Immunity (रोगप्रतिकारक शक्ती) हा नक्की काय प्रकार आहे?

-मंगेश सपकाळ , मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया)

बऱ्याच वेळा रोगप्रतिकारक क्षमता वाढवा, त्यासाठी हे करा, ते करा, हे खा, ते खा असे प्रकार आपण ऐकतो. पण Immunity म्हणजे नक्की काय प्रकार आहे, ती शरीरात कशी कार्यरत होते आणि ती सुधारण्यासाठी नक्की काय प्रयत्न करावे लागतात… ?
त्याआधी –
एका-पेशीपासून ‘जीवनाला’ सुरुवात झाली आणि ती सुधारणा-उत्क्रांती होत होत त्याचं इतर निरनिराळ्या सजीवांत रूपांतर झालं. कोणी झाड झालं, कोणी मासा, कोणी पक्षी, तर कोणी जनावर. सभोवतालच्या परिस्थितीनुसार प्रत्येक सजीवांच्या आत बसलेल्या पेशींनी त्या त्या शरीरात गरजेनुसार बदल केले. अगदी मनुष्यात देखील वेगळ्या रंगाचा, वेगळ्या उंचीचा… वगैरे गरजेनुसार बदल केले. काही गोष्टी त्यांना Adapat कराव्या लागल्या आणि काही गोष्टींचं Mutation झालं.
जसं पेशींनी बाहेर लढण्यासाठी, सोयीसाठी शरीरात बदल केले, तसं त्यांना आतल्या शरीराचं रक्षण करणंही भाग होतं.
पण कुठल्या ना कुठल्या कारणाने, इतर नकोशा गोष्टींचा शरीरात शिरकाव होत होताच. कधी तो अन्नावाटे, तर कधी पाण्यामार्फत, कधी सेक्स… तर कधी हवा.
बाहेरून येणाऱ्या गोष्टींना, खासकरून बॅक्टेरिया आणि व्हायरस, यांना फुकटचं शरीर हवं होतं, कब्जा हवा होता. जाहीर आहे, जे शरीर आपल्या पेशींनी घडवलं त्यावर इतरांनी राज्य करावं, आपला विनाश करावा असं कधीच मनी नसल्यामुळे, शरीराच्या आतल्या सिस्टमला त्याच्याविरोधात लढणं, गरजेचं होतं.
त्यासाठी त्यांना सैन्य हवं. सैन्यात ताकत आणि जोश हवा. सैन्य हुशार हवं.
आणि हे सगळं जाणून आपल्या शरीराची “IMMUNE” सिस्टम घडत गेली. बाहेरून येणाऱ्या कोणालाही आत एंट्री मिळणार नाही, आणि मिळाली तर त्यांच्यवर कायदेशीर कारवाई करुन, ‘उनको मौत की सजा’, वगैरेचा कायदा झाला.
हा कायदा स्वरक्षणासाठी अत्यंत गरजेचा होता.
—————————–
एक गंमत –
हा कायदा एवढा काटेकोरपणे पाळला गेला की, स्त्री-पुरुष “पुनरुत्पादन” एक समस्या होऊन बसली. कारण पुरुषाचं वीर्य, स्त्रियांच्या योनीत मारलं जाऊ लागलं. कारण स्त्री-शरीराला, ‘वीर्य’ हे आपल्या शरीराचं नाही, हे फोरन पार्टीलक्स आहेत’, एवढंच माहित होतं. आणि मग नियम म्हणजे नियम. काट डालो सालों को… आणि या ज्या क्युटशा-सेक्सी दिसणाऱ्या पोरींनी गपचूप चड्डीत आपल्या अबोल, भाबड्या, मासूम वगैरे काय ते अशा शुक्रजंतूंची कत्तली करणं सुरु केलं. (आणि याचाच बदल म्ह्णून ब्लो-जॉबची सुरुवात झाली…. जस्ट किडींग)
तर लफडा असा झाला की, साला मग आता पुनरुत्पादन करायचं कसं, पिढी पुढे वाढवायची कशी ? मग या समस्येवर तोडगा म्हणून पुरुषांच्या शुक्रजंतूंबरोबर रक्षक पाठवायचं ठरलं.
