एक पंतप्रधान आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नरसिंहराव यांचं योगदान अतिशय मोलाचं आहे . राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधान पदाची सूत्र नरसिंहराव यांच्याकडे आली . गांधी किंवा/आणि नेहरु आडनाव नसलेलाही कुणी नेता काँग्रेस पक्ष आणि देश समर्थपणे चालवू शकतो हे नरसिंह राव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सिद्ध करून दाखवलं. गांधी आडनावाचा रिमोट कंट्रोल निष्प्रभ ठरवत अत्यंत अस्थिर परिस्थितीत नरसिंह राव यांनी कर्जाच्या खाईत बुडालेल्या देशाला तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने बाहेर काढलं . नरसिंह राव यांनी जर त्या काळत या देशात खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाची बीजं रोवली नसती तर आजच्या डिजिटल युगात प्रवेश करण्यासाठी आपल्या देशाला कदाचित २०३० किंवा २०३५ साल उजाडावं लागलं असतं. नरसिंह राव यांच्यावर पंतप्रधानाच्या कारकिर्दित आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप झाले. मात्र त्यातूनही ते निर्दोष सुटले आणि त्यांचं चारित्रही धवलच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. पंतप्रधान असलेल्या नरसिंह राव यांना अशा प्रकरणात गुंतवण्याचे जे प्रयत्न त्या काळात झालेत. त्या पार्श्वभूमीवर मुलाच्या शिक्षणासाठी सत्तेत असलेल्या नरसिंह राव यांनी शब्द टाकण्याऐवजी हैद्राबाद येथील बंजारा हिलवरील त्यांची मालमत्ता विकण्याचा पर्याय स्वीकारला होता, हे एका सनदी अधिका-याने नोंदवून ठेवलेलं निरीक्षण मुळीच दुर्लक्ष करता येण्यासारखं नाही.
गांधी घराण्याने कायमच लायक लोकांना उपेक्षिले त्यामुळेच काँग्रेस चि पीछेहाट झाली व काँग्रेस जनतेच्या मनातून उतरली