शायराना अंदाजमधील तरसणे,विजनवास जाऊ द्या,मी ४० वर्षे स्वेछेने लॉकडॉऊन करून घेऊनसुद्धा तसूभरही आपल्या महान कामापासून दूर न झालेल्या एका मनस्वी अवलियाला १९८८ मध्ये भेटलोय . कोरोनाच्या लॉकडॉऊनमध्ये तोच माझी प्रेरणा ठरला.
आता असा माणूस चाळीसगावला त्याकाळात आला हे विलक्षण म्हटले पाहिजे.मी १९८८ मध्ये औरंगाबादच्या हौशी फोटोग्राफर्ससह चाळीसगाव मुक्कामी असताना केकी यांना भेटलो.त्यांच्या वाड्यात घुसलोच म्हणा.तिथे जाईपर्यंत त्यांच्याविषयी फार जुजबी माहिती होती . प्रत्यक्षात वाड्याचे रुपांतर केकी यांनी एका कलादालनात केले होते.भेटलो तेव्हा केकी उतारवयात होते.३१ डिसेंबर ८९ ला केकी आपली फोटो फ्रेम सोडून गेले. १९८० नंतर केकी यांना त्यांच्या कलादालनाचा पसारा आवाक्यात आणता आला नाही. एकतर ते अखेरपर्यंत उपेक्षित राहिले, आणि दुसरे ऐन उमेदीच्या काळात स्वतःला त्यांनी लॉकडॉउन करून घेतले.वर जो उल्लेख केलाय त्यांच्या कथित प्रेयसीचा…तिच्यामुळे त्यांनी स्वत:ला कोंडून घेतल्याचे सांगितले जाते.रोज रात्री १ वाजता पंजाब मेल चाळीसगाव जंक्शन वर थांबायची. त्यामधून कबूल केल्याप्रमाणे ‘ती’ इथे येईल, असे त्यांना अखेरपर्यंत वाटत राहिले .पण ती का नाही आली ?,त्यांच्या कलेची प्रेरणा कोण? असे कित्येक प्रश्न केकी यांनी अनुत्तरीतच ठेवले.
घरात कोंडून घेऊन त्यांची कलासाधना चालूच होती.अनेक आंतरराष्ट्रीय छायाचित्र आणि कला प्रदर्शनात ते कलाकृती पाठवत राहिले. त्यांना जवळपास ३०० नामंकित पुरस्कार मिळालेत मात्र त्याची सूचना देणारी जी पत्रे त्यांना येत, ती त्यांनी उघडून सुद्धा पहिली नाहीत.त्यांच्या मृत्यूनंतर ती उघडण्यात आली तेव्हा १९६० ते ८५ पर्यंत त्यांना मिळालेल्या पुरस्कारांचे रहस्य उलगडले.काही संस्थानी मात्र त्यांना घरी येऊन गौरविले होते.अनेक वर्षे केकी यांनी एक खानसामा ठेवला होता.तो त्यांना खाना बनवून देई,पुढे १९८० नंतर त्यांना चक्क एका खानावळीतून डब्बा येत असे.त्यांनी पाळलेल्या टोनी कुत्र्याने त्यांची साथ सोडल्यावर आधीच एकाकी असलेले केकी खंतावत गेले .नाही म्हणायला महाराष्ट्र सरकारने १९८३ मध्ये life and sketch of keki हा ग्रंथ प्रकशित केला.केकीने कित्येक हजार विविध भाषेतील निवडक पुस्तके,काही वाद्ये,पाशिमात्य आणि शास्त्रीय संगीताच्या तबकड्या जमा केल्या होत्या.उस्ताद दिन मोहम्मद खान यांच्याकडून त्यांनी सतार वादन शिकून घेतले.अशा या हरहुन्नरी कलाकाराने मृत्यूपूर्वी केकी मूस आर्ट ट्रस्ट स्थापन करून सर्व अधिकारट्रस्टला दिले. १९०७ साली बांधलेला देखणा वाडासुद्धा ट्रस्टकडेच आहे.
चाळीसगांव ला 💝 प्रेम विरहाचा 40 वर्षा चा विजनवास …….
खिरोदा जि. जळगांव येथे BFA पहिल्या बॅच ला वर्ष 1984 ला प्रवेशीत असतांना प्रा. तांबटकर सर यांचे समवेत भटकंती च्या निमित्याने चाळीसगांव ला मा.के की मूस साहेब यांचेशी प्रत्यक्ष भेटीचा योग आला. त्या वेळी तेथील कलाकृती,टेबल टॉप फोटोग्राफी,बघता आली.हा आमच्या साठी मूस साहेबा सोबतचा सुवर्णक्षण होता .तेथील कलात्मक वातावरण, रेल्वे स्टेशन जवळील टुमदार बंगला छानच आहे. अतल्प साधन सामुग्रीत कलाकृती साकारणे एक आव्हानच होते त्या काळी
के की चे ते देखणे भारदस्त गोरेपान तेजस्वी रूप आम्ही बऱ्याच वेळ बघतच राहिलो.
प्रेयशी साठी शेवटच्या क्षणा पर्यंत वाट बघणे …..
मन सुन्न करून जाते. अश्या थोर विभूतीस सलाम या सुवर्ण भेटीला निमित्य ठरले ते सर्वांचे लाडके प्रा.तांबटकर सर
कहर आणि अत्यंत अनभिज्ञ अशी घटना. या हरहुन्नरी कलाकाराचे जगणे ऐकून स्तब्ध होऊन गेलो. अशी निस्तब्धता फार कमी वेळा मी अनुभवली आहे. या व्यक्तीच्या जीवनात असलेल्या त्या प्रेयसीची सुद्धा कहानी पुढे यायला हवी.आणि तिची अगतिकता ही किंवा तिच्या समोरच्या अडचणी या प्रकाशात यायला हव्यात. कारण तिच्या विरहा मध्ये इतका महान कलाकार अशा पद्धतीने आपली कला पुढे नेत राहिला ते प्रेरणास्थान जगाच्या पुढे येणे अत्यंत आवश्यक आहे. या कलाकाराला मनस्वी लाखो सलाम……..
कलाकार गेल्या नन्तरच्या कला कथा.
van gogh, केकी मुस ,गायतोंडे आता अनेक कलावंत कोरोना काळात कला आणि असे अनेक कलाकार घटका मोजत आहेत .