म्हणजे शरीराने, बाहेरच्या फॉरन पार्टिकल्स मारण्यासाठी केलेला नियम, ‘दिसला की ठोकला’ हे बदललं नाही. ती उपयुक्त सिस्टम तशीच ठेवली.
म्हणूनच बऱ्याच वेळा, सेक्स-नंतर, किंवा मास्टर्बेशननंतर स्त्री-पुरुषांना लघवीला जावं लागतं. युटरस फुल वगैरे कारण नसतं… उलट तहान लागायला हवी… पण त्या सेक्स-दरम्यान बरेच फॉरन पार्टिकल्स आपल्या लिंगाद्वारे आत जातात आणि मग शरीराला ते आपल्या ‘लघवी’ मार्गे बाहेर ढकलावे लागतात. जस्ट सेफ्टी म्हणून !
————————————-
तर आता ही Immune सिस्टम चालते कशी ?
हे फायटर्सचं काम दिलंय, “व्हाईट-ब्लड-सेल्स” ना. हे तयार कुठे होतात ? तर bone-marrow मध्ये. म्हणजेच हाडांमध्ये असलेल्या पेशींमध्ये. आता हे ब्लड सेल्स बाहेर पडतात, आणि त्यांचं काम असतं, सिक्युरिटी गार्डचं. म्हणजे शरीरात कोणी दहशतवादी शिरलाय, याचा शोध घेणे. जसं ह्यांच्या नजरेत कोणी आढळलं तर हे लगेच बोन-मॅरोला संदेश पाठवतात, की भाई कोई चोर घूस आया है. जसं हा मेसेज मिळतो, पेशीतून एक पथक (Pahagocyte) बाहेर पडतं. ह्याचं काम असतं ते चोराची औकात किती, तेव्हढं जाणून घेणं. मग हे त्या चोराला टपकवतात आणि तो कुठल्या प्रकारचा चोर आहे, आणि मग अशा असंख्य चोरांना छुरी से काटे, या गोलीसे मारे, म्हणजेच त्याला मारण्यासाठी काय काय टेक्निक वापराव्या लागतील, हे ठरवलं जातं.
मग तिथून सुटतं, दुसरं पथक – “T – सेल्स”. हे सेल्स सुटलंय चोरांना ठोकायला. आणि जे सेल्स बोन-मॅरो मध्येच राहतात, त्यांना म्हणतात “B – सेल्स”. जोपर्यंत “T-सेल्स”, यांना ठोकत असतात, तोपर्यंत B-सेल्स, मिळालेल्या माहितीनुसार, स्पेशल प्रोटीन – “अँटीबॉडी” पाठवतात. यांचं काम असतं. ते दूषित झालेल्या पेशींना संपवणं.
म्हणजे T-सेल्स आणि B-सेल्स हे आहेत आपले फायटर्स.
यात हे सेल्स, सर्व माहिती स्टोर करून ठेवतं, म्हणजे पुढच्यावेळी जर तोच चोर आला, तर त्याला कसं मारायचं हे आपल्या शरीराला माहीत असतं.
म्हणून काही आजार पटकन जातात, तर काही आजार जायला वेळ लागतो. कारण कधी कधी आपल्या शरिराकडे हवी तशी साधनं नसतात.
