
-मिथिला सुभाष
…………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………….
दुनियेतील सर्व जाती-धर्म, संस्कार-संस्कृती स्त्रीच्या योनीत येऊन सपाट होऊन जातात. उरतो फक्त लिंगधारी पिशाच्च, जो जाती-धर्म, संस्कार संस्कृतीच्या नावावर योनी खोदत असतो… त्याच्या लिंगाला रक्त लागेस्तोवर. चटक लागलीय त्याला कोवळ्या रक्ताची. आता योनीतून तलवारी पाजळाव्या लागतील. मग खोद म्हणाव किती खोदतो तो… केवढा अहं, केवढा माज त्या चामड्याचा पिशवीचा. कुठल्या योनीतून पैदा झालेत हे आदम? अन सर्व कुश्या नेस्नाबुत केल्यावर कुठे घेऊन जाल हे डेंग… चेचली जावी तुमची ही भुक #पुरुष_नावाच्या_पशुंनो!
-सुनीता झाडे
………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………….
देवस्थान…
नाही नाही…
देवाबद्दल नाही लिहीत मी काही.
हे वेगळं.
हे देवस्थान काय स्वर्गीय होतं…
देवस्थानाच्या कोपऱ्यात त्या आठ वर्षाच्या मुलीला कोंडून घातलेलं.
गोळ्या देऊन झोपवून ठेवून तिला भोगणारे जात-येत राहिले.
तिला अगदी ठार मारण्यापूर्वी
देवस्थानात पूजाअर्चा करणाऱ्याने शेवटचा भोग घेतला तिचा
तिची मान आवळून, मग डोकं दगडावर आपटून… मग पुन्हा फास लावून
ते पोर मेलं एकदाचं.
देवस्थानाच्या पवित्र कोपऱ्यात.
कलेवर गेलं रानाच्या भूमीवर.
देवस्थान कसं आल्हाददायक झालं होतं इतक्याजणांना…
देवस्थानात सुरक्षित रहातात अशी कृत्ये.
देवस्थानावर विश्वास हवा.
देवस्थानात चिरडलेली ती पोर
नक्कीच स्वर्गातच जाणार ना.
जाणार जाणार…
देवावर विश्वास ठेवा.
देवस्थानात देव असतोच
कधिकधी तो सैतान होतो.
परीक्षा पाहातो.
आणि मग उराशी धरतो.
बकरवालांच्या बाळीलाही धरेलच तो उराशी…
अरे थूः!
(कथुआतील बकरवालांच्या त्या लहानग्या मुलीच्या अत्याचारकर्त्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात बाधा आणणारे कायद्याचे रक्षक वकील
देवस्थानाचे खरे रक्षक आहेत. अशा लोकांची भारतमात्ताक्कीज्जै साठी प्रचंड गरज आहे.)
-मुग्धा कर्णिक
……………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………
एक लघुकथा – पुरावे
————————
पोलिस स्टेशनवर पोहोचले, तेव्हा पाय लटपटत होते. काही खाकी वर्दीवाले पूर्ण दुर्लक्ष करत होते, तर काही अगदी रस घेऊन एकटक नखशिखान्त न्याहळत होते. मी एका टेबलासमोरच्या खुर्चीत जाऊन बसले.
“कशावरून?” खुर्चीतला खाकी वर्दीवाला म्हणाला.
“माझ्याकडे पुरावे आहेत.” मी धीर एकवटून पुटपुटले.
“कोणते पुरावे?” त्याने गुर्मीत विचारलं.
मी माझ्या शरीरात हात घातला आणि एक योनी काढून त्याच्या टेबलवर ठेवली. ती चिरफाळलेली होती. मग काही रक्ताचे ओघळ टेबलवर ठेवले आणि वीर्याचे काही थेंब. माझ्या नखांत काही त्वचेचे सूक्ष्म तुकडे अडकले होते आणि मुठीत काही केस उपटून आले होते, ते मी टेबलवर ठेवले आणि ओरखड्यांच्या काही जुड्या.
चुरगळलेले कागदी बोळ्यासारखे स्तन, चावून मांसाच्या धांदोट्या झालेले ओठ ठेवले. माझे दुखावलेले लांबलचक आतडे काढून ठेवले, तेव्हा तर टेबल पूर्ण भरून गेले. तरी थोडी जागा शोधून मी माझी जीभ अत्यंत काळजीपूर्वक टेबलवर ठेवली – तिच्यावर जबानीचे सगळे शब्द न लडखडता ठाम पाय रोवून उभे होते.
मी खाकीवर्दीवाल्याकडे पाहिलं. त्याच्या कपाळावर एक बारीकशी आठी उगवली आणि विरली.
