काळ स्वतःच खेळाडू असून तो समस्त स्त्री-पुरुषांच्या सोंगट्या बनवून त्यांना दिवस-रात्रीच्या विस्तृत कालपटावर ढकलून देतो आणि स्वतःच त्यांचा खेळ पाहत बसतो, असं भर्तृहरी जेव्हा म्हणतो तेव्हा आपण स्तब्ध आणि सावध व्हायचं असतं. प्रवाही काळ कोणासाठी थांबत नसतो. तो पुढे सरकत राहतो तटस्थपणे. काळ उदासीनसुद्धा असतो. चांगलं आणि वाईट असं सगळं आपल्या विशाल उदरात हा गडप करून टाकतो. म्हणून, ‘सगळं’ आणि ‘सगळे’ विस्मरणात जातात असा दावा करण्यात आलेला आहे. काळाच्या बाबतीतलं हे सगळं खरं जरी असलं तरी हा म्हातारा माणूस काही कोणाला विसरता आलेला नाही. हा माणूस कोणाला मारून पण टाकता आलेला नाही. तो कदाचित अवध्य. तो कदाचित अमर. कदाचित कायम टिकणारा, तो वलयांकित शाश्वत.
असे सहा पॉइंट बाबासाहेबांनी काढलेले होते. बाबासाहेब म्हणाले की, ‘काँग्रेसने लखनौ करार करून- जो टिळक आणि जीना यांच्यामध्ये झाला त्याला मान्यता देऊन- जी चूक केलेली आहे, ती तुम्हाला निस्तरणं फार अवघड आहे. माझी सरळ मागणी आहे. ‘पहिली मागणी म्हणजे सर्व भारतीयांना प्रौढ मतदानाचा हक्क.’ म्हणूनच गांधी-आयर्विन यांच्यात जो करार झाला, त्यावर सडकून टीका झाली होती. बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की, ‘गांधी-आयर्विन करारामध्ये गांधींनी प्रौढ मतदानाचे आणखी एक कलम घालायला पाहिजे होते. माझी स्पष्ट भूमिका अशी आहे की- प्रौढ मतदान, प्रादेशिक मतदारसंघ आणि अस्पृश्यांना राखीव जागा या वीस वर्षांसाठी.
त्यानंतर आंबेडकरांनी सगळा इतिहास सांगितला. गांधींनी आणि नंतर काँग्रेसने किती त्रास दिला, त्यांना कुठे कुठे आडकाठी केली वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. जवळजवळ तीन-चार तास त्यांची चर्चा झाली. शेवटी आंबेडकर उठले. त्या वेळी लेस्टरनी पुन्हा विचारलं की, या प्रश्नाचं होकारात्मक किंवा नकारात्मक उत्तर द्यावं. आंबेडकर काहीच बोलले नाहीत. लेस्टर म्हणाल्या की, या मौनाचा अर्थ असा घेते की, तुमची इच्छा आहे. मी उद्या गांधींना दिल्लीत भंगी कॉलनीमध्ये भेटणार व आपली चर्चा व ‘तुमची इच्छा आहे’ असं सांगणार. त्याप्रमाणे ती दुसऱ्या दिवशी दिल्लीला गेली. गांधीजींना सांगितलं. नंतर गांधीजींनी राजेंद्रप्रसाद आणि वल्लभभाई पटेल यांना बोलावून सांगितलं की, ‘मला कुठल्याही परिस्थितीत घटना परिषदेच्या अधिवेशनात आंबेडकर पाहिजेत. तुम्ही काहीही करा.’
डॉ. कसबे : श्यामाप्रसाद मुखर्जी तर होते, पण आपले राजेंद्रप्रसाद. गांधीजींचा सोमनाथच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराला विरोध होता. नेहरूंचा तर प्रचंड होता. पण सरदार पटेल आणि राजेंद्रप्रसाद यांनी खूप आग्रह धरला. त्याच्यासाठी निधी उभा केला आणि जीर्णोद्धार केला. ब्राह्मणांच्या हातातून राजेंद्रप्रसादांनी राजदंड घेतला, कारण ते प्रेसिडेंट होते ना. तेव्हा नेहरूंनी टीका केली त्यांच्यावर. १९३५ च्या कायद्याप्रमाणे काँग्रेसची सरकारं स्थापन झाली, त्या वेळी त्यांनी हिंदुहिताचे कायदे करायला सुरुवात केली आणि मुस्लिमांचा दृष्टिकोन पूर्ण बाजूला ठेवला. त्यामुळे हिंदू-मुसलमानांमधली दुही वाढत गेली. मुसलमान कुठल्याच पद्धतीने ऐकायला तयार होईनात. त्यांना आता स्वतंत्र राष्ट्र पाहिजे होतं. खरं म्हणजे भारताची स्वातंत्र्य चळवळ म्हणजे तरी काय आहे?