त्यामुळे सध्याचा कोरोना हा अगदीच नवीन आणि शक्तिशाली असल्यामुळे शरीराला त्याच्याबरोबर युद्ध जिंकायला बराच वेळ लागतोय आणि बाहेरून औषधांची साथ पण लागते. कारण सर्वात मोठा व्यत्यय आणलाय भाऊने, तो म्हणजे ‘श्वास घ्यायला’. श्वासोश्वासासाठीच मोठा प्रॉब्लेम येत असल्याने, प्राणवायू मिळायला त्रास, प्राणवायू हव्या त्या प्रमाणात मिळत नाहीये म्हणून, पेशींना मदत होत नाही. कारण पेशी जिवंत ठेवायला प्राणवायू हवाय. ज्या पेशी लढणार आहेत, त्यांनाच जिवंत राहायला अडथळे निर्माण होणार असतील, तर ते फायटर्स पाठवणार कसे ?
त्यामुळे ज्यांना इतर शारीरिक प्रॉब्लेम नाहीत, त्यांना बरं व्हायला फार मोठा प्रॉब्लेम नाही. फक्त वेळेचा प्रश्न आहे.
————————————
तर मग आपण काय त्यांना हातभार लावू शकतो ?
योग्य आहार करून. व्हिटॅमिन A, व्हिटॅमीन E, व्हिटॅमीन C, व्हिटॅमिन D, बी १२ ….. ह्यांची आपल्या शरीराला फाईट करायला फार मदत होते.
योग्य व्यायाम, प्रोटीन Intake, एनर्जी तर देतंच, पण रक्त-प्रवाह सुधारतो. ज्याची फायटर्स सेल्सना मदत होते.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, स्ट्रेस कमी करणं. स्ट्रेस हॉर्मोन, कॉर्टिसॉल, हा आहे सर्वात मोठा दुश्मन. कारण हा डायरेक्ट “T-सेल्स” वर आघात करतो. म्हणजे जो आपल्यासाठी लढणार आहे, तोच जर कमी होणार असेल तर मग प्रॉब्लेम आहे.
म्हणजे जर तुमचा आहार व्यवस्थित असेल, व्यायाम व्यवस्थित असेल… पण स्ट्रेस खूप असेल, तरी रोगप्रतिकार शक्तीसाठी ते घातक ठरणार.
बऱ्याच रडक्या लोकांना सारखे इकडचे तिकडचे आजार असतात बघ. आणि या उलट हसत-खेळत-प्रसन्न राहणाऱ्या लोकं बरी असतात.
कारण हैप्पी हॉर्मोन (ऑक्सिटोसिन), प्रत्येक गोष्टीत मदत करतो…
——————————
तर येवढं सगळं पुराण का मतलब क्या है दया,
हेच, की आपल्या भाईने, म्हणजे आपल्या शरीराने ज्याम मेहनत घेतलेय आपल्याला घडवायला, आपला बचाव करायला. दिवस-रात्र तो झटतोय. आणि गेले कित्येक वर्ष तो हे करतोय. तर त्याची मदत करु, तो काही आपल्याला मरू देत नाही. आपला पार्टनर आहे यार तो. आपल्याबरोबर आला, आपल्याबरोबर जाणार. तो अपूनका भी फर्ज बनता है ना मामू… साला आता गिव्ह-अप नाही करायचं.
सध्या का माहोल थोडा गडबडीका आहे. भाई थोडा टेन्शन में हैं, थोडा परेशान है. अपुन उसको नहीं देखेगा तो, वो भी कुछ नहीं कर पायेगा…
अपुनको बस कुछ टाईम के लिये उसको सम्भालनेका है रे.
थोडक्यात काय तर, “कठीण समय येता कोण कामास येतो….” ?
आणि सध्यातरी त्याची मदत आपण फक्त “घरी बसूनच” करू शकतो…
साला इत्तुसी बात है बे….
“वाचवाल तर वाचाल” !
नाहीतर भेटा वर !

(लेखक उपहास , वक्रोक्ती व विनोदी पद्धतीने अनेक विषयांचा अभ्यासपूर्ण व परखड वेध घेतात)

Previous articleकरोनाचं चीनमधलं धक्कादायक गणित… 
Next articleसोनचिडिया: अव्वल आधिभौतिक अनुभव देणारा चित्रपट
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here