पुरुषसूक्ताचे पठण बंद करा!

संजय सोनवणी

भारतीय समाजात उच्च-नीचतेचे परिमाण रुजवणारी हिडिस व्यवस्था निर्माण पुरुषसूक्तापासून झाली. हे ऋग्वेदातील दहाव्या मंडलात येणारे सूक्त असून त्याचाच विस्तार पुढे ऐतरेय ब्राह्मण ते मनुस्म्रुतीत झाला आहे असे सर्वमान्य मत आहे. त्यामुळे मुळात पुरुषसुक्त काय आहे ते तपासणे योग्य ठरेल.

ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात येणा-या पुरुषसुक्ताच्या सर्वच मुळ ऋचा आणि त्यांचा खालील अनुवाद पहा.

सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात्।स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशाङ्गुलम्॥ १०.०९०.०१
अर्थ: पुरुषाला १००० मस्तके आहेत, १००० नेत्र आहेत आणि १००० पाय आहेत.प्रुथ्वीला व्यापुनही तो दशांगुळे उरला आहे.

पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम्।उतामृतत्वस्येशानो यदन्नेनातिरोहति॥ १०.०९०.०२
अर्थ: पुरुष हाच विश्व आहे. जेही काही होते,आहे आणि होईल, ते अद्भुत त्याचे आहे, तो अमरतेचा नियंता आहे आणि अन्नाने तो विस्तारत रहातो.

एतावानस्य महिमातो ज्यायाँश्च पूरुषः।पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि॥ १०.०९०.०३
अर्थ:ही पुरुषाची महानता आहे. सारी अस्तित्वे हा त्याचा एक चथुर्तांश भाग असुन उर्वरीत तीन चतुर्थांश अवकाशात अमरता घेउन आहेत.

त्रिपादूर्ध्व उदैत्पुरुषः पादोऽस्येहाभवत्पुनः।ततो विष्वङ्व्यक्रामत्साशनानशने अभि॥ १०.०९०.०४
अर्थ:तीन चतुर्थांश भाग घेवुन पुरुष उर्ध्वगामी विस्तारीत झाला आणि त्याचा एक चतुर्थांश भाग येथे विभाजीत झाला ज्यातुन खाणारे आणि न खाणारे उत्पन्न झाले.

तस्माद्विराळजायत विराजो अधि पूरुषः।स जातो अत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः॥ १०.०९०.०५
अर्थ:त्याच्यापासुन विराज निर्माण झाला आणि विराजापासुन पुरुष. जन्मताच पुरुष प्रुथ्वी व्यापुन मागे व पुढे गेला.

यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत।वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इध्मः शरद्धविः॥ १०.०९०.०६
र्थ:देवतांनी पुरुषाला यज्ञात बळी दिले. त्यात (यज्ञात ) वसंत ऋतु हा तुप झाला तर ग्रीष्म अग्नी आणि शिशिर हवी झाला.

तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन्पुरुषं जातमग्रतः।तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये॥ १०.०९०.०७

अर्थ:पुरुष बळी झाला. त्याला हविद्रव्यावर जाळले आणि त्याच्यासह देवता, ऋषि आणि साध्यासही बळी दिले.

तस्माद्यज्ञात्सर्वहुतः सम्भृतं पृषदाज्यम्।पशून्ताँश्चक्रे वायव्यानारण्यान्ग्राम्याश्च ये॥ १०.०९०.०८
अर्थ:या वैश्विक बळीतुन दही आणि तुप उत्पन्न झाले. त्यातून पक्षी आणि पाळीव व वन्य पशू उत्पन्न झाले.

तस्माद्यज्ञात्सर्वहुत ऋचः सामानि जज्ञिरे।छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत॥ १०.०९०.०९
अर्थ:या वैश्विक बळीतुन ऋक, साम आणि यजस मंत्रांची आणि छंदांची निर्मिती झाली.

तस्मादश्वा अजायन्त ये के चोभयादतः।गावो ह जज्ञिरे तस्मात्तस्माज्जाता अजावयः॥ १०.०९०१०
अर्थ:त्यातूनच अश्व, बोकड, शेळ्या असे सर्व प्राणी निर्माण झाले

यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन्।मुखं किमस्य कौ बाहू का ऊरू पादा उच्येते॥ १०.०९०.११
अर्थ: देवांनी जेंव्हा पुरुषाचे असे विभाजन केले ते त्याचे तुकडे करुन काय? त्याचे मस्तक काय होते? त्याचे हात काय होते? त्याच्या मांड्यांचे आणि पायांचे काय झाले?

ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्बाहू राजन्यः कृतः।ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत॥ १०.०९०.१२
अर्थ: तर ब्राह्मण हे त्याचे मुख होते. राजन्य हे त्याचे हस्त होते. मांड्या हे वैश्य तर शुद्र हे त्याच्या पायापासून उत्पन्न झाले.

चन्द्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत।मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत॥ १०.०९०.१३

अर्थ:चन्द्र हा त्याच्या मनापासुन उत्पन्न झाला तर नेत्रांपासून सुर्य. इंद्र आणि अग्नी त्याच्या मुखापासून तर वायु त्याच्या श्वासातुन निर्माण झाले.

नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णो द्यौः समवर्तत।पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात्तथा लोकाँ अकल्पयन्॥ १०.०९०.१४
अर्थ:त्याच्या बेंबीपासून हवा, मस्तकापासून आकाश, त्याच्या पावलांपासून पृथ्वी , त्याच्या कानांपासून चार दिशा आणि अशा रितीने देवांनी विश्व बनवले.

सप्तास्यासन्परिधयस्त्रिः सप्त समिधः कृताः।देवा यद्यज्ञं तन्वाना अबध्नन्पुरुषं पशुम्॥ १०.०९०.१५
अर्थ:देवांनी सात प्रज्वलीत समिधांनी त्याला (पुरुषाला) बांधून  (यज्ञीय पशू मानून ) बळी दिला.

यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्।ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः॥ १०.०९०.१६
अर्थ:हा आद्य यज्ञ व बळी होता. या देवतारुप शक्तींनी आकाश व्यापले…त्यांचे आम्ही महिमान गातो…कोठे आहेत पूर्वीचे साध्यस आणि देवता?

हे असे आहे पुरूषसूक्त. याचा शिव, विठ्ठल आणि अन्य सर्वच मुळात अवैदिक असलेल्या हिंदू देवतांच्या पूजेचा काय संबंध आहे? तरीही वैदिक धर्मीय  हिंदू धर्मात घुसून देवदेवतांच्या पूजेच्या वेळीस हे सूक्त म्हनतात. एकापरीने हिंदू देवतांचा आणि हिंदूंचा अपमान करतात. हे सूक्त वैदिकांनी त्यांच्या यज्ञांत खुशाल म्हणावे…मुळात याची निर्मितीही यज्ञाशीच सम्बंधित आहे. हिंदूंच्या मुर्तीपूजेशी त्याचा दुरान्वयानेही काहीएक संबंध नाही. अशा स्थितीत या सूक्तावर व पुजा प्रसंगी म्हटल्या जाणा-या काही फुटकळ ऋचांवर बंदी घातली पाहिजे. हे वैदिक मंत्र हिंदूंच्या  पुजेत म्हटले जाण्याला सर्वांनीच विरोध केला पाहिजे. 

(संजय सोनवणी अभ्यासक व अनेक पुस्तकांचे लेखक आहेत)

9860991205

Previous articleजावेद….साहिर आणि दोनशे रुपयांच्या गोष्टीचा गुंता!
Next article‘लैला’-भविष्यातील भारताचे भयावह चित्र
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.