त्यानं डावा हात उचलून टेबलावरच्या मी ठेवलेल्या सगळ्या गोष्टी गोळा केल्या आणि खुर्चीजवळच्या कचराडब्यात टाकल्या.
मी पाहिलं की तो कचराडबा एखाद्या कृष्णविवरासारखा खोल होता. विज्ञानकथांमध्ये मी अशा विवरांविषयी वाचलं होतं की ते कसं त्याच्या कक्षेत येणारी प्रत्येक गोष्ट क्षणार्धात गिळंकृत करतं आणि नंतर ती या जगात कुणालाही कधीही दिसत नाही. त्यात गेलेला प्रकाशदेखील पुन्हा बाहेर पडत नाही.
खुर्चीतला खाकीवर्दीवाला पांढऱ्या रुमालाला हात पुसत मला म्हणाला,”कुठे आहेत पुरावे?”
०००
– कविता महाजन
…………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………..
2013 चा निर्भयावर झालेला अत्याचार आणि कथुआ, उन्नावच्या घटना यात काहीच फरक नाही. या सगळ्या घटनांमधले आरोपी तितकेच नीच नराधम आहेत.
फरक आहे तो या घटनांनंतर उठलेल्या प्रतिक्रियांमध्ये. आणि ज्याच्या ज्याच्या घरात एकतरी महिला आहे, आई, बहीण, पत्नी, मुलगी किंवा इतर कुठल्याही नात्याने; त्या प्रत्येकाने या प्रतिक्रियांचा स्वतःशी शांतपणे विचार करायला हवा.
काय आहेत या घटना?
कथुआमध्ये क्रूर, अमानुष अत्याचार उघडकीला आल्यानंतर पोलीसांनी जसा तपास सुरू केला तसा तिथे हिंदू मुस्लिम वाद पेटवला गेला. भाजपच्या स्थानिक आमदारांनी आरोपींची बाजू घेतली. 8 वर्षाच्या मुलीवर ….जिच्यावर बलात्कार करून दगड डोक्यात घालून मारलं गेलं ….तिच्यावर नाही नाही ते आरोप केले गेले. पोलीस तपास करून चार्जशीट दाखल करायला निघाले होते तेव्हा वकिलांची एक संघटना ….भाजप समर्थक वकिलांची संघटना ….पोलिसांच्या विरोधात कोर्टात उभी राहिली आणि पोलिसांना चार्जशीट दाखल करायला विरोध केला.
आता उत्तर प्रदेशमधल्या उन्नावकडे जाऊ.
इथे भाजपच्या एका आमदाराने 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पण अजय सिंग बिष्तच्या नेतृत्वाखाली असलेल्या उत्तर प्रदेश सरकारने या आमदाराची पाठराखण केली. अलाहाबाद हायकोर्टात या आमदाराच्या विरोधात काही पुरावा नाहीये म्हणून सांगितले. हा सेनेगर नावाचा आमदार जेव्हा मुख्यमंत्री बिष्तला भेटून येत होता तेव्हा मीडियाने त्याला घटनेबद्दल आणि आरोपांबद्दल विचारले. तेव्हा हा म्हणतो, “अरे वो नीचले जात की लडकी है उसका क्या सुनना ?”
हाच फरक आहे 2013 च्या निर्भया कांडमध्ये आणि आताच्या घटनांमध्ये. तेव्हा निर्भयाच्या आरोपींना वाचवायला कोणीही पुढे आलं नाही. जात – धर्म बहाणे करून महिला अत्याचार या गंभीर विषयाला फाटे फोडले नाहीत. पण आता बलात्कारी आरोपींना धर्म आणि जातीच्या नावाखाली वाचवायची स्पर्धा सुरू आहे. कथुआमध्ये जो अपराध हिंदू मुस्लिम वादात गुंडाळून टाकला जात होता तो उन्नावमध्ये जातींच्या वादात संपवायची ही साजिश होती. कथुआमध्ये जे हिंदुत्ववादी होते ते उन्नावमध्ये सवर्ण झाले ! याचा अर्थ समजतो का??
यांचा आणि हिंदू धर्माचा काहीही संबंध नाही. अजिबात नाही. हे मनुवादी आहेत. सत्ता आणि सत्तेतून येणारे इतर सर्व उपभोग यांच्यासाठीच मनुवाद्यांचे सगळे डावपेच चालतात. हिंदू मुस्लिम वाद पेटवायला निघालेल्या, सवर्ण विरुद्ध दलित भांडणं लावायला निघालेल्या या स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यांना आपण सगळ्या हिंदूंनी आता ठणकावून सांगायची वेळ आलीय. आमच्या महान धर्माचा तुमच्याशी, तुमच्या विखारी राजकारणाशी काहीही संबंध नाही. तुम्ही बदमाश आहात, गुंड आहात, सत्तेला लालची आहात आणि ती टिकवण्यासाठी कुठल्याही थराला जाल इतके निर्दय आहात. आम्ही हिंदू असे नाही. आणि तुम्ही तर हिंदूच नाही. मनुवादी आहात.
