इंटरनेटच्या बाबतीतला हा बदल सहज झाला, असं आपल्याला वाटत असेल, तर ते सर्वस्वी चूक आहे. आपण इंटरनेटच्या अधीन होऊन विचार करणंच थांबवावं, यामागे एक प्रचंड यंत्रणा काम करत असते. त्याचाच एक प्रकार म्हणजे ‘पर्सुएजिव्ह टेक्नॉलॉजी. आपल्याला दिवसभरात जितक्या वेळा एसएमएस, व्हॉटसअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा अॅप्सवरून स्मार्टफोनवर पिंग येतात, तितकं आपलं लक्ष विचलित होत जातं. प्रत्यक्ष जगाशी आपला संबंध तितके क्षण तुटलेला असतो. अशा प्रकारे सतत कोणतं ना कोणतं तंत्रज्ञान आपलं लक्ष वेधून घेत असतं. या संकल्पनेला ‘पर्सुएजिव्ह टेक्नॉलॉजी’ हेच नाव आहे.