
महिलांना मानवी अधिकार मिळावेत, या मुख्य कारणासाठी बाबासाहेबांनी आपल्या केंद्रातल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बाबासाहेबांनी हिदू धर्म सोडण्याचे जाहीर केले होते. तरीही, हिंदू महिलांसाठी ते अखेरच्या श्वासापर्यंत लढले. ‘हिंदू कोड बिल’ मंजूर होत नसल्याने बाबासाहेबांनी राजीनामा दिला हे खरे. त्याला पंतप्रधान म्हणून नेहरू जबाबदार होते, हेही खरे.
बाबासाहेब संविधान समितीत आणि मुख्य म्हणजे मसुदा समितीत हवेत, हा गांधींचा आग्रह होता. डॉ. आंबेडकर यांनीही गांधी आणि कॉंग्रेस यांच्या धोरणांना विरोध केला हे खरे, पण देश स्वतंत्र झाल्यानंतर नव्या राष्ट्राची उभारणी स्वातंत्र्य, समता, बंधुता या पायावर व्हावी यासाठी त्यांनी सहकार्याची भूमिका स्वीकारली.