असिफा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घराघरात आहे. आणि या मनुवादी टोळ्या गल्लीगल्लीत आहेत. या गुंडांना रोखायचं असेल तर सामान्य माणसांनी धर्म, जात, प्रांत, वर्ण, वर्ग सगळे सगळे भेद बाजूला ठेवून एकजुटीने रस्त्यावर यावं लागेल. आपण सगळे भारतीय विरुद्ध हे मनुवादी असाच लढा आता उभारावा लागेल !
-अमेय तिरोडकर
अरे,
या माणसातील “जनावराला” माणसाळण्यासाठी अनेक संतांनी,थोर पुरुषांनी हजारो वर्षे रक्त,घाम,जीव आटवला.
प्रसंगी प्राणाच बलिदानही दिल.
आणि तुम्ही त्याच देशात धर्माच्या,देशभक्तीच्या नावा खाली माणसातील ” जनावर” संघटित पणे जागवत आहात?
मंदिर मुस्लिमांनी बाटवली अस तुम्ही सांगता.
पण आठ वर्षाच्या मुलीवर मंदिरात बलात्कार करून तुंम्ही मंदिर “पवित्र” केलं असा तुमचा दावा आहे?
बलात्काऱ्यांचा समर्थनार्थ तुम्ही तिरंगा फडकावून तिरंग्याचा मान-सन्मानच केला अस तुमचं म्हणणं आहे का?
” हिंदू एकता मंच” या नावाने तुम्ही बलात्काऱ्यांचं समर्थन करीत होता म्हणे?
तुमच्या या कृत्याने मी व समस्त हिंदू समाज कलंकित झाला अस नाही वाटत तुम्हाला हरमखोरांनो!
तुम्ही देशभक्त म्हणून मिरवत असाल पण तुंम्ही देशद्रोही आहात.
तुम्ही धार्मिक म्हणून मिरवून घ्या पण तुमच्या सारखे अधार्मिक जगात दुसरे कोणी नाहीत.
आणि अरे, तुंम्ही माणस तरी आहात का?
तुम्ही तर जनावरांच्या पेक्षाही निपटार आहात.
थू ! थू !! थू !!!
तुमच्यावर
आणि तूमच्या “विचारसरणीवर”
– चंद्रकांत वानखडे
………………………………………………………………
हिंस्र राक्षसांच्या रानटी वस्तीत का राहातोय?
राञीचे दोन वाजलेत पण झोप लागत नाहीय. संताप, चीड, अस्वस्थता ज्वालामुखीसारखी आत खदखदतीय. तिला बाहेर काढण्यासाठी म्हणून बदडत बसलोय बेराञी किबोर्डची बटणं… कठुवातला रानटीपणा वाचून डोकं बधीर झालंय. वाटतंय उठावं आणि घालाव्यात गोळ्या नराधमांना.
8 वर्षाचं कोवळं लेकरू. तिचं अपहरण केलं जातं. बलात्कार केला जातो…पुन्हा पुन्हा तिच्या शरीराचे लचके तोडले जातात… नशेचं इंजक्शन टोचलं जातं…ती बधीर होते…तरीही नराधम तिला भोगत राहातात.. तिच्या डोक्यात दगड घालून ठेचलं. शरीर रक्तानं माखलं…शरीररातून जीव गेला…तरी निष्प्राण देहावरही लिंगपिसाट कुञे तुटून पडले. लचके तोडत राहिले. त्या हिंस्र राक्षसांच्या टोळीत वर्दीतलाही नराधम होता. हे जिथं घडलं ते मंदीर होतं. त्या चिमुरडीच्या किंकाळ्यांनी गाभाऱ्यातला देवही थिजला असेल. हे सगळं लिहितानाही हात कापताहेत, त्या नराधमांना काहीच वाटलं नसेल का? त्या नरक यातना सहन करताना त्या इवल्याशा जीवाला काय वाटलं असेल? या हिंस्र राक्षसांच्या रानटी वस्तीत आपण का राहातोय?
ती गेली… मुक्त झाली… असं वाटत असेल तर ते झूट आहे… इथल्या माणसांचा नराधमपणा इथेच थांबत नाही. तिच्या बलात्कार आणि हत्येची चार्जशीट दाखल करायला पोलिस कोर्टात निघाले. दारावर काळ्या डगल्यांनी आडवलं… कथीत हिंदुत्ववादी रस्त्यावर उतरले. भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. तिरंगा फडकवत रस्त्यानं जथ्ये नाचू लागले. बलात्काऱ्यांच्या, खुन्यांच्या बाजूनं. कारण ती धर्मानं मुसलमान होती आणि आरोपी हिंदू.
