तोतया बनून, एखाद्या व्यक्तीचं, संस्थेचं खोटं रुप घेऊन फसवणूक केली जाते तेव्हा त्याला फिशिंग म्हटलं जातं. असे गळ टाकून बसलेले हॅकर्स इंटरनेटच्या दुनियेत अगणित असतात. एखादा मासा जरी त्यांच्या गळाला लागला तरी त्यांचं काम झालं. आपण तो मासा व्हायचं की नाही हे आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. आपल्यापैकी कुणालाच तो मासा होण्याची अर्थातच इच्छा नसते, म्हणूनच सायबर सेफ्टीचा विचार अतिशय गांभीर्याने केला पाहिजे.