लहानपणी आईच्या मांडीवर झोपून ऐकलेला हा हिंदू धर्म नाही. आणि हाच यांचा हिंदू धर्म असेल तर मी हिंदू नाही. 8 वर्षाच्या त्या लेकराला कसला आलाय धर्म? हैवानांच्या समर्थनार्थ तिरंगा घेवून नाचवणाऱ्या धर्मांधळ्यांनो, तुमच्या जिंदगीवर थू…
– विलास बडे
आज मला पर्वा नाही देशद्रोही म्हणवण्यची.. आज कसलीही पर्वा नाही मला.
“सेक्युलरांनो तुमच्यामुळे देशाची प्रतिमा मलीन होतय जगात” असं म्हणनार्या #हिंदुत्ववाद्यांनो तुमच्यामुळे देशाच्या देशातच चिंध्या चिंध्या होतायत त्याकडे कोण लक्ष देणार?
तुमची भारत माता, तुमची गौ माता आणि स्त्रि…? ती तुमच्या उपभोगाचं, राजकारणाचं, बदला घेण्याचं साधन? ती तुमची माता नाही..?
निरागस बाळाला एवढ्या क्रूरपणे बलात्कार करून मारता आणि त्यावरही जाती-धर्माचं राजकारण करता? आणि म्हणता “बेटी बचाओ”? कुणापासनं वाचवायचं? तुमच्यापासनं?
कालपासनं अनेक posts पाहिल्यात facebook /whats app वर.. लोक लिहितायत.. #JusticeForAsifa
मला कळत नाहीये, न्याय मागतायत तरी कुणाकडे…?
त्या पोलिस यंत्रणेकडे, ज्यातील पोलिसही या दुष्कृत्यात सामिल होते? का त्या कायद्याचे रक्षक म्हणवणार्या आणि आरोपपत्र दाखल करण्यात बाधा आणणार्या वकीलांकडे?
का माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांवर मूक असल्याचा आरोप करणार्या आणि आता ऐन वेळी मूक-बधीर झालेल्या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे?
*असिफा,
बाळा.. we are sorry! आम्ही समाज म्हणून,देश म्हणून, माणूस म्हणून पराभूत झालोय.. तुझ्या फोटो मधील निरागस डोळ्यांत मला बघवत नाही रे बाळा!
प्रश्न पडलाय… तुझ्या ह्याच निरागस डोळ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांनी त्या राक्षसांना नसेल का घेरलं? झोप कशी लागत असणार त्यानराधमांना?
हसण्या-बागडण्यच्या वयात ह्या वेदना? तुला तर, बलात्कार म्हणजे काय? किंबहुना आपल्या सोबत जे काही होतंय त्याला बलात्कार म्हणतात हे देखील तुला कळत नसणार… त्या राक्षसांना तुझ्याकडून काय हवंय?, तुला एवढ्या वेदना का दिल्या जातायत याचं कुठलंही कारण तुझ्या निष्पाप मनाला ठाऊक नसेल आणि त्यांची लालसा… ती तर तुझ्या निरागस कल्पना विश्वाच्या पलिकडची गोष्ट!
तुझ्या वेदनांची मला कल्पनाही करवत नाही गं.. पण एकीकडे समाधान वाटतं की तुझा जीव शारीरिक वेदनांनीच गेला; तुझ्या निरागस वयाने तुझं “मानसिक वेदनांपासून” रक्षण केलं… अन्यथा निर्भयाप्रमाणे तुझाही जीव शारीरिक वेदनेपेक्षा अधिक असणार्या मानसिक वेदनेनेच घेतला असता!*
आणि हो… इंग्रजांनी तुम्हाला “Barbaric Indians” म्हणून संबोधले आणि अभिनंदन.. त्रिवार अभिनंदन… तुम्ही ते खरं करुन दाखवलंत..
#INDIA_RapeCapitalOfTheWorld
-सुरैया पंजाबी, अमरावती
कथुवा तील मन सुन्न करणारी घटना..! मंदिरात च जर अशा घटना घडत असतील तर देवाची भूमिका काय..? फक्त बघ्याची का..? खरेच देव आहे का .? गाभाऱ्यातील देव जर एखाद्या चिमुकलीवर होणारा अत्याचार निमूटपणे ,उघड्या डोळ्यांनी बघत असेल तर …कशाला हवीत ही असली देवळ..मंदिर…? अशा नराधमांना देहदंडाची किंवा त्याहीपेक्षा कठोर शिक्षा द्यायला हवी…! रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा अपेक्षा तरी कुणाची करायची .!लज्जास